एक्स्प्लोर

अजित पवारांना दूर लोटण्याचं काम केलं तर...; राऊतांच्या 'त्या' वक्तव्यावर नेमकं काय म्हणाले जयंत पाटील?

Jayant Patil on Ajit Pawar : विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीतून बाहेर पडावे, यासाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून प्रयत्न सुरु असल्याची चर्चा रंगली आहे.

धुळे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) जागावाटपापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी महायुतीतून (Mahayuti) बाहेर पडावे, यासाठी भाजप (BJP) आणि शिवसेना शिंदे गटाकडून (Shiv Sena Shinde Group) प्रयत्न सुरु असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप अजित पवारांचा (Ajit Pawar) काटा काढणार असल्याचे त्यांनी म्हटले. आता यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी देखील भाजपवर निशाणा साधला आहे.  

आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून महायुतीत  जोरदार रस्सीखेच सुरु आहे. भाजप, अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट आपाल्या पदरात जास्तीत जास्त जागा पाडून घेण्यासाठी प्रयत्नशील करत आहेत. त्यातच भाजप नेत्यांनी कुठल्याही परिस्थितीत 160 जागा लढवण्याचा निर्धार केल्याचे समजते. त्यामुळे शिंदे गट आणि अजित पवार गटापैकी एकाला जागावाटपात नमते घ्यावे लागणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटाने जागावाटपाच्या अंतिम टप्प्यात अजित पवार हे महायुतीमधून बाहेर पडल्यास आपल्याला अधिकाअधिक जागा लढवता येतील, अशी रणनीती आखल्याचे एका वृत्तपत्राने म्हटले आहे. 

अजित पवारांना दूर लोटण्याचं काम केलं तर...

यावरून संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदे हे अजित पवारांना दूर लोटण्याचं काम करत करत असल्याचे वक्तव्य केले होते. याबाबत जयंत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, महायुतीला विधानसभेच्या निवडणुका एक संघ राहून लढवाव्या लागतील. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील दोन पक्ष फोडल्याचे केलेले काम हे त्यांना भरावं लागणार आहे. जर त्यांनी अजित पवारांना दूर लोटण्याचं काम केलं तर हे महाराष्ट्रातील जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी केलेलं नाटक असेल, त्यापलीकडे त्याला काही महत्त्व नाही. ते कोणीही एकमेकांना सोडू शकत नाही. ते एकच आहेत आणि एकच राहतील, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे. 

नेमकं काय म्हणाले होते संजय राऊत? 

अजित पवार यांना दूर लोटण्याचा कार्यक्रम आता भाजपने सुरु केला आहे. त्यामध्ये मिंधे गटाचे काही नेते सामील आहेत. अजित पवार यांना बाहेर काढलं तर जास्त जागा लढवता येतील, हे यामागील राजकारण आहे. अजित पवार काकांशी बेईमानी करुन आणि इतका मोठा धोका पत्कारुन भाजपसोबत आले. पण, आता त्यांची गरज संपली आहे. त्यामुळे अजित पवार यांना अडचणीत आणणारी वक्तव्यं आणि भूमिका भाजप व शिंदे गटाकडून घेतल्या जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.

आणखी वाचा 

जरांगेंकडे मतांची बेरीज करण्यासाठी संभाजी भोसले आलेला आहे; नवनाथ वाघमारेंचा संभाजीराजेंवर घणाघात

