Nashik Trimbakeshwar News : नववर्षाच्या पहिल्या दिवशी त्र्यंबकला मोठी गर्दी; दोन किमीपर्यंत रांगा, सोयीसुविधांअभावी भाविक नाराज
New Year 2024 : नववर्षाची सुरुवात देवदर्शनाने करण्यासाठी गुजरात, राजस्थान, दिल्लीसह अनेक राज्यांतून भाविक त्र्यंबकमध्ये दाखल झाले आहेत. मात्र सोयीसुविधांअभावी भाविकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
![Nashik Trimbakeshwar News : नववर्षाच्या पहिल्या दिवशी त्र्यंबकला मोठी गर्दी; दोन किमीपर्यंत रांगा, सोयीसुविधांअभावी भाविक नाराज trimbakeshwar temple rush of devotees nashik maharashtra marathi news Nashik Trimbakeshwar News : नववर्षाच्या पहिल्या दिवशी त्र्यंबकला मोठी गर्दी; दोन किमीपर्यंत रांगा, सोयीसुविधांअभावी भाविक नाराज](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/01/b6faff4351694ee9f8f57ea45f66701c170409795632394_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nashik News : थर्टी फर्स्ट आणि नवीन वर्षाच्या (New Year 2024) साजरा करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील विविध धार्मिक स्थळांवर गेल्या काही दिवसांपासून तुफान गर्दी पाहायला मिळत आहे.नाशकातील सर्व हॉटेल्सदेखील हाऊसफुल्ल झाले आहेत. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात (Trimbakeshwer Temple) दर्शनासाठी भाविकांची तुफान गर्दी दिसून येत आहे.
नववर्षाची सुरुवात देवदर्शनाने करण्यासाठी गुजरात, राजस्थान, बिहार, दिल्लीसह अनेक राज्यांतून भाविक त्र्यंबक नगरीत दाखल झाले आहेत. यामुळे त्र्यंबकमध्ये प्रचंड गर्दी उसळली आहे. मंदिरापासून जवळपास दीड ते दोन किलोमीटरपर्यंत दर्शनाची रांग पोहोचली आहे.
सोयी, सुविधांअभावी भाविक नाराज
त्र्यंबकमध्ये (Trimbakeshwar) प्रचंड गर्दी उसळल्याने दर्शनाचे नियोजन कोलमडल्याचे चित्र आहे. नियमित दर्शन रांगेतून किमान चार ते पाच तास दर्शनासाठी लागत आहे. मंदिरात २०० रुपये देणगी देऊन प्रवेशाची व्यवस्था आहे. मात्र ही व्यवस्था कधी सुरु असते तर कधी बंद. यामुळे भाविकांना (Devotees) अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. दर्शनासाठी तुफान गर्दी झाल्याने अनेकांना माघारी फिरावे लागत आहे. सोयी, सुविधांचा अभाव असल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच संभाव्य गर्दी बघून मंदिर व्यवस्थापनाने कुठलेही नियोजन केले नसल्याची तक्रार याआधी पुरोहित संघाच्या (Purohit Sangh Trimbakeshwar) सदस्यांनी दिली होती.
विश्वस्तांनी एकास तंबी दिल्याची चर्चा
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी दोनशे रुपये थेट दर्शनाची तिकीट विक्री बंद करण्यात आली. याचा फायदा घेत देवदर्शनाचा धंदा करणारी टोळी सक्रिय झाल्याचे विश्वस्तांसमोरच दिसून आल्याची चर्चा होत आहे. गर्दी झाली म्हणून पाहणी करताना उत्तर दरवाजाच्या जवळ विश्वस्त फेरफटका मारत होते. यावेळी गुजरातमधील ११ भाविक दर्शनासाठी जाता येईल का, अशी चर्चा करीत असल्याचे त्यांच्या समजले.
त्यांनी या भक्तांशी संवाद साधला असता त्यांनी आम्ही दोनशे रुपये दर्शनबारीत उभे राहण्यासाठी जात होतो. मात्र, ती बंद ठेवल्याचे सांगण्यात आले. काही व्यक्तींनी तुम्हाला दर्शनासाठी जायचे का, अशी विचारणा करीत प्रत्येकी दोन हजार रुपये लागतील असे सांगितले. इतकेच नव्हे तर त्या व्यक्तीलादेखील विश्वस्तांसमोर उभे करण्यात आले होते. यावर विश्वस्तांनी त्या व्यक्तीला तंबी दिल्याची चर्चा रंगली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)