एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

अकोला जिल्हाधिकाऱ्यांच्या नावानं बनावट फेसबुक अकाऊंट बनवत पैशांची मागणी, कनेक्शन राजस्थानपर्यंत!

बनावट फेसबुक अकाऊंट उघडून सर्वसामान्यांना पैशांनी लुटण्याचे प्रकार तर अलिकडे नित्याचेच झाले आहेत. मात्र, सायबर चोरांनी चक्क अकोल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या नावानेच बनावट अकाऊंट उघडल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे

अकोला :  अलिकडे सोशल मीडियावरून फसवणुकीच्या अनेक घटना दररोजच आपल्या कानावर येत असतात. बनावट फेसबुक अकाऊंट उघडून सर्वसामान्यांना पैशांनी लुटण्याचे प्रकार तर अलिकडे नित्याचेच झाले आहेत. मात्र, सायबर चोरांनी चक्क अकोल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या नावानेच बनावट अकाऊंट उघडल्याची खळबळजनक बाब आली आहे. यातून लोकांना लुटण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे.  या बनावट अकाऊंटवरून अनेकांना पैशांची मागणी केल्या गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मात्र, पैसे मागणी करण्यात आलेल्या लोकांनी लगेच हा प्रकार अकोला जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आल्याने अनेकांची संभाव्य फसवणूक टळली आहे.  
 
अकोला जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात सायबर पोलिसांकडे तक्रार केली आहे. आता अकोला सायबर पोलिसांकडून बनावट अकाऊंट बनवणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, अकोल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी फेसबुक आणि व्हॉट्सअॅपचा वापर करतांना काळजी घेण्याचं आवाहन जनतेला केलं आहे.
 
काय आहे नेमकं प्रकरण :

 फेसबुकवर अकोल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचं 'Jitendra Papalkar' या नावाने फेसबुक अकाऊंट आहे. याच नावाने फेसबुकवर एक बनावट अकाऊंट हॅकर्सनी खोललं आहे. काल संध्याकाळनंतर अकोल्यातील काही प्रतिष्ठीत मंडळींना या बनावट अकाऊंटवरून 'फ्रेंड रिक्वेस्ट' पाठविण्यात आल्यात. अकोल्यातील जेष्ठ पत्रकार प्रा. सुभाष गादिया, अकोल्याच्या माजी महापौर अश्विनी हातवळणे यांचा मुलगा अखिलेश यांच्यासह 12 ते 13 लोकांना अशा रिक्वेस्ट पाठविण्यात आल्या आहेत. या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर या अकाऊंटवरून मराठीत चॅटींग सुरू करण्यात आलं. आपण सध्या हॉस्पिटलमध्ये भरती असून आपल्याला अतिशय तातडीने 12 हजार रुपयांची आवश्यकता आहे. हे पैसे लवकरच परत करणार असल्याचं या चॅटींगमध्ये म्हटलं गेलं. पैसे जमा करण्यासाठी 'गुगल पे' आणि 'पेटीएम'चे अकाऊंट नंबरही देण्यात आलेत. हा फसवणुसीचा प्रकार असल्याचे सर्वांच्याच लक्षात आल्याने कुणीच पैशांच्या मागणीला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे यात कोणतेच आर्थिक व्यवहार झाले नाहीत. मॅसेज आलेल्या सर्वांनीच आज सकाळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या लक्षात हा प्रकार आणून दिला. अन यातूनच पुढील सुत्र वेगानं पुढे हललीत.

हॅकर्सचे धागेदोरे राजस्थानातील बाडमेरपर्यंत : 
 
या संपूर्ण प्रकरणाची तक्रार जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सर्वात आधी त्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या सिव्हील लाईन्स पोलिसांकडे केली. सिव्हिल लाइन्स पोलीसांनी या प्रकरणाचा तपास अकोला पोलिसांच्या सायबर शाखेकडे सोपवला आहे. बनावट अकाऊंट तयार करणाऱ्या हॅकर्सनी यासंदर्भात चॅटींग करतांना गुगल पे' आणि 'पेटीएम'चे अकाऊंट नंबर दिले आहेत. यात 'गुगल पे'साठी 9728937247 हा क्रमांक देण्यात आला आहे. तर 'पेटीएम' अकाऊंटसाठी 918059934406 हा क्रमांक देण्यात आला असून त्यासाठी 'आयएफएससी कोड' 0123456 हा देण्यात आला आहे. हे दोन्ही क्रमांक राजस्थानमधील बाडमेर जिल्ह्यातून संचालित होत असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. अकोला पोलीस या प्रकरणाच्या मुळापर्यंत गेले तर या टोळीच्या माध्यमातून देशभरात सुरू असलेले ऑनलाईन चोरीचे प्रकार थांबू शकतील. अकोल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यातील जनतेला याबाबत सावध राहण्याचं आवाहन केलं आहे. 
 
