Ratan Tata Passed Away : 'दयाळू, विलक्षण व्यक्तीमत्व', रतन टाटा यांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
PM Modi on Ratan Tata Death : उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शोक व्यक्त केला आहे.
PM Modi on Ratan Tata Death : भारतीय उद्योगविश्वातला आधारवड रतन टाटा (Ratan) यांचं वयाच्या 86व्या वर्षी निधन झालं आहे. रतन टाटा यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँन्डी रुग्णालयात उपचार सुरु होते. रतन टाटा यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीही शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या जाण्याने भारतीय उद्योगविश्वार मोठी शोककळा पसरली आहे. देशासाठी आदर्श व्यक्तिमत्व, शालिन उद्योगपती अशी रतन टाटा यांची ओळख होती. त्यांच्या उद्योगविश्वातील तत्त्वे ही तरुण उद्योजकांसाठी आदर्श आहेत आणि ती कायम राहतील अशा भावना युवा उद्योजक व्यक्त करत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स पोस्ट करत रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत म्हटलं की, श्री रतन टाटा एक दूरदर्शी व्यापारी नेते, दयाळू व्यक्तीमत्त्व आणि विलक्षण व्यक्ती होते. त्यांनी भारतामधील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित व्यावसायिक घराण्यांना नेतृत्व प्रदान केलं. त्यांच्या निधनाने अत्यंत दु:ख झाले आहेत. ओम शांती!
Shri Ratan Tata Ji was a visionary business leader, a compassionate soul and an extraordinary human being. He provided stable leadership to one of India’s oldest and most prestigious business houses. At the same time, his contribution went far beyond the boardroom. He endeared… pic.twitter.com/p5NPcpBbBD
— Narendra Modi (@narendramodi) October 9, 2024
गृहमंत्री अमित शाह यांनीही वाहिली श्रद्धांजली
गृहमंत्री अमित शाह यांनी रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहत म्हटलं की, 'दिग्गज उद्योगपती श्री रतन टाटा जी यांच्या निधनाने खूप दुःख झाले.आपल्या देशाच्या विकासासाठी त्यांनी निस्वार्थपणे आपले जीवन समर्पित केले. प्रत्येक वेळी मी त्यांना भेटलो तेव्हा भारत आणि देशाच्या लोकांच्या भल्यासाठीच त्यांची बांधिलकी होती. आपल्या देशाच्या आणि लोकांच्या कल्याणाप्रती असलेल्या त्यांच्या बांधिलकीमुळे लाखो स्वप्ने फुलली. पण काळ त्यांना आपल्यापासून हिरावून घेऊ शकत नाही, ते आपल्या मनात कायम आहेत.'
Deeply saddened by the demise of legendary industrialist and true nationalist, Shri Ratan Tata Ji.
— Amit Shah (@AmitShah) October 9, 2024
He selflessly dedicated his life to the development of our nation. Every time I met him, his zeal and commitment to the betterment of Bharat and its people amazed me. His commitment… pic.twitter.com/TJOp8skXCo
राहुल गांधींनीही व्यक्त केला शोक
रतन टाटा यांच्या निधनावर राहुल गांधी यांनी शोक व्यक्त करत म्हटलं की, रतन टाटा हे दूरदृष्टी असलेलं व्यक्तीमत्त्व होतं. व्यवसाय आणि परोपकार या दोन्हींवर त्यांनी अमिट छाप सोडली आहे.त्यांच्या कुटुंबियांना आणि टाटा समुदायाप्रती माझ्या संवेदना.
Ratan Tata was a man with a vision. He has left a lasting mark on both business and philanthropy.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 9, 2024
My condolences to his family and the Tata community.
ही बातमी वाचा :
Ratan Tata Passed Away : उद्योगपती रतन टाटा यांचे निधन, वयाच्या 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास