एक्स्प्लोर

Dhule News : चालकाचे नियंत्रण सुटले अन् कार थेट नाल्यात कोसळली; दोन युवकांचा मृत्यू

Dhule Accident News : संपूर्ण देशभरात नवीन वर्षाचे उत्साहात स्वागत होत आहे. एकीकडे नववर्षाचा माहोल असताना दुसरीकडे मात्र शिरपूर येथील दोन युवकांवर काळाने घाला घातला आहे.

Dhule Accident News धुळे : संपूर्ण देशभरात नवीन वर्षाचे (New Year) उत्साहात स्वागत होत आहे. एकीकडे नववर्षाचा माहोल असताना दुसरीकडे मात्र शिरपूर (Shirpur) येथील दोन युवकांवर काळाने घाला घातला आहे. शिरपूर येथील चोपडा रस्त्यालगत जात असताना चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटल्याने कार नाल्यात कोसळली आणि कारमधील दोन जण ठार झाले. प्रवीण शिवाजीराव पाटील (रा. क्रांतीनगर) व प्रशांत राजेंद्र भदाणे (रा. मातोश्री कॉलनी, शिंगावे शिवार) असे मयत युवकांचे नाव आहे. 

31 डिसेंबरच्या रात्री शिरपूर-चोपडा रस्त्यालगत असलेल्या सूतगिरणीच्या मागील परिसरातून हॅरियर कारने (क्र. एमएच 18, बीएक्स 1920) प्रवास करणाऱ्या चालकाचे नियंत्रण सुटले. यानंतर कार नाल्यात जाऊन कोसळली. कारचा वेग जास्त असल्याने कारमधील प्रवीण पाटील व प्रशांत भदाणे जागीच ठार झाले. अपघातानंतर रात्रभर कार व मृतदेह घटनास्थळीच पडून होते. दोघांच्या मोबाईलवर संपर्क होत नसल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. पहाटे तेथून ये जा करणाऱ्या लोकांना कारच्या अपघाताबाबत माहिती मिळाली. 

एक हॉटेल व्यावसायिक तर एक कॉन्ट्रॅक्टर

मृतदेहाची ओळख पटल्यावर त्यांना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघेही युवक विवाहित असल्याचे कळते. प्रवीण पाटील हॉटेल व्यवसायिक होते तर प्रशांत भदाणे यांनी अल्पावधीतच कॉन्ट्रॅक्टर म्हणून प्रसिद्धी मिळवली होती. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मुंबई-नाशिक महामार्गावर दोन अपघात

सोमवारी मुंबई-नाशिक महामार्गावरदेखील दोन अपघात झाले आहेत. पहिली अपघाताची घटना इगतपुरी (Igatpuri) बायपास जवळील बोरटेंभे येथे घडली. एक मर्सिडीज कारची आणि आयशरची जोरदार धडक झाली. मर्सिडीज कारने भाजीपाला घेऊन जाणाऱ्या आयशरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. यात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. 

तर दुसरी घटना मुंबई-नाशिक महामार्गावरील पाचपाखाडी (Pachapakhadi Accident News) भागात घडली. सोमवारी सकाळी गाडीचे टायर पंक्चर झाल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. यानंतर गाडीने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका टेम्पोला धडक दिली. या अपघातात पाच प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Loksabha Election : मतदान करायला लागतंय! राज्यात लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात पहिल्या चार तासात देशाच्या तुलनेत थंडा प्रतिसाद
मतदान करायला लागतंय! राज्यात लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात पहिल्या चार तासात देशाच्या तुलनेत थंडा प्रतिसाद
"भाजपचे कार्यकर्ते प्रचार करतायत.."; भाजप-ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वर्सोवा मतदान केंद्रावर वादावादी
Lok Sabha Election 2024 : सचिन तेंडुलकर, दीपिका-रणवीर ते गौरव मोरे, मतदानासाठी सेलिब्रिटींची रांग
सचिन तेंडुलकर, दीपिका-रणवीर ते गौरव मोरे, मतदानासाठी सेलिब्रिटींची रांग
Sharad Pawar: पंतप्रधान प्रचंड घाबरलेत, म्हणूनच मला भटकती आत्मा म्हणाले : शरद पवार
पंतप्रधान प्रचंड घाबरलेत, म्हणूनच मला भटकती आत्मा म्हणाले : शरद पवार
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Sunil Raut : कुणाचा कितीही दबाव आला तरी संजय दिना पाटील दिल्लीत जाणारShrikant Shinde Voting Lok Sabha : विरोधकांना पराभव समोर दिसतोय; श्रीकांत शिंदेLata Eknath Shinde Thane Lok Sabha : श्रीकांत शिंदे निवडून आलेच आहेत, लेकाच्या विजयाचा आईला विश्वासLok Sabha : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते Dharmendra, अभिनेत्री Hema Malini यांनी बजावला मतदानाचा हक्क

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Loksabha Election : मतदान करायला लागतंय! राज्यात लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात पहिल्या चार तासात देशाच्या तुलनेत थंडा प्रतिसाद
मतदान करायला लागतंय! राज्यात लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात पहिल्या चार तासात देशाच्या तुलनेत थंडा प्रतिसाद
"भाजपचे कार्यकर्ते प्रचार करतायत.."; भाजप-ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वर्सोवा मतदान केंद्रावर वादावादी
Lok Sabha Election 2024 : सचिन तेंडुलकर, दीपिका-रणवीर ते गौरव मोरे, मतदानासाठी सेलिब्रिटींची रांग
सचिन तेंडुलकर, दीपिका-रणवीर ते गौरव मोरे, मतदानासाठी सेलिब्रिटींची रांग
Sharad Pawar: पंतप्रधान प्रचंड घाबरलेत, म्हणूनच मला भटकती आत्मा म्हणाले : शरद पवार
पंतप्रधान प्रचंड घाबरलेत, म्हणूनच मला भटकती आत्मा म्हणाले : शरद पवार
Maharashtra HSC Results: बारावीच्या परीक्षेचा भोपळा फुटणार, विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली, निकाल कसा आणि कुठे पाहाल?
बारावीच्या परीक्षेचा भोपळा फुटणार, विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली, निकाल कसा आणि कुठे पाहाल?
Sharad Ponkshe : पप्पा म्हणाले हिंदुत्त्ववादी सरकार हवं, लेक म्हणाला मलापण मोदीच हवेत; पोंक्षे पितापुत्राचं थेट मत, नो गडबड!
पप्पा म्हणाले हिंदुत्त्ववादी सरकार हवं, लेक म्हणाला मलापण मोदीच हवेत; पोंक्षे पितापुत्राचं थेट मत, नो गडबड!
Nashik Lok Sabha : नाशिक लोकसभेसाठी पहिल्या चार तासात राजभाऊ वाजेंच्या सिन्नरमध्ये सर्वाधिक मतदान, पाहा Photos
नाशिक लोकसभेसाठी पहिल्या चार तासात राजभाऊ वाजेंच्या सिन्नरमध्ये सर्वाधिक मतदान, पाहा Photos
Maharashtra Loksabha Election : राज्यात महाविकास आघाडीला किती जागा मिळणार? एमआयएम आमदाराने थेट आकडा सांगितला
राज्यात महाविकास आघाडीला किती जागा मिळणार? एमआयएम आमदाराने थेट आकडा सांगितला
Embed widget