एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

तुळजाभवानी दर्शन मंडपावरून वाद पेटला; आज तुळजापूर बंदची हाक; पाहा काय आहे नेमकं प्रकरण?

Tulja Bhavani Temple :तुळजाभवानी मंदीर संस्थान मंदिराचे विश्वस्त तथा भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटलांच्या संकल्पनेतुन मंदिर परिसराचा विकास आराखडा तयार करण्यात आला असून, या आराखड्याला विरोध होत आहे.

धाराशिव : आज तुळजापूर बंदची हाक देण्यात आली आहे. तुळजाभवानी मंदीर विकास प्रारूप आराखड्यातील दर्शन मंडपाच्या जागेवरून वाद सुरु झाला आहे. दर्शन मंडप हा घाटशीळ येथे करण्यास कांही पुजारी, व्यापारी आणि कांही स्थानिक नागरिकांचा विरोध आहे. त्यामुळे त्यांच्याकडून तुळजापूर शहर बंदचे आवाहन करण्यात आले आहे. तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र उत्सव सुरु आहे. देवीची मंचकी निद्रा सुरु आहे. तसेच 15 ऑक्टोबरला घटस्थापना होणार असून, याची तयारी अंतीम टप्प्यात असताना विकास आराखडा आणि त्यातील काही मुद्यावर आक्षेप घेतला जात आहे. तर काही पुजारी आक्रमक झाले असून, आज तुळजापूर बंदची हाक देण्यात आली आहे. 

तुळजाभवानी मंदीर विकास प्रारूप आराखड्यातील दर्शन मंडपाच्या जागेवरून वाद पाहायला मिळत आहे.दर्शन मंडप हा तुळजाभवानी देवीच्या मुख्य महाद्वार येथे असावा अशी पुजारी, व्यापारी यांची मागणी आहे. दर्शन मंडप जागा बदलल्यास व्यापाऱ्यांसह स्थानिक नागरिकांचे नुकसान होणार असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे आज तुळजापूर बंदची हाक देण्यात आली असून, सकाळपासून मंदिर परिसरात असलेल्या दुकाने बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे दर्शनासाठी आलेल्या भाविकांना मोठी अडचणीचा सामना करावा लागत असून, या बंदचे चित्र 10 वाजेनंतर स्पष्ट होणार आहे. 

काय आहे प्रकरण? 

तुळजाभवानी मंदीर संस्थान मंदिराचे विश्वस्त असलेले भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या संकल्पनेतुन मंदिर परिसराचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. अराखड्याचे बुधवारी सायंकाळी 5 वाजता तुळजाभवानी मंदीर संस्थान प्रशासकीय कार्यालयासमोर सादरीकरण होणार आहे. 15 ऑक्टोबर पर्यंत यावर सुचना भाविक, पुजारी, व्यापारी, स्थानिक नागरिक यांना करता येणार आहे.  16 ते 17 ऑक्टोबर हे दोन दिवस समक्ष सूचनावर चर्चा होणार आहे. 20 ऑक्टोबर पर्यंत नागरिक व भाविकांनी केलेल्या सुचनावर तांत्रिक व प्रशासकीय विभागाकडून अभिप्राय घेतला जाईल व त्यानंतर 26 ऑक्टोबर पर्यंत जिल्हाधिकारी यांना याबाबतचा अंतीम अहवाल सादर करण्यात येणार आहे. मात्र, याच विकास अराखड्याला विरोध केला जात आहे.  

राणा जगजीतसिंह पाटील यांची प्रतिक्रिया...

