धाराशिवचे पालकमंत्री बदलण्याचं भाजपचं षडयंत्र, भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्यावर शिवसेनेचे आरोप
प्रताप सरनाईक यांना धाराशिवच्या पालकमंत्री पदावरुन बदलण्याचे भाजपाचे षड्यंत्र सुरु असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे जिल्हा संघटक सुधीर पाटील यांनी केला आहे.

Dharashiv : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (pratap sarnaik) यांना धाराशिवच्या पालकमंत्री पदावरुन बदलण्याचे भाजपाचे षड्यंत्र सुरु असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे जिल्हा संघटक सुधीर पाटील (Sudhir Patil) यांनी केला आहे. सुधीर पाटील यांनी भाजपाचे तुळजापूरचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील ( MLA Rana Jagjitsinh Patil) यांच्यावर हे गंभीर आरोप केले आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपावरुन हा वाद सुरू झाला आहे.
पालकमंत्री प्रताप सरनाईकांची बदनामी न थांबवल्यास स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वतंत्र लढवणार
धाराशिव जिल्ह्याचा विकास निधी मुख्यमंत्री यांच्या आदेशाने थांबवण्यात आला आहे. यावरुन भाजप आणि शिवसेनेमध्ये वाद पेटला आहे. भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या सांगण्यावरुन हा निधी थांबवण्यात आला आहे. भाजपाच्या वतीने धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची बदनामी सुरु आहे. हे न थांबल्यास येत्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक स्वतंत्र लढवणार असल्याचा इशाराही शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे. नाशिक, रायगडनंतर आता धाराशिवमध्येही पालकमंत्रीपदावरुन भाजप व शिवसेनेत वाद पेटताना दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या:
बस खरेदीवरुन वादंग, परिवहनमंत्र्यांकडून 1287 ई-बसचे टेंडर रद्द; ST महामंडळ अध्यक्षांच्या पत्राला स्थगिती























