एक्स्प्लोर

Prakash Ambedkar : सगे सोयरे ही भेसळ आहे, घाई घाईत काढलेली कुणबी सर्टिफिकेट रद्द करा, प्रकाश आंबेडकरांच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे

Prakash Ambedkar on Maratha Reservation, Chhatrapati Sambhajinagar : "मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचं आंदोलन भरकटलंय असं म्हणणार नाही. जरांगे पाटील यांना ठाम भूमिका घ्यावी लागणार आहे. ती श्रीमंत मराठा बरोबर आहेत की जे निवडून आले त्यांच्याबरोबर आहेत? सगे सोयरे ही भेसळ आहे."

Prakash Ambedkar on