एक्स्प्लोर

Chhatrapati Sambhaji Nagar News : माजी महापौरांचा बूट चोरीला, महापालिका यंत्रणा लागली कामाला; तीन संशयित कुत्रेही पकडले

Chhatrapati Sambhaji Nagar News : विशेष म्हणजे, कुत्र्यांनी बूट पळवण्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाला आहे.  

Chhatrapati Sambhaji Nagar : राजकीय नेता म्हटले की, रुबाब आलाच. त्यात नेत्यांच्या महागडा फोन, कपडे अन् ब्रॅन्डेड बुटाची चर्चा नेहमीच पाहायला मिळते. दरम्यान छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) एका माजी महापौराच्या बुटाची अशीच काही चर्चा शहरभर पाहायला मिळत आहे. त्याच कारण देखील तसेच आहे. कारण या माजी महापौराचा बूट भटक्या कुत्र्यांनी घरासमोरून पळवला आणि त्याचा शोध घेण्यासाठी संपूर्ण महापालिका यंत्रणाच कामाला लागली आहे. विशेष म्हणजे तीन संशयित कुत्रेही पकडण्यात आली आहे. विशेष म्हणजे कुत्र्यांनी बूट पळवण्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाला आहे.  

त्याचं झालं असे की, छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी आपला 15 हजारांचा बूट घरासमोर काढून ठेवला होता. दरम्यान यावेळी घराच्या दारासमोरून भटक्या कुत्र्याने तो बूट पळवला. जेव्हा घोडले यांना दारासमोर ठेवलेला बूट दिसून आला नाही, त्यावेळी त्यांनी आजूबाजूला त्याचा शोध घेतला. पण बूट काही सापडत नव्हता. त्यामुळे त्यांनी सीसीटीव्ही तपासले. ज्यात त्यांचा 15 हजारांचा बूट घराच्या दारासमोरून दोन भटक्या कुत्र्याने पळवला असल्याचे समोर आले. 

आता माजी महापौरांच्या घरासमोरून महागडा बूट कुत्र्यांनी पळवले म्हटल्यावर महापालिकेची यंत्रणा कामाला लागली. बूट चोरणारा कुत्रा शोधण्याच्या प्रयत्न सुरु झाला. दरम्यान सीसीटीव्हीच्या आधारावर कुत्रा पकडणाऱ्या यंत्रणेने तीन संशयित कुत्र्यांना पकडले. पण बूट नेमका कोणत्या कुत्र्याने पळवला हे कसं शोधावे असा प्रश्न आता यंत्रणेला पडला आहे. तसेच बूट घेऊन जाणारा 'आरोपी' कुत्रा कोणता हे अद्यापही गुलदस्त्यातच असून, त्याचा शोध घेतला जात आहे. 

नंदकुमार घोडेलेंचा थेट पशुसंवर्धन विभागाला फोन 

माजी महापौर नंदकुमार घोडेले यांचे शहराजवळ असलेल्या इटखेडा भागात निवास्थान आहे. दरम्यान शनिवारी (10 जून) रोजी दिवसभरातील दौरा संपवून ते रात्री घरी आले. घरात जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपला बूट दारासमोर काढून ठेवला. जेव्हा घोडेले सकाळी पुन्हा घराबाहेर पडले तेव्हा त्यांना दारासमोरील एक बूट गायब असल्याचं दिसून आले. त्यामुळे त्यांनी परिसरात शोधाशोध सुरू केली. पण  बूट सापडत नसल्याने त्यांनी सीसीटीव्हीची तपासणी केली. दरम्यान यावेळी बूट कुत्र्याने पळवून नेल्याचे समोर आले. त्यामुळे घोडेले यांनी तत्काळ महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागाला फोन करून परिसरात मोकाट श्वान वाढले असून त्यांचा बंदोबस्त करावा, अशी सूचना केली. सोबतच आपला बूट श्वानाने नेल्याचेही तक्रार देखील केली. त्यानंतर संबधित विभागाने तत्काळ परिसरातील संशयित कुत्र्यांची धरपकड सुरु केली. ज्यात तीन संशयित कुत्रे पकडण्यात आले आहे. मात्र बूट पळवून नेणारा कुत्रा नेमका कोणता याचा अजूनही शोध घेतला जात आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

Chhatrapati Sambhaji Nagar : वाढीव दराने बियाणे विकणाऱ्या पाच दुकानांचे परवाने निलंबित; 'एबीपी माझा'च्या बातमीनंतर कारवाई

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Praniti Shinde : हरियाणामध्ये जे झालं ते महाराष्ट्रात अजिबात होणार नाही; खासदार प्रणिती शिंदेंनी सांगितला मास्टरप्लॅन!
हरियाणामध्ये जे झालं ते महाराष्ट्रात अजिबात होणार नाही; खासदार प्रणिती शिंदेंनी सांगितला मास्टरप्लॅन!
Rohit Pawar: अजितदादांकडून पाठीवर कौतुकाची थाप पडताच रोहित पवार म्हणाले...
Rohit Pawar: अजितदादांकडून पाठीवर कौतुकाची थाप पडताच रोहित पवार म्हणाले...
दीक्षाभूमीकडे येणाऱ्या अनुयायांकडून टोल घेऊ नका; प्रकाश आंबेडकरांचे मुख्यमंत्री शिंदेंना पत्र
दीक्षाभूमीकडे येणाऱ्या अनुयायांकडून टोल घेऊ नका; प्रकाश आंबेडकरांचे मुख्यमंत्री शिंदेंना पत्र
Pakistan Blast : पाकिस्तानमध्ये चार दिवसात दुसरा दहशतवादी हल्ला, 20 मृत्यूमुखी; कोळसा खाणीत रॉकेट, हँडग्रेनेडने हल्ला
पाकिस्तानमध्ये चार दिवसात दुसरा दहशतवादी हल्ला, 20 मृत्यूमुखी; कोळसा खाणीत रॉकेट, हँडग्रेनेडने हल्ला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Krushi Vision : युवकांना खुणावतोय शेती स्टार्टअपचा पर्याय : ABP MajhaABP Majha Headlines :  2 PM : 11 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMajha Krushi Vision : शेतीचं भविष्य; भविष्यातली शेती आणि तंत्रज्ञान : ABP MajhaMajha Krushi Vision : बळीराजाच्या समृद्धीसाठी कोणतं धोरण? धनंजय मुंडे Exclusive : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Praniti Shinde : हरियाणामध्ये जे झालं ते महाराष्ट्रात अजिबात होणार नाही; खासदार प्रणिती शिंदेंनी सांगितला मास्टरप्लॅन!
हरियाणामध्ये जे झालं ते महाराष्ट्रात अजिबात होणार नाही; खासदार प्रणिती शिंदेंनी सांगितला मास्टरप्लॅन!
Rohit Pawar: अजितदादांकडून पाठीवर कौतुकाची थाप पडताच रोहित पवार म्हणाले...
Rohit Pawar: अजितदादांकडून पाठीवर कौतुकाची थाप पडताच रोहित पवार म्हणाले...
दीक्षाभूमीकडे येणाऱ्या अनुयायांकडून टोल घेऊ नका; प्रकाश आंबेडकरांचे मुख्यमंत्री शिंदेंना पत्र
दीक्षाभूमीकडे येणाऱ्या अनुयायांकडून टोल घेऊ नका; प्रकाश आंबेडकरांचे मुख्यमंत्री शिंदेंना पत्र
Pakistan Blast : पाकिस्तानमध्ये चार दिवसात दुसरा दहशतवादी हल्ला, 20 मृत्यूमुखी; कोळसा खाणीत रॉकेट, हँडग्रेनेडने हल्ला
पाकिस्तानमध्ये चार दिवसात दुसरा दहशतवादी हल्ला, 20 मृत्यूमुखी; कोळसा खाणीत रॉकेट, हँडग्रेनेडने हल्ला
Ajit Pawar : काय शिवीगाळ करायची ते करा, मला भोकं पडत नाही; अजित पवार चांगलेच संतापले
काय शिवीगाळ करायची ते करा, मला भोकं पडत नाही; अजित पवार चांगलेच संतापले
Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीचे उद्घाटन, सी-295 विमानाची चाकं जमिनीला लागताच जल्लोष
नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीचे उद्घाटन, सी-295 विमानाची चाकं जमिनीला लागताच जल्लोष
नाद खुळा कार... टेस्लाच्या 'रोबोटॅक्सी'ची पहिली झलक; ड्रायव्हरविना गाडी सुसाट; पाहा फोटो
नाद खुळा कार... टेस्लाच्या 'रोबोटॅक्सी'ची पहिली झलक; ड्रायव्हरविना गाडी सुसाट; पाहा फोटो
मोठी बातमी : अजित पवार आणि प्रकाश आंबेडकरांनी एकत्र यावं, दादांच्या बड्या नेत्याची पुन्हा एकदा साद!
मोठी बातमी : अजित पवार आणि प्रकाश आंबेडकरांनी एकत्र यावं, दादांच्या बड्या नेत्याची पुन्हा एकदा साद!
Embed widget