दरम्यान या सर्व प्रकरणावर आणि आज पुकारण्यात आलेल्या बंदबाबत राणा जगजीतसिंह पाटील यांची प्रतिक्रिया आली आहे. "सर्वांना विनंती आहे की, बंद वैगरे करणं योग्य वाटत नाही. जे काही काम करण्यात येत आहे ते आपल्याला विश्वासात घेऊनच केले जात आहे. सर्वांना अंतिम आराखडा दाखवून आणि सर्वांची मान्यता घेतल्याशिवाय आपण पुढे जाणार नाही. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की, या विशाल कामामध्ये आपली सकारात्मक राहावी”, असे राणा जगजीतसिंह पाटील यांनी म्हटले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Navratri 2023 : शारदीय नवरात्रौत्सव! तुळजाभवानी मंदिरातील धार्मिक कार्यक्रमांचे वेळापत्रक जाहीर; 24 ऑक्टोबरला सिमोल्लंघन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mohan Bhagwat: प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुलं हवीत, लोकसंख्या शास्त्राचा हवाला देत डॉ. मोहन भागवतांचे मोठे विधान
प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुलं हवीत, लोकसंख्या शास्त्राचा हवाला देत डॉ. मोहन भागवतांचे मोठे विधान
Alka Yagnik : अलका याज्ञिक तब्बल 28 वर्षांहून अधिक काळ पतीपासून विभक्त आणि अजूनही प्रेमात! नेमकं कारण आहे तरी काय?
अलका याज्ञिक तब्बल 28 वर्षांहून अधिक काळ पतीपासून विभक्त आणि अजूनही प्रेमात! नेमकं कारण आहे तरी काय?
विधानसभेच्या पुण्यात भरलेल्या महाराष्ट्राच्या पहिल्या अधिवेशनाला आलं होतं जाहीरसभेचं स्वरुप..
विधानसभेच्या पुण्यात भरलेल्या महाराष्ट्राच्या पहिल्या अधिवेशनाला आलं होतं जाहीरसभेचं स्वरुप..
पाहुण्यासारखा आला अन् 30 तोळं सोनं चोरुन गेला, साखरपुड्याच्या कार्यक्रमात चोरट्याचा प्रताप, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
पाहुण्यासारखा आला अन् 30 तोळं सोनं चोरुन गेला, साखरपुड्याच्या कार्यक्रमात चोरट्याचा प्रताप, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raosaheb Danve on CM Maharashtra :  मुख्यमंत्री कोण होणार हे जनतेला ठावूक आहे - रावसाहेब दानवेYugendra Pawar : महाराष्ट्रात संशयाचं वातावरण म्हणून पडताळणीसाठी अर्ज- युगेंद्र पवारABP Majha Headlines :  12 PM : 1 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :1 डिसेंबर 2024 :  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mohan Bhagwat: प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुलं हवीत, लोकसंख्या शास्त्राचा हवाला देत डॉ. मोहन भागवतांचे मोठे विधान
प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुलं हवीत, लोकसंख्या शास्त्राचा हवाला देत डॉ. मोहन भागवतांचे मोठे विधान
Alka Yagnik : अलका याज्ञिक तब्बल 28 वर्षांहून अधिक काळ पतीपासून विभक्त आणि अजूनही प्रेमात! नेमकं कारण आहे तरी काय?
अलका याज्ञिक तब्बल 28 वर्षांहून अधिक काळ पतीपासून विभक्त आणि अजूनही प्रेमात! नेमकं कारण आहे तरी काय?
विधानसभेच्या पुण्यात भरलेल्या महाराष्ट्राच्या पहिल्या अधिवेशनाला आलं होतं जाहीरसभेचं स्वरुप..
विधानसभेच्या पुण्यात भरलेल्या महाराष्ट्राच्या पहिल्या अधिवेशनाला आलं होतं जाहीरसभेचं स्वरुप..
पाहुण्यासारखा आला अन् 30 तोळं सोनं चोरुन गेला, साखरपुड्याच्या कार्यक्रमात चोरट्याचा प्रताप, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
पाहुण्यासारखा आला अन् 30 तोळं सोनं चोरुन गेला, साखरपुड्याच्या कार्यक्रमात चोरट्याचा प्रताप, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
Raosaheb Danve : नाव ठरलंय, महाराष्ट्राचा नेता कोण असावा, याची स्क्रिप्ट तयार; रावसाहेब दानवेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
नाव ठरलंय, महाराष्ट्राचा नेता कोण असावा, याची स्क्रिप्ट तयार; रावसाहेब दानवेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Allu Arjun Video : जेव्हा पुष्पाराज अल्लू अर्जुन मुंबईमध्ये येताच मराठीमध्ये बोलतो! व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल
Video : जेव्हा पुष्पाराज अल्लू अर्जुन मुंबईमध्ये येताच मराठीमध्ये बोलतो! व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल
Maharashtra CM: देवेंद्र फडणवीस नव्हे तर मुख्यमंत्रीपदी त्यांच्या निकटवर्तीयाची वर्णी? खुद्द रवींद्र चव्हाण यांनीच सस्पेन्स संपवला, म्हणाले मी...
देवेंद्र फडणवीस नव्हे तर मुख्यमंत्रीपदी त्यांच्या निकटवर्तीयाची वर्णी? खुद्द रवींद्र चव्हाण यांनीच सस्पेन्स संपवला, म्हणाले मी...
Gautam Adani : प्रत्येक आव्हान आम्हाला मजबूत बनवते; अमेरिकेतील आरोपांवर गौतम अदानी पहिल्यांदाच बोलले
प्रत्येक आव्हान आम्हाला मजबूत बनवते; अमेरिकेतील आरोपांवर गौतम अदानी पहिल्यांदाच बोलले
Embed widget