एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सतेज पाटलांचा 'गोकुळ'वर मोर्चा, दूध खरेदी दरकपातीचा निषेध
दूधसंघाबाहेर घोषणाबाजी करुन काँग्रेस कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसानीचा निषेध केला.
कोल्हापूर: गायीच्या दूध खरेदीदरात कपात केल्याने काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्त्वात काँग्रेसने गोकुळ दूध संघावर मोर्चा काढला.
दूधसंघाबाहेर घोषणाबाजी करुन काँग्रेस कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसानीचा निषेध केला.
दोनच दिवसांपूर्वी गोकुळने गाईच्या दुधाच्या खरेदीत 2 रुपयांची कपात केली आहे. पूर्वी 28 रुपये 50 पैशांनी खरेदी केलं जाणारं गायीचं दूध आता 26 रुपये 50 पैसे झालं आहे. त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.
त्यामुळेच काँग्रेसने ही दरकपात मागे घेण्यासाठी आंदोलन केलं.
दरम्यान गायीच्या दूध उत्पादनात वाढ झाल्याने खरेदीदरात कपात करण्यात आल्याचं गोकुळ दूध संघाने म्हटलं आहे.
एकीकडे दूध संघाने खरेदी दरात कपात केली असली तरी विक्री दरात मात्र कोणतीही वाढ केलेली नाही. ग्राहकांना गायीचं दूध हे पूर्वीप्रमाणेच 45 रुपये प्रति लिटर दराने मिळणार आहे.
संबंधित बातम्या
गोकुळचा शेतकऱ्यांना झटका, गायीच्या दूध खरेदीदरात 2 रुपयांची कपात!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
आरोग्य
गडचिरोली
Advertisement