कशी टाळता येईल ऑनलाईन फसवणूक : 
तुम्ही फेसबुक, वाट्सअप, गुगल पे, फोन पे आणि इतर ऑनलाईन पैसे जमा करण्याचे अॅप वापरात असाल तर सावध रहा. कारण, तुम्ही कधीही सायबर चोरांच्या जाळ्यात अडकू शकता. तुम्ही वाट्सअप वापरत असाल तर आपल्या अकाऊंटचं 'सेटिंग्ज'मध्ये जात 'टू स्टेप व्हिरीफिकेशन' करणं अतिशय आवश्यक आहे. यासोबतच तुमचं फेसबुक अकाऊंट सुरक्षित ठेवायचं असेल तर तुम्ही खालील गोष्टींचं कटाक्षाने पालन केलं पाहिजे. 
 
1) मोबाईल संबंधित सर्व गॅझेट्स वापरतांना आपल्याला यातील संभाव्य धोके, सायबर गुन्हे आणि यासंदर्भातील कायद्याचे ज्ञान असणे अतिशय आवश्यक आहे.
2) फेसबुक वापरतांना 'सेटींग्ज'मध्ये जावून 'टू फॅक्टर ऑथेंटिकेशन' आणि 'प्रोफाईल व्हेरीफिकेशन' करणं अंत्यत आवश्यक आहे.
3) यासोबतच 'सेटींग्ज'मध्ये जावून आपलं प्रोफाईल लॉक केलं तर आपलं अकाऊंट फक्त आपल्या मित्र यादीतील लोकांनाच पाहता येतं. अनोळखी लोकांना ते पाहता येणार नाही.
4) आपला युजर पासवर्ड हा वारंवार बदलत राहिले पाहिजे. 
5) अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारू नका. 
 
सोशल मीडिया हा दुधारी तलवारीसारखा आहे. त्याचे जेव्हढे  फायदे आहेत, तेव्हढेच त्याचे तोटेही अशा घटना लक्षात आणून देतात. त्यामुळे सोशल मीडिया वापरतांना तुम्ही चौकस असणं असंच आवश्यक आहे. त्यामुळे तुमच्या ओळखीच्या व्यक्ती किंवा मित्रानं असे ऑनलाईन पैसे मागितले तर आधी शाहनिशा करा. नाही तर क्षणार्धात तुम्ही लुटले जाल
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
Raj Thackeray & Uddhav Thackeray: राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत खरंच एकत्र येणार का?
राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी खरंच एकत्र येणार का?
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
Eknath Shinde: मुख्यमंत्रीपद मिळण्याची आशा मावळताच एकनाथ शिंदेंनी गुगली टाकली, म्हणाले, श्रीकांतला उपमुख्यमंत्री करा
श्रीकांत शिंदेंना उपमुख्यमंत्री करा, मला केंद्रात मंत्रिपद नको, एकनाथ शिंदेंच्या मागणीने महायुतीत पेच?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 27 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 27 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  27 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaRatnagiti Weather : रत्नागिरीत धुकेच धुके... सोबत कमालीचा गारठा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
Raj Thackeray & Uddhav Thackeray: राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत खरंच एकत्र येणार का?
राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी खरंच एकत्र येणार का?
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
Eknath Shinde: मुख्यमंत्रीपद मिळण्याची आशा मावळताच एकनाथ शिंदेंनी गुगली टाकली, म्हणाले, श्रीकांतला उपमुख्यमंत्री करा
श्रीकांत शिंदेंना उपमुख्यमंत्री करा, मला केंद्रात मंत्रिपद नको, एकनाथ शिंदेंच्या मागणीने महायुतीत पेच?
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
Bollywood Actor Life: जन्म होताच आईला गमावलं, ड्रग्सच्या नशेनं बालपण हिरावलं, 'या' अभिनेत्याला ओळखलंत का?
जन्म होताच आईला गमावलं, ड्रग्सच्या नशेनं बालपण हिरावलं, 'या' अभिनेत्याला ओळखलंत का?
Maharashtra CM: मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीतून एकनाथ शिंदेंची माघार, देवेंद्र फडणवीसांचा मार्ग मोकळा?
मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीतून एकनाथ शिंदेंची माघार, राज्यात देवेंद्रपर्वाचा मार्ग मोकळा?
Embed widget