एक्स्प्लोर

Delhi Bomb Blast : ना शार्पनेल, ना छर्रे, नाही खिळे; मग एवढे लोक ठार कसे? दिल्ली बॉम्बस्फोटानंतर पोलिसांच्या तपासात धक्कादायक खुलासा

Delhi Bomb Blast : 'स्फोटाच्या जागेवरती कुठलेही शार्पनेल, छर्रे (Pellets), किंवा अणुकुचीदार असे खिळे स्वरूपाच्या कुठल्याही प्रकारचे साहित्य आढळून आलेलं नाही. अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.

Delhi Bomb Blast News : देशाची राजधानी दिल्ली काल (10 नोव्हेंबर) झालेल्या स्फोटाने (Delhi Bomb Blast) हादरून गेली. ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 च्या परिसरातून जाणाऱ्या एका कारमध्ये (Delhi Car Blast) सोमवारी सायंकाळी सुमारे 6.52 वाजता भीषण स्फोट झाला. या स्फोटात आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला असून 24 जण जखमी झाले आहेत. या स्फोटानंतर दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोटाच्या तपासात आता अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहे.

घटनास्थळावरून स्फोट झालेल्या गाडीचे बॉडी पार्ट्स ताब्यात घेण्यात आले असून, फॉरेन्सिक टीमकडून तपास सुरू आहे. तर या तपासात, 'स्फोटाच्या जागेवरती कुठलेही शार्पनेल (Shrapnel), छर्रे (Pellets), किंवा अणुकुचीदार असे खिळे स्वरूपाच्या कुठल्याही प्रकारचे साहित्य आढळून आलेलं नाही. अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे अशी कुठलीही घातक वस्तू नसताना मग एवढे लोक ठार कसे झालेत? असे अनेक संशय आणि प्रश्न या निमित्याने उपस्थित केले जात आहे.

Jaish-E-Mohammed : बॉम्बस्फोटात जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेचा हात?

दुसरीकडे, दिल्लीतील स्फोटाच्या (Delhi Blast) तपासात जैश-ए-मोहम्मद (Jaish-e-Mohammed) या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचा संशय बळावला आहे. याप्रकरणी फरीदाबाद-सहारनपूर मॉड्यूलचा (Faridabad-Saharanpur Module) पर्दाफाश करत पोलिसांनी डॉक्टर आदिल अहमद राथर (Dr. Adil Ahmad Rather) आणि डॉक्टर मुझम्मिल गनई (Dr. Muzammil Ganaie) यांना अटक केली आहे. तपासादरम्यान फरीदाबादमधून (Faridabad) तब्बल 2900 किलो स्फोटकं आणि शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

यावर बोलताना संरक्षण विश्लेषक, निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन म्हणाले, 'ही एक लंबी लढाई आहे, ज्याकरता भारतीयांनी तयार राहायला पाहिजे आणि यामध्ये सगळ्या भारतीयांचा सहभाग असणं महत्त्वाचं आहे'. मे 2025 मध्ये झालेल्या 'ऑपरेशन सिंदूर'ला (Operation Sindoor) प्रत्युत्तर म्हणून हा हल्ला झाल्याची शक्यता त्यांनी वर्तवली असून, नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी डोळे आणि कान उघडे ठेवावेत असे आवाहन केले आहे.

नेमकं काय घडलं? (Delhi Red Fort Blast) 

1. दिल्लीमध्ये लाल किल्ला मेट्रो स्टेशननजीकच्या सिग्नलजवळ कारमध्ये स्फोट
2. सोमवार 10 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6.52 दरम्यान घटना घडली
3. स्फोट इतका भीषण की, साधारण 8 ते 10 कार आणि इतर वाहने जळून खाक
4. सायंकाळी 6.55 वाजता अग्निशमन दलाला स्फोटाची माहिती मिळाली
5. दिल्ली पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल, नपासाला सुरुवात 
6. लाल किल्ल्याभोवतीचा संपूर्ण परिसर, चांदणी चौक आणि रस्ते बंद
7. कारचा स्फोट कशामुळे झाला याबाबतचे अधिकृत कारण अद्याप अस्पष्ट
8. घटनेनंतर एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती
9. रात्री 10 पर्यंत 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती, देशभरात हायअलर्ट जारी

संबंधित बातमी:

Delhi Bomb Blast News: 32 गाड्यांच्या चिंधड्या, अनेकांचे हात-पाय उडाले, मृतदेह छिन्नविछिन्न; दिल्ली स्फोटातील थरकाप उडवणारे 10 फोटो

Delhi Bomb Blast News: मोहम्मद उमरने स्वत: कार चालवत आत्मघाती हल्ला केल्याचा संशय; नेमकं काय घडलं?, खळबळजनक माहिती समोर

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report
NCP Alliance : मित्रांनी ठेवलं दूर, काकांशी एकीचा सूर; कुणाला डोकेदुखी? Special Report
Thackeray Brother Alliance : बिगुल वाजलं तरी ठाकरे बंधूंच्या युतीचं नाही ठरलं? Special Report
Chandrapur Farmer :कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने विकली किडनी? शेतकऱ्याचा धक्कादायक दावा Special Report
Navneet Rana : पक्ष की पती? नवनीत राणांची कुणाशी सहमती? भाजप राणांना झापणार की जपणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi : मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
Director Rob Reiner Wife Murder Case: सुप्रसिद्ध दिग्दर्शकाला पत्नीसह संपवलं; राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळले मृतदेह, पोटच्या पोरावरच पोलिसांची संशयाची सुई
सुप्रसिद्ध दिग्दर्शकाला पत्नीसह संपवलं; राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळले मृतदेह, पोटच्या पोरावरच पोलिसांची संशयाची सुई
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
Prithviraj Chavan VIDEO: राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
Embed widget