जरांगेंकडे मतांची बेरीज करण्यासाठी संभाजी भोसले आलेला आहे; नवनाथ वाघमारेंचा संभाजीराजेंवर घणाघात
संभाजीराजे भोसले यांनी ओबीसी विषयी असलेला द्वेष दाखवून दिला. असे म्हणत नवनाथ वाघमारे यांनी संभाजीराजे छत्रपती यांनी घणाघात केलाय.
![जरांगेंकडे मतांची बेरीज करण्यासाठी संभाजी भोसले आलेला आहे; नवनाथ वाघमारेंचा संभाजीराजेंवर घणाघात Navnath waghmare on sambhajiraje chhatrapati presence on Manoj Jarange protest OBC reservation Maharashtra Politics जरांगेंकडे मतांची बेरीज करण्यासाठी संभाजी भोसले आलेला आहे; नवनाथ वाघमारेंचा संभाजीराजेंवर घणाघात](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/23/f5bace6b60e0da4b6b051f68559f424d17270822485871063_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Jalna:मराठवाड्यात सध्या राजकीय घडामोडपडींना वेग आला असून मराठा आरक्षणाच्या मागणीचे केंद्रबिंदू असणाऱ्या अंतरवली सराटीत मनोज जरांगेंच्या भेटीला संभाजीराजे छत्रपती आले आहेत. मराठा ओबीसी आरक्षणाच्या मुद्दयावरून संभाजीराजे छत्रपतींनी मनोज जरांगेंच्या विरोधात दुसऱ्या गावात मुद्दाम आंदोलन उभारणं हे मला पटलेलं नाही असं वक्तव्य केल्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनीही लगेच त्यांना प्रत्युत्तर दिल्याचे दिसले.
छत्रपती संभाजीराजांना शोषितांचा कळवळा नाही. ते राजकारणासाठीच आंदोलनात आले असल्याचे आंदोलक लक्ष्मण हाके म्हणाले. संभाजीराजे तुम्हाला राजे म्हणायला लाज वाटते. छत्रपती शाहू राजांचे आणि शिवरायांचेदखील तुम्ही वारस नाहीत असेही हाके म्हणाले. तर जरांगेंकडे मतांची बेरीज करण्यासाठी संभाजी भोसले आलेला आहे असं म्हणत नवनाथ वाघमारेंनी संभाजीराजे छत्रपतींवर घणाघात केला. जरांगे यांनी संभाजीराजे तुम्ही अवकातीत आणि जनतेच्या हिताचं बोला असा इशारा हाकेंनी दिला.
नवनाथ वाघमारे म्हणाले...
जरांगेंकडे मतांची बेरीज करण्यासाठी संभाजी भोसले आलेला आहे. आमच्या शिव्या सुरु झाल्या तर जातीयवादी मराठ्यांच्या नेत्याच्या अंगावर कपडेसुद्धा राहणार नाहीत असा इशारा नवनाथ वाघमारे यांनी दिलाय. संभाजीराजे भोसले यांनी ओबीसी विषयी असलेला द्वेष दाखवून दिला. राजा रयतेचा असतो प्रजेचा असतो तो एका जातीचा नसतो. आमचे कॉलिंग वाली नाही का आमचे सरकार नाही का? असा सवालही वाघमारे यांनी केला. जरांगेकडे मताची बेरीज करण्यासाठी संभाजी भोसले आलेला आहे. आमच्या शिव्या सुरू झाल्या तर जातीवादी मराठ्यांच्या नेत्याच्या अंगावर कपडे सुद्धा राहणार नाहीत.
संभाजी भोसले तुम्हाला आम्ही राजे का म्हणायचं?
छत्रपती शिवरायांच्या शाहू महाराजांचा वैचारिक वारसा असता तर तुम्ही या अठरापगड जातीच्या भटक्यांच्या निमित्तांच्या आंदोलनात भेट दिली असती. राजा हा राजा राणीच्या पोटातून नाही आंबेडकरांच्या संविधानातून जन्माला येतो.इथून पुढे ओबीसीची जनता तुम्हाला राजा म्हणणार नाही. ओबीसी नेते जोपर्यंत दबावत राहतील तेव्हा जरांगे तुमच्या मानगुटीवर बसेल. ओबीसी नेत्यांनो जर तुम्ही या लोकांच्या दबाव खाली राहाल तर तुमचा अस्तित्व संपवलं जाईल या महाराष्ट्रामधून. चार दिवसापूर्वी चार सलाईन लावणारा जरांगे , याच उपोषण कधीचं संपलं असंही लक्ष्मण हाके म्हणाले.
काय म्हणाले लक्ष्मण हाके?
छत्रपती संभाजी राजांना शोषितांचा कळवळा नाही राजकारणासाठीच हे आंदोलन करण्यात आलेले आहे.संभाजी राजे तुम्ही बीडमध्ये आरत्या करत होतात का मराठवाड्यातल्या बारा बलुतेदार दुकानावर हल्ले केले नाभिक समाजाच्या दुकानावरती हल्ले केले हे कशात बसतो संभाजी राजे? असा सवाल त्यांनी केला.संभाजी राजे तुम्हाला राजे म्हणायला लाज वाटते तुम्ही छत्रपती शाहू राजांचे आणि शिवरायांचे देखील वारस नाहीत. मिस्टर संभाजी भोसले तुम्ही राजश्री शाहू महाराजांचे वैचारिक वारस नाहीत माफी मागतो की रयत तुम्हाला राजा मानणार नाही. असं ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)