Eka Lagnachi Pudhchi Goshta : 'एका लग्नाची पुढची गोष्ट'ने पार केला 500 प्रयोगांचा टप्पा, दिग्गजांच्या उपस्थितीत रंगला नाटकाचा प्रयोग
Eka Lagnachi Pudhchi Goshta : 'एका लग्नाची पुढची गोष्ट' या नाटकाचा 500 वा प्रयोग दीनानाथ नाट्यगृह येथे पार पडला आहे.
Eka Lagnachi Pudhchi Goshta : अभिनेते, निर्माते प्रशांत दामले (Prashant Damle) यांच्या 'एका लग्नाची पुढची गोष्ट' (Eka Lagnachi Pudhchi Goshta) या गाजलेल्या नाटकाने 500 प्रयोगांचा टप्पा पार केला आहे. या नाटकाचा 500 वा प्रयोग दीनानाथ नाट्यगृहात पार पडला आहे.
दिग्गजांच्या उपस्थितीत रंगला 500 वा प्रयोग
'एका लग्नाची पुढची गोष्ट' या नाटकाचा 500 वा प्रयोग नुकताच दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला आहे. या प्रयोगाला राज्याचे सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख अभिनेता रितेश देशमुख, भाजप आमदार आशिष शेलार आणि अभिनेता अशोक सराफ यांची प्रमुख उपस्थिती होती.
मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा
तमाम रसिक प्रेक्षकांचे प्रेम संपादित करून रंगभूमीचा बादशाह ठरलेल्या प्रशांत दामले या चतुरस्त्र अभिनेत्याच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा यानिमित्ताने रोवला गेला आहे. या नाटकाला आजवर मिळत आलेली प्रेक्षक पसंती बघता या नाटकाची घोडदौड पुढेही अशीच कायम सुरू राहील, अशा प्रयोगादरम्यान मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
'एका लग्नाची पुढची गोष्ट' नाटकात ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले मुख्य भूमिकेत आहेत. तर या नाटकात कविता मेढेकर, अतुल तोडणकर, मृणाल चेंबुरकर, प्रतिक्षा शिवणकर, राजसिंह देशमुख, पराग डांगे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. अद्वैत दादरकरने या नाटकाचे लेखन, दिग्दर्शन केले आहे.
View this post on Instagram
प्रशांत दामले आणि कविता लाड-मेढेकरची ऑनस्टेज’ केमिस्ट्री आहे कमाल!
एका लग्नाची खुमासदार आणि खुसखुशीत गोष्ट रसिकांनी चांगलीच डोक्यावर घेतली आहे. मराठी रंगभूमीवरील प्रशांत दामले आणि कविता लाड-मेढेकर ही सदाबहार जोडी आणि त्यांची ‘ऑनस्टेज’ केमिस्ट्री 'एका लग्नाची पुढची गोष्ट' या नाटकाचं खरं वैशिष्ट्य आहे. सध्या रंगभूमीवर या नाटकाचे जोरदार प्रयोग सुरू आहेत. या नाटकाचा प्रत्येक प्रयोग हाऊसफुल्ल होत असतो. हे नाटक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
संबंधित बातम्या