Elephants Counting Challenge : चार की सात? फोटोमध्ये किती हत्ती? फोटो पाहून नेटकरी चक्रावले
Elephants Counting Challenge : वाइल्ड लेन्स इको फाऊंडेशन या अकाऊंटने नुकताच एक फोटो ट्विटरवर शेअर केला.
Elephants Counting Challenge : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. अनेक वेळा सेलिब्रिटींचे फोटो व्हायरल होतात. तर काही वेळा भन्नाट मीम्स व्हायरल होतात. सोशल मीडियावर क्विज तसेच कोडी व्हायरल होत असतात. सध्या एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. हा फोटो पासून नेटकरी देखील चक्रावले आहेत.
वाइल्ड लेन्स इको फाऊंडेशन या अकाऊंटने नुकताच एक फोटो ट्विटरवर शेअर केला. या फोटोबद्दलची माहिती त्यांनी कॅप्शनमध्ये दिली. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, 'हा फोटो योग्य पद्धतीनं कॅप्चर करण्यासाठी एकूण 1400 फोटो क्लिक करावे लागले. फोटोमध्ये दिसत आहे की सात हत्ती पाणी पित आहेत.' तसेच 'या फ्रेममधील सात हत्ती तुम्ही पाहू शकत आहात का?', असा प्रश्न देखील कॅप्शनमध्ये विचारण्यात आला आहे. अनेकांनी या ट्वीटला कमेंट करत या फोटोमधील हत्ती मोजण्याचा प्रयत्न केला.
It took nearly 1400 clicks in 20 odd minutes to get this perfect sync frame of 7 Elephants quenching their thirst. CAN YOU SEE ALL 7#canonphotography @Canon_India @PMOIndia @moefcc pic.twitter.com/51WKgBqQBs
— WildLense® Eco Foundation 🇮🇳 (@WildLense_India) January 19, 2022
हत्तींचा हा फोटो अनेक नेटकऱ्यांनी रिट्वीट देखील केला आहे. काही यूझर्सनं या फोटोला 'फोटोमध्ये केवळ चारचं हत्ती दिसत आहेत', अशी कमेंट केली. हत्तींचा या फोटो पाहून अनेक नेटकरी चक्रावले आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
एका लग्नाची अनोखी गोष्ट! Google Meet वर लग्न, तर वऱ्हाडींना Zomato वरून घरपोच जेवण
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha