Share Market : शेअर बाजारात तेजी कायम, Sensex चा 61 हजारांचा टप्पा पार
Stock Market Updates : उर्जा, मेटल, फार्मा, आयटी या क्षेत्रातल्या शेअर्समध्ये दोन टक्क्यांची वाढ झाली तर रिअॅलिटी इंडेक्समध्ये एका टक्क्याची घसरण झाली.
मुंबई: शेअर बाजारात सलग चौथ्या सत्रातही तेजी कायम असल्याचं दिसून आलं आहे. आज बाजार बंद होताना (Closing Bell Stock Market Updates) मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये (Sensex) 374 अंकांची वाढ झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये (Nifty) 133 अंकांची वाढ झाली. सेन्सेक्समध्ये आज 0.62 टकक्यांची वाढ होऊन तो 61,121 अंकांवर पोहोचला. तर निफ्टीमध्ये 0.74 अंकांची वाढ होऊन तो 18,145 अंकांवर स्थिरावला.
शेअर बाजारातील (Stock Market Updates ) सेन्सेक्सने सोमवारी 60 हजारांचा टप्पा पार केला होता. तर आज 61 हजारांचाही टप्पाही पूर्ण केला. निफ्टीनेही आज 18 हजारांचा टप्पा पूर्ण केला. शेअर बाजारात आज 1765 शेअर्समध्ये वाढ झाली, तर 1579 शेअर्समध्ये घसरण झाली. आज एकूण 129 शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही.
आज बाजार बंद होताना Adani Enterprises, Divis Labs, NTPC, Power Grid Corp आणि Grasim Industries या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली. तर Axis Bank, UPL, Eicher Motors, Reliance Industries आणि Maruti Suzuki या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये घसरण झाली.
आज बाजार बंद होताना उर्जा, मेटल, फार्मा, आयटी या क्षेत्रातल्या शेअर्समध्ये दोन टक्क्यांची वाढ झाली तर रिअॅलिटी इंडेक्समध्ये एका टक्क्याची घसरण झाली. बीएसई मिडकॅप इंडेक्समध्ये एक टक्क्याची तर आणि स्मॉलकॅपमध्ये 0.26 टक्क्यांची वाढ झाली.
या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली
- Adani Enterpris- 6.82
- Divis Labs- 6.31
- NTPC- 5.03
- Power Grid Corp- 3.07
- Grasim- 2.30
या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली
- Axis Bank- 3.78
- UPL- 1.81
- Eicher Motors- 1.35
- Reliance- 0.77
- Maruti Suzuki- 0.77
शेअर बाजाराची सुरुवात
आज शेअर बाजारातील व्यवहार सुरू झाले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 318.99 अंकांनी वधारत 61,065.58 अंकांवर खुला झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 118.50 अंकांनी वधारत 18,130.70 अंकांवर खुला झाला. सकाळी 9.45 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स निर्देशांक 338 अंकांनी वधारत 61,084.63 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 108 अंकांनी वधारत 18,120.45 अंकांवर व्यवहार करत होता.