एक्स्प्लोर

Dhule News : "माझ्या मागे गुंड लागले आहेत, मला मदत करा," व्हॉट्सअॅपवर मेसेज केल्यानंतर दोन तासांनी महावितरण कर्मचाऱ्याचा मृतदेह तापी नदीपात्रात आढळला

Dhule News : धुळे जिल्ह्यातील बाळदे महावितरण सबस्टेशनच्या कार्यालयात कार्यरत असलेल्या सीनिअर ऑपरेटरचा मृतदेह तापी नदीपात्रात आढळल्याने खळबळ उडाली आहे.

Dhule News : धुळे (Dhule) जिल्ह्यातील बाळदे महावितरण (Mahavitaran) सबस्टेशनच्या कार्यालयात कार्यरत असलेल्या सीनिअर ऑपरेटरचा मृतदेह तापी नदीपात्रात (Tapi River) आढळल्याने खळबळ उडाली आहे. शिरपूर तालुक्यात ही घटना घडली. प्रवीण गवते असं मृत कर्मचाऱ्याचं नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे मृत्यूपूर्वी "माझ्या मागे गुंड लागले आहेत, काय करु सुचत नाही" असा व्हॉट्सअॅप ग्रुपवर (WhatsApp Group) पाठवला होता. त्यानंतर दोन तासात त्यांचा मृतदेह तापी नदीपात्रात आढळून आला.

दुपारी तीनच्या सुमारास मेसेज, पाच वाजता मृतदेह तापी नदीत आढळला

शिरपूर तालुक्यातील बाळदे इथल्या सबस्टेशनमध्ये  प्रवीण विजय गवते (वय 42 वर्षे, रा.चिमठाणे ता. शिंदखेडा) हे सीनिअर ऑपरेटर म्हणून कार्यरत होते. त्यांची दुचाकी काल (4 जून) दुपारी गिधाडे तापी नदीपुलावर बेवारस स्थितीत आढळून आली होती. प्रवीण गवते यांची रात्रपाळी असल्याने ते रात्रीपासून बाळदे इथल्या सबस्टेशनवर होते. काल सकाळी 8:30 वाजता ते घरी चिमठाणे इथे जाण्यासाठी निघाले होते. मात्र दुपारी 2 वाजून 52 मिनिटांनी त्यांनी व्हॉट्सॲप ग्रुपवर एक मेसेज टाकला. या मेसेजनंतर दोन तासांनी त्यांचा मृतदेह तापी नदीत आढळला. 

व्हॉट्सअॅप ग्रुपवरील मेसेजमध्ये काय म्हटलं?

प्रवीण गवते यांनी व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये केलेल्या मेसेजमध्ये म्हटलं की, "माझ्या मागे 4 ते 5 गुंड मुलं लागली असून ती सर्व अनोळखी आहेत. मला काहीच सुचत नाही. माझ्यासोबत तीन लाख रुपये आहेत, मी कसा तरी स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करत असून मला मदत करा." 

दोन तासांनी मृतदेह नदीपात्रात सापडला

ग्रुपमधील मेसेज वाचून त्यांना संपर्क देखील साधण्यात आला होता. मात्र यानंतर त्यांची दुचाकी गिधाडे तापी पुलावर आढळून आली होती. त्यांचा गिधाडे तापी नदीपात्रात शोध सुरु केला असता साडेचार ते पाच वाजेच्या सुमारास प्रवीण गवते यांचा मृतदेह तापी नदीपात्रात आढळून आला. त्यांचा मृतदेह शिंदखेडा येथील रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला आहे. 

मेसेजमुळे तर्कवितर्क

दरम्यान प्रवीण गवते यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवरील मेसेजमुळे अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. प्रवीण गवते यांच्या मागे लागलेले गुंड कुठे गेले? त्यांनी आत्महत्या केली की स्वत:चा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात चुकून नदीपात्रात उडी मारली. शिवाय आपल्याकडे तीन लाख रुपये असल्याचं त्यांनी मेसेजमध्ये लिहिलं होतं, ते पैसे कुठे आहेत, असे प्रश्नही उपस्थित होत आहेत.

हेही वाचा

Dhule News: आई-वडिलांची माफी मागितली अन् हॉस्टेलमध्येच विद्यार्थीनीने टोकाचं पाऊल उचललं

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dhule News: धुळ्यात अविवाहित तरुणीचा गर्भपाताच्या गोळ्यांच्या अतिसेवनाने मृत्यू; रक्तदाब कमी झाला, झटके आले अन्...
धुळ्यात अविवाहित तरुणीचा गर्भपाताच्या गोळ्यांच्या अतिसेवनाने मृत्यू; रक्तदाब कमी झाला, झटके आले अन्...
सप्तशृंगी गडाकडे पायी चालणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; कारने चिरडल्याने महिला ठार, दोन भाविक जखमी
सप्तशृंगी गडाकडे पायी चालणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; कारने चिरडल्याने महिला ठार, दोन भाविक जखमी
लग्नाच्या एक दिवस आधीच नवरदेवावर काळाचा घाला, विजेचा धक्का लागल्यानं मृत्यू, आईचा एकुलता एक आधार हरपला
लग्नाच्या एक दिवस आधीच नवरदेवावर काळाचा घाला, विजेचा धक्का लागल्यानं मृत्यू, आईचा एकुलता एक आधार हरपला
धुळ्यात लग्नाचे आमिष दाखवून लुटणारी टोळी सक्रीय, तरुणाची 3 लाख 25 हजारांची फसवणूक, नवरी दागिने घेऊन फरार
धुळ्यात लग्नाचे आमिष दाखवून लुटणारी टोळी सक्रीय, तरुणाची 3 लाख 25 हजारांची फसवणूक, नवरी दागिने घेऊन फरार

व्हिडीओ

Sandeep Deshpande On Pratap Sarnaik : मंत्रिपद धोक्यात, प्रताप सरनाईक सारखा कुंभकर्ण जागा झालाय
Anjali Damania On Ashok Kharat : अशोक खरातला कॉल, राजकीय बवाल Special Report
Nashik TCS Issue : 'कॉर्पोरेट जिहाद' नाशकात म्होरक्या मलेशियात? Special Report
Amravati Paratwada Case : बुलडोझर घरावर, राजकारण धर्मावर Special Report
Sunetra Pawar Prachar : काकींचा प्रचार, विलिनीकरणाची किनार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Suryakumar Yadav : रोहित दुखापतीमुळं संघाबाहेर सूर्यकुमार यादवचा खराब फॉर्म कायम, पहिल्याच बॉलवर बाद, अर्शदीप सिंगचा धमाका
सूर्यकुमार यादवचा खराब फॉर्म कायम, पहिल्याच बॉलवर बाद,अर्शदीप सिंगचा धमाका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 एप्रिल 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 एप्रिल 2026 | गुरुवार
Priyanka Gandhi : 543 मध्येच 33 टक्के आरक्षण का देत नाही, आजचं मंजूर होईल, शुभ काम होईल, काळा टिळा कामात येईल : प्रियांका गांधी
आज जर चाणक्य जिवंत असते तर तुमची राजकीय कुटिलता पाहून आश्चर्यचकित झाले असते, प्रियांका गांधींचा टोला
पुन्हा ट्रान्सफर... IAS जी श्रीकांत यांची 15 दिवसांत दुसरी बदली; राज्यातील 4 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या
पुन्हा ट्रान्सफर... IAS जी श्रीकांत यांची 15 दिवसांत दुसरी बदली; राज्यातील 4 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या
'मुलगा तुझ्यासारखा दिसत नाही' म्हणत गावकऱ्यांचे वारंवार टोमणे, निर्दयी जन्मदात्या बापानं पोटच्या सहा वर्षाच्या लेकराला मारलं; एक महिन्यानंतर थरकाप उघडकीस
'मुलगा तुझ्यासारखा दिसत नाही' म्हणत गावकऱ्यांचे वारंवार टोमणे, निर्दयी जन्मदात्या बापानं पोटच्या सहा वर्षाच्या लेकराला मारलं; एक महिन्यानंतर थरकाप उघडकीस
Amit Shah : 2029 पर्यंत ज्या निवडणुका होतील, त्या जुन्याच जागांप्रमाणं होतील; दक्षिण भारतात किती जागा वाढणार, अमित शाहांनी समजावून सांगितलं
2029 पर्यंत ज्या निवडणुका होतील, त्या जुन्याच जागांप्रमाणं होतील: अमित शाह
अशोक खरातच्या फरार पत्नीच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली; कोर्टाकडून नवी तारीख, नेमकं काय घडलं?
अशोक खरातच्या फरार पत्नीच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली; कोर्टाकडून नवी तारीख, नेमकं काय घडलं?
'तर आपण त्यांना काय सांगावे?' निवडणुकीत सक्तीच्या मतदानाची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
'तर आपण त्यांना काय सांगावे?' निवडणुकीत सक्तीच्या मतदानाची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
Embed widget