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापुरात करवीर, सांगलीत जयंत पाटलांच्या इस्लामपुरात मतदानाचा जोर; कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात किती टक्के मतदान?
कोल्हापुरात करवीर, सांगलीत जयंत पाटलांच्या इस्लामपुरात मतदानाचा जोर; कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात किती टक्के मतदान?
राज्यात 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान? सविस्तर माहिती एका क्लिकवर 
राज्यात 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान? सविस्तर माहिती एका क्लिकवर 
राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के, गडचिरोलीनेच मारली बाजी, तुमच्या जिल्ह्यात किती मतदान?
राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के, गडचिरोलीनेच मारली बाजी, तुमच्या जिल्ह्यात किती मतदान?
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये आतापर्यंत झिरवाळांच्या दिंडोरीत सर्वाधिक मतदान, येवला, नांदगावात किती? पाहा 15 मतदारसंघांची टक्केवारी
नाशिकमध्ये आतापर्यंत झिरवाळांच्या दिंडोरीत सर्वाधिक मतदान, येवला, नांदगावात किती? पाहा 15 मतदारसंघांची टक्केवारी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde : महाराष्ट्राला उज्ज्वल भवितव्याकडे नेणारा उत्सव;सर्व मतदारांनी सहभागी व्हा - शिंदेSanjay Raut Vidhan Sabha Election : मिंधे गटाने पैसे वाटपासाठी खास माणसं ठेवली - संजय राऊतDevendra Fadnavis On Vidhan Sabha : यंदा महिला मतदार गॅप भरु काढतील; फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्यSharad Pawar Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्राचं भवितव्य नागरिकांच्या मतांमध्ये - शरद पवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापुरात करवीर, सांगलीत जयंत पाटलांच्या इस्लामपुरात मतदानाचा जोर; कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात किती टक्के मतदान?
कोल्हापुरात करवीर, सांगलीत जयंत पाटलांच्या इस्लामपुरात मतदानाचा जोर; कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात किती टक्के मतदान?
राज्यात 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान? सविस्तर माहिती एका क्लिकवर 
राज्यात 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान? सविस्तर माहिती एका क्लिकवर 
राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के, गडचिरोलीनेच मारली बाजी, तुमच्या जिल्ह्यात किती मतदान?
राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के, गडचिरोलीनेच मारली बाजी, तुमच्या जिल्ह्यात किती मतदान?
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये आतापर्यंत झिरवाळांच्या दिंडोरीत सर्वाधिक मतदान, येवला, नांदगावात किती? पाहा 15 मतदारसंघांची टक्केवारी
नाशिकमध्ये आतापर्यंत झिरवाळांच्या दिंडोरीत सर्वाधिक मतदान, येवला, नांदगावात किती? पाहा 15 मतदारसंघांची टक्केवारी
बारामतीत कार्यकर्त्यांत जुंपली; आरोप फेटाळत अजित पवार म्हणाले, माझ्याही पोलिंग एजंटला बाहेर काढलं
बारामतीत कार्यकर्त्यांत जुंपली; आरोप फेटाळत अजित पवार म्हणाले, माझ्याही पोलिंग एजंटला बाहेर काढलं
Praniti Shinde : प्रणिती शिंदे भाजपच्या बी टीम, भाजपसोबत हातमिळवणी केली, शिंदे कुटुंबाने केसाने गळा कापला; ठाकरे गटाचा सडकून प्रहार
प्रणिती शिंदे भाजपच्या बी टीम, भाजपसोबत हातमिळवणी केली, शिंदे कुटुंबाने केसाने गळा कापला; ठाकरे गटाचा सडकून प्रहार
Suhas Kande vs Sameer Bhujbal : आधी म्हणाले, आज तुझा म#$ फिक्स, आता सुहास कांदे म्हणतात, 'मी समीरभाऊंचं नाव घेऊन धमकी दिली नव्हती'
आधी म्हणाले, आज तुझा म#$ फिक्स, आता सुहास कांदे म्हणतात, 'मी समीरभाऊंचं नाव घेऊन धमकी दिली नव्हती'
Narayan Rane on Vinod Tawde: विनोद तावडेंबाबत नारायण राणेंचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले, 'त्यांना दिलेली वागणूक मला आवडली नाही'
विनोद तावडेंबाबत नारायण राणेंचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले, 'त्यांना दिलेली वागणूक मला आवडली नाही'
Embed widget