एक्स्प्लोर

Shirpur ATM Robbery : दुपारी एटीएम मशीन पैशांनी भरलं, पहाटे चोरट्यांनी फोडलं, मात्र त्याचवेळी मुंबई ब्रँचला कळालं

Shirpur ATM Robbery : आज पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांकडून धुळ्यातील एसबीआय बँकेचे एटीएम (ATM Robbery) फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Shirpur ATM Robbery : धुळे (Dhule) जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील (Shirpur) बोराडी येथील भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (Bank Of India) समोरील एसबीआय बँकेचे एटीएम (ATM Robbery) आज पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला. एटीएम मशीन फुटत असल्याचे मुंबई येथील कार्यालयात कळताच त्यांनी तात्काळ शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात आणि गावातील नागरिकांना कळवल्यामुळे पुढील अनर्थ टळला. 

शिरपूर तालुक्यातील बोराडी बस स्थानकाजवळील (Boradi Bus Stand) भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेच्या समोरील एटीएम मशीन पहाटेच्या सुमारास फोडण्याचा प्रयत्न अज्ञात व्यक्तींनी केल्याचे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे. एटीएम मशीन रुममध्ये प्रवेश करण्याआधी चोरट्यांनी बाहेरील आणि आतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात काळ्या रंगाचा स्प्रे मारला. एटीएम मशीन रुममध्ये प्रवेश करतांना हातात छत्री घेऊन चेहरा लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच एटीएम मशीन फोडण्यासाठी कटरसारख्या हत्याराच्या साहाय्याने एटीएम मशीन कापण्याचा प्रयत्न करण्यात आला. हे सर्व मुंबई (Mumbai)  येथील कार्यालयात कळताच त्यांनी तात्काळ शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात आणि गावातील नागरिकांना कळल्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे.
         
बोराडी बस्थानकाजवळ असलेल्या भारतीय स्टेट बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार बँकेच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला  आहे. फोडण्यासाठी आलेल्या चोरटा सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. चोरट्यांनी लाल व काळया रंगाचा शर्ट घातला आहे. एकाच्या हातात छत्री व दुसऱ्याच्या हातात काळ्या रंगाचा स्प्रे व एटीएम मशीन फोडण्यासाठीचे साहित्य असल्याचे दिसून येत आहे. दोघांनी तोंडाला मास्क लावले होते. मात्र एटीएममध्ये चोरी होत असल्याचा प्रकार मुंबई येथील शाखेत कळताच पोलिसांना घटनेची माहिती कळविण्यात आली. पोलिस येत असल्याचे लक्षात येताच चोरट्यांनी धूम ठोकली. एसबीआयचे एटीएम मशीन फोडण्याचे दुसऱ्यांदा प्रयत्न केला आहे.

अन्य सीसीटीव्हीचे फुटेजचे संकलन सुरू

दरम्यान मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडलेली ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. विशेष म्हणजे दुपारीच या एटीएममध्ये पैसे टाकण्यात आले होते. लागलीच पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र बँकेच्या मुंबई कार्यालयाच्या समयसूचकतेने हा प्रयत्न फसला. पोलीस येत असल्याचे कळल्यावर त्यांनी एटीएममधून पळ काढला. त्यामुळे एटीएममधील सर्व रक्कम सुरक्षित असल्याचे पोलिसांनी सांगितले. एटीएम मशीन फोडण्याची घटनेची माहिती मिळताच शिरपूर तालुका पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे, सदिप पाटील, कैलास, योगेश मोरे, सुरेश ठाकूरसह पथकाने भेट देऊन पाहणी केली. व पुढील तपास करण्यासाठी गावातील इतर सीसीटीव्ही कॅमेराची चौकशी सुरू करण्यात आली आहे. चोरट्यांना जेलबंद करण्यासाठी पथक तपास करीत आहेत. रात्री उशिरापर्यंत दाखल करण्याचे काम सुरू होते.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महापालिका किंवा ग्रामपंचायतीच्या हद्दीत नसलेल्या गावांसाठी मोठा निर्णय, समस्या दूर करण्यासाठी समिती गठीत
महापालिका किंवा ग्रामपंचायतीच्या हद्दीत नसलेल्या गावांसाठी मोठा निर्णय, समस्या दूर करण्यासाठी समिती गठीत
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या 26000 घरांच्या किमती अखेर जाहीर! 25 लाखांपासून 97 लाखांपर्यंत घरांच्या किमती, अर्ज करण्याची संधी चुकवू नका
सिडकोच्या 26000 घरांच्या किमती अखेर जाहीर! 25 लाखांपासून 97 लाखांपर्यंत घरांच्या किमती, अर्ज करण्याची शेवटची संधी
Santosh Deshmukh Family Meet Devendra Fadnavis : संतोष देशमुखांचे कुटुंबीय फडणवीसांच्या भेटीला
Santosh Deshmukh Family Meet Devendra Fadnavis : संतोष देशमुखांचे कुटुंबीय फडणवीसांच्या भेटीला
Mumbai University : विद्यापीठांच्या शैक्षणिक वेळापत्रकाची माहिती विद्यार्थ्यांना सुरुवातीलाच द्या; राज्यपालांची कुलगुरूंना सूचना
विद्यापीठांच्या शैक्षणिक वेळापत्रकाची माहिती विद्यार्थ्यांना सुरुवातीलाच द्या; राज्यपालांची कुलगुरूंना सूचना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 630AM  Headlines 630 AM 08 January 2025 सकाळी ६.३० च्या हेडलाईन्सDelhi Vidhan Sabha Election : आप तिसऱ्यांदा सत्तेत की भाजप रोखणार 'आप'चा रथ? Special ReportSpecial Report Sambhajinagar : प्रतिष्ठेसाठी नात्याचा कडेलोट, संभाजीनगरात सैराट प्रकरणTorres Company Scam : पैशांची आस गुंतवणूकदारांना चुना; Torres Scam ची इनसाडईड स्टोरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महापालिका किंवा ग्रामपंचायतीच्या हद्दीत नसलेल्या गावांसाठी मोठा निर्णय, समस्या दूर करण्यासाठी समिती गठीत
महापालिका किंवा ग्रामपंचायतीच्या हद्दीत नसलेल्या गावांसाठी मोठा निर्णय, समस्या दूर करण्यासाठी समिती गठीत
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या 26000 घरांच्या किमती अखेर जाहीर! 25 लाखांपासून 97 लाखांपर्यंत घरांच्या किमती, अर्ज करण्याची संधी चुकवू नका
सिडकोच्या 26000 घरांच्या किमती अखेर जाहीर! 25 लाखांपासून 97 लाखांपर्यंत घरांच्या किमती, अर्ज करण्याची शेवटची संधी
Santosh Deshmukh Family Meet Devendra Fadnavis : संतोष देशमुखांचे कुटुंबीय फडणवीसांच्या भेटीला
Santosh Deshmukh Family Meet Devendra Fadnavis : संतोष देशमुखांचे कुटुंबीय फडणवीसांच्या भेटीला
Mumbai University : विद्यापीठांच्या शैक्षणिक वेळापत्रकाची माहिती विद्यार्थ्यांना सुरुवातीलाच द्या; राज्यपालांची कुलगुरूंना सूचना
विद्यापीठांच्या शैक्षणिक वेळापत्रकाची माहिती विद्यार्थ्यांना सुरुवातीलाच द्या; राज्यपालांची कुलगुरूंना सूचना
Aaditya Thackeray:कोस्टल रोड,मराठी शाळा ते लग्नाचा प्रश्न,Vision Mumbai आदित्य ठाकरेंची हटके मुलाखत
Aaditya Thackeray:कोस्टल रोड,मराठी शाळा ते लग्नाचा प्रश्न,Vision Mumbai आदित्य ठाकरेंची हटके मुलाखत
Bacchu Kadu: ऐकलं तर ठीक नाही तर 'हटा सावन की घटा'; शेतकरी, मेंढपाळांच्या आंदोलनातून बच्चू कडूंचा सरकारवर 'प्रहार'   
ऐकलं तर ठीक नाही तर 'हटा सावन की घटा'; शेतकरी, मेंढपाळांच्या आंदोलनातून बच्चू कडूंचा सरकारवर 'प्रहार'   
Nashik News : सनई, चौघडे वाजणाऱ्या घरातून निघाल्या दोन अंत्ययात्रा; मुलाच्या लग्नाआधी आई-वडिलांनी संपवलं जीवन, रात्रीचं जेवण ठरलं शेवटचं
सनई, चौघडे वाजणाऱ्या घरातून निघाल्या दोन अंत्ययात्रा; मुलाच्या लग्नाआधी आई-वडिलांनी संपवलं जीवन, रात्रीचं जेवण ठरलं शेवटचं
मनोज जरांगे पाटील, अंजली दमानियांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; गुन्हा दाखल, नेमकं काय आहे कारण?
मनोज जरांगे पाटील, अंजली दमानियांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; गुन्हा दाखल, नेमकं काय आहे कारण?
Embed widget