एक्स्प्लोर
Advertisement
योग्य पाऊस होईपर्यंत पेरणीची घाई करु नका, सरकारचं आवाहन
राज्यात योग्य पाऊस होत नाही, तोपर्यंत पेरण्यांची घाई करु नका, असं आवाहन राज्य सरकारने शेतकऱ्यांना केलं आहे.
मुंबई : मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. महाराष्ट्रातही मान्सून वेळेत दाखल होईल, असं हवामान विभागाने सांगितलं. त्यामुळे राज्यात योग्य पाऊस होत नाही, तोपर्यंत पेरण्यांची घाई करु नका, असं आवाहन राज्य सरकारने शेतकऱ्यांना केलं आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात 1 जूननंतर मान्सूनपूर्व सरी कोसळतील, असा अंदाज आहे. मात्र कमाल तापमान अधिकच असेल. या कालावधीत मुंबई आणि कोकणात ढगाळ वातावरण आणि किरकोळ पाऊस पडेल. या कालावधीत विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळ आणि विजांपासून नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.
या कालावधीत झाडांखाली, मोकळ्या जागेत, पत्र्याच्या शेडखाली, वीजप्रवाह असलेल्या तारांखाली किंवा विद्युत रोहित्रांजवळ आसरा घेऊ नये, तर सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा, असा सल्लाही देण्यात आला आहे.
केरळमध्ये मान्सून दाखल, राज्यातही लवकरच
केरळमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. इथल्या सगळ्या हवामान केंद्रांवर पावसाची नोंद करण्यात आली. मान्सूनचे सगळे निकष पडताळल्यानंतर हवामान विभागानं मान्सून आल्याचं जाहीर केलं.
गेल्या वर्षी 30 मे रोजी मान्सून केरळात दाखल झाला होता.
स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने आधीच मान्सून आल्याचं जाहीर केलं होतं.
यंदा मान्सून हा नेहमीपेक्षा 2 दिवस आधीच दाखल झालाय. 6 ते 10 जूनच्या दरम्यान मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल अशी तज्ञांना आशा आहे.
केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर साधारण पुढच्या सात दिवसांत तो महाराष्ट्रात धडकतो. मान्सूनच्या पुढील प्रवासासाठी वातावरण अनुकूल असल्याने राज्यातही मान्सूनचं वेळेत आगमन होईल असं म्हटलं जात आहे.
यंदा मान्सून हा सरासरी इतका राहिल असं भाकीत हवामान संस्थेने आधीच वर्तवलंय..त्यामुळे बळीराजामध्ये आनंदाचं वातावरण आहे.
संबंधित बातम्या :
मान्सून केरळमध्ये डेरेदाखल, महाराष्ट्रात लवकरच पाऊस येणार
आला रे! मान्सून अंदमानात दाखल
यंदा सरासरीच्या 97 टक्के पाऊस, IMD ची गुड न्यूज!
मान्सून आणि पूर्व मान्सून कसा ओळखाल?
राजा गादीवर कायम, पाऊस सर्वसाधारण, भेंडवळची भविष्यवाणी
यंदा चांगला पाऊस पडणार, स्कायमेटची गुड न्यूज!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
सांगली
निवडणूक
Advertisement