एक्स्प्लोर

Dhule News: आई-वडिलांची माफी मागितली अन् हॉस्टेलमध्येच विद्यार्थीनीने टोकाचं पाऊल उचललं

Dhule Crime News: एलएलबीच्या विद्यार्थीनीने वसतिगृहात आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना आज घडलीय.

Dhule Crime News:  धुळे शहरातील (Dhule) देवपूर भागात असलेल्या विद्या भवन महिला वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थीनीने टोकाचे पाऊल उचलत आयुष्य संपवलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज येथील एलएलबीच्या पहिल्या वर्षाला शिकत असलेल्या साक्री तालुक्यातील दातर्ती गावातील एका विद्यार्थिनीने आज दुपारच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

भारती अमृत चौरे (वय 23) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव असून ही विद्यार्थिनी साक्री तालुक्यातील दातर्ती गावातील राहणारी आहे. ती सध्या धुळे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज येथे एलएलबीच्या पहिल्या वर्षाला शिकत होती. या विद्यार्थिनीने दोन महिन्यापूर्वीच महिला वसतिगृहात प्रवेश घेतला होता. कालच, सोमवारी ती पुन्हा वसतिगृहात आली होती. तिच्या रूम वरील मैत्रीण ही गावाला गेली होती म्हणून ती काल पासून रूममध्ये एकटीच होती. ही संधी साधून आज भारती चौरे हिने आज सकाळच्या सुमारास हॉस्टेल मधील रूममध्ये असलेल्या पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली असल्याची माहिती आहे.

आज दुपारच्या सुमारास भारती चौरे हिची मैत्रीण तिला बोलवण्यासाठी रुमवर गेली. त्यावेळी तिने दरवाजा उघडलाच नाही. तिच्या मैत्रिणीला शंका आल्यामुळे तिने खिडकीमधून पाहिले तर भारती चौरे हिने दोरीच्या साह्याने पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली होती. तिने लागलीच वसतिगृहाच्या व्यवस्थापकांना सगळा प्रकार सांगितला. यावेळी हॉस्टेलमध्ये असलेल्या सर्वच विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

सुसाई़ड नोट सापडली...

यानंतर घटनेची माहिती मिळताच देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस  वसतिगृहामध्ये दाखल झाले. त्यांनी रूम तोडून आतमध्ये प्रवेश केला. खोलीमध्ये भारती चौरे हिने लिहिलेली एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती. यामध्ये तिने 'आई पप्पा सॉरी' असे म्हटले होते. या सुसाईड नोटमध्ये ती खूप तणावात असल्याची माहिती मिळाली. त्यातून  तिने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे संपूर्ण हॉस्टेलमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.  भारती चौरेंचा मृतदेह शवविच्छेदनासाठी धुळे जिल्हा रुग्णालय येथे पाठवण्यात आला आहे. 

फोटो काढण्याच्या मोहाने घात केला; शहापुरात नदीत बुडून युवकाचा मृत्यू

नदीपात्रात फोटो काढण्याच्या मोहाने एका तरुणाचा घात केला. नदीपात्रात फोटो काढण्यासाठी गेलेल्या युवकाचा मृत्यू झाला आहे. करण अशोक फर्डे असे या 18 वर्षीय तरुणाचे नाव आहे. करण आपल्या मित्रांसह आंघोळीसाठी सोमवारी (10 एप्रिल) नदीवर गेला होता. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

शहापूर तालुक्यातील (Shahapur) शिवनेर (Shivner) या गावातील  काही युवक आंघोळीसाठी नदीवर गेले. पोहण्यासाठी नदीपात्रात उतरले मात्र मोबाईल कॅमेरात (Mobile Camera) फोटो काढण्याच्या नादात पाण्याचा अंदाज न आल्याने करणचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.

महत्त्वाच्या बातम्या

तुळजापुरात प्रेमप्रकरणाच्या संशयातून दोघांना अमानुष मारहाण; एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी, 6 जणांविरुद्ध गु्न्हा दाखल
तुळजापुरात प्रेमप्रकरणाच्या संशयातून दोघांना अमानुष मारहाण; एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी, 6 जणांविरुद्ध गु्न्हा दाखल
Sahar Shaikh Aurangzeb Controversy : 'इतिहास कधीही पुसला जाऊ शकत नाही': AIMIM च्या सहर शेख वादाच्या भोवऱ्यात, औरंगजेब जयंतीच्या शुभेच्छा दिल्या अन्...., नेमकं काय आहे प्रकरण?
'इतिहास कधीही पुसला जाऊ शकत नाही': AIMIM च्या सहर शेख वादाच्या भोवऱ्यात, औरंगजेब जयंतीच्या शुभेच्छा दिल्या अन्...., नेमकं काय आहे प्रकरण?
Payal Pawar Zhambre Death Case Pune: पायल झांबरे मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट, सासू-सासऱ्यांना पोलिसांनी केली अटक, पतीला 4 दिवसांची पोलीस कोठडी, आत्तापर्यंत नेमकं काय-काय घडलं?
पायल झांबरे मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट, सासू-सासऱ्यांना पोलिसांनी केली अटक, पतीला 4 दिवसांची पोलीस कोठडी, आत्तापर्यंत नेमकं काय-काय घडलं?
Sangola Crime: सांगोल्यात भाजप पदाधिकाऱ्याची गोळ्या घालून जागीच संपवलं; शिवसेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप; राज्यात खळबळ उडवणाऱ्या प्रकरणाचा आता पोलिस उपअधीक्षकांकडून तपास
सांगोल्यात भाजप पदाधिकाऱ्याची गोळ्या घालून जागीच संपवलं; शिवसेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप; राज्यात खळबळ उडवणाऱ्या प्रकरणाचा आता पोलिस उपअधीक्षकांकडून तपास

व्हिडीओ

Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
Gold Silver Rate Hike : अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव, सोने आणि चांदीमध्ये तुफान तेजी,चांदी 7775 रुपयांनी महागली, जाणून घ्या IBJA चे नवे दर
अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव होताच सोने,चांदीच्या दरात तुफान तेजी, जाणून घ्या IBJA चे नवे दर
धर्मरक्षणासाठी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत समर्पित राहणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
सत्तेपेक्षा सिद्धांत मोठा, अधिकारापेक्षा धर्म आणि कर्तव्य श्रेष्ठ! : एकनाथ शिंदे
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
Ravindra Dhangekar on Gokul Election : एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
मोठी बातमी, सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा,75 टक्के अग्निवीरांना 2 वर्षांच्या अतिरिक्त सेवेनंतर संधी मिळणार, केंद्राचा मोठा निर्णय
सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा, केंद्राचा अग्निवीर योजनेत मोठा बदल, अश्विनी वैष्णव यांची माहिती
Embed widget