एका लग्नाची अनोखी गोष्ट! Google Meet वर लग्न, तर वऱ्हाडींना Zomato वरून घरपोच जेवण
पश्चिम बंगालमधील एका जोडप्यानं ऑनलाइन वेडिंग या भन्नाट कल्पनेचा वापर केला आहे. 400 लोक त्यांच्या लग्न सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
Trending News : सध्या कोरोनामुळे अनेक लोक लग्न समारंभ किंवा वेगळे कार्यक्रम हे मर्यादित लोकांच्या उपस्थितीत साजरे करत आहेत. लग्न समारंभामध्ये विविध नियमांचे पालन केले जात आहे. केवळ जवळच्या लोकांच्या तसेच मित्र- मैत्रिणींच्या उपस्थितीत लग्न सोहळा पार पाडण्याचा निर्णय अनेक कपल्सनं घेतला आहे. सध्या शिक्षण तसेच ऑफिसचं काम हे ऑनलाइन पद्धतीनचं होत आहे. Google Meet या अॅपचा वापर लोक ऑनलाइन पद्धतीनं शिक्षण घेण्यासाठी तसेच ऑफिसच्या मिटिंग्ससाठी करत आहेत. नुकताच पश्चिम बंगालमधील (west bengal) एका जोडप्यानं ऑनलाइन वेडिंग या भन्नाट कल्पनेचा वापर केला आहे. 400 लोक त्यांच्या लग्न सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
400 लोक असणार लग्न सोहळ्याला उपस्थित
पश्चिम बंगालमधील संदीपन सरकार आणि अदिती दास यांचा आज (24 जानेवारी) विवाह सोहळा पार पडणार आहे. यांच्या विवाह सोहळ्याला 50 नाही 100 नाही तर 400 लोक उपस्थिती राहणार आहेत. संदीपन आणि अदिती यांच्या कुटुंबातील 100 लोक हे लग्न सोहळ्याच्या ठिकाणी येऊन उपस्थित राहणार आहेत. तर 300 लोक हे Google Meet या अॅप वरून ऑनलाइन पद्धतीनं लग्ननाला हजेरी लावणार आहेत.
वऱ्हाडींना Zomato अॅपवरून मिळणार घरपोच जेवण
लग्न सोहळ्याला ऑनलाइन पद्धतीनं उपस्थित असणाऱ्या वऱ्हाडींना Zomato या अॅपवरून घरपोच जेवण मिळणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
आजपासून शाळेत पुन्हा किलबिलाट, राज्यात शाळा कुठे सुरु, कुठे बंद; वाचा सविस्तर
PM Modi : पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांशी साधणार संवाद, देशभरातील 29 बालकांचा सन्मान
National Girl Child Day 2022 : आज राष्ट्रीय बालिका दिन; जाणून घ्या इतिहास आणि महत्व
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha