Dharashiv Crime: तुळजापूरच्या सरपंचांवरील जीवघेण्या हल्ल्यातील आरोपी मोकाट; गावात आंदोलन, घटनास्थळी आलेल्या पोलिसांच्या गाडीला आंदोलकांचा 'दे धक्का'
Dharashiv Crime: ग्रामस्थांकडूनच पोलिसांच्या गाडीला धक्का द्यावा लागला हे परस्परविरोधी चित्र यावेळी दिसून आलं, तर या प्रकरणी गावकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
तुळजापूर : बीडमधील मस्साजोग येथाल संतोष देशमुख यांच्यानंतर आता तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा येथील सरपंच यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. या प्रकरणातील आरोपी देखील फरार आहे. आरोपींचा शोध घ्यावा यासाठी सरपंचासह गावकऱ्यांनी आंदोलन सुरू केलं आहे. पोलिसांना आरोपी सापडत नाहीत त्यामुळे पोलिसांविरोधात गावकऱ्यांचा संताप आहे. मात्र, दुसरीकडे आंदोलनस्थळी आलेल्या पोलिसांची गाडी सुरू होईना, त्यामुळे गावकऱ्यांना गाडीला धक्का मारण्याची वेळ आली. एकीकडे ग्रामस्थांचे पोलिसांविरोधात आंदोलन सुरू आहे, तर दुसरीकडे ग्रामस्थांकडूनच पोलिसांच्या गाडीला धक्का द्यावा लागला हे परस्परविरोधी चित्र यावेळी दिसून आलं, तर या प्रकरणी गावकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
पोलिसांच्या गाडीला मारला धक्का
आरोपींचा शोध घ्यावा यासाठी सरपंचासह गावकऱ्यांनी आंदोलन सुरू केलं आहे. पोलिसांना आरोपी सापडत नाहीत त्यामुळे पोलिसांविरोधात गावकऱ्यांचा संताप आहे. मात्र, दुसरीकडे आंदोलनस्थळी आलेल्या पोलिसांची गाडी सुरू होईना, त्यामुळे गावकऱ्यांना गाडीला धक्का मारण्याची वेळ आली.
मस्साजोगनंतर मेसाई जवळगातील सरपंचावर जीवघेणा हल्ला
धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यात गुरुवारी सरपंच असणाऱ्या नामदेव निकम जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. तुळजापूरमधील बारुळ गावानजीक हा प्रकार घडला आहे. नामदेव निकम हे मेसाई जवळगा गावचे सरपंच आहेत. गुरुवारी रात्री काही गुंडांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. नामदेव निकम हे बारुळ गावातून आपल्या मेसाई जवळगा गावाच्या दिशेने जात असताना हा प्रकार घडला. नामदेव निकम हे आपल्या चारचाकी वाहनाने जात होते. त्यावेळी काही गुंडांनी नामदेव निकम यांच्या गाडीवर अंडी फेकत त्यांची गाडी अडवली. त्यानंतर त्यांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या. यानंतर गुंडांनी निकम यांच्या गाडीवर पेट्रोल ओतून गाडी जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, सरपंच नामदेव निकम यांचा जीव थोडक्यात बचावला.
या हल्ल्यात सरपंच नामदेव निकम आणि आणखी एक व्यक्ती जखमी झाला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी येत पंचनामा केला. प्राथमिक तपासात हा हल्ला पवनचक्कीच्या वादातून हल्ला झाला असल्याची माहिती समोर आली. या घटनेमुळे धाराशिव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणात पोलीस काय कारवाई करतात आणि गुन्हेगारांना कधी पकडणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान आरोपी अद्याप मोकाट असल्याने सरपंचासह गावकऱ्यांनी आंदोलन सुरू केलं आहे. मात्र, दुसरीकडे आंदोलनस्थळी आलेल्या पोलिसांची गाडी सुरू होईना, त्यामुळे गावकऱ्यांना गाडीला धक्का मारण्याची वेळ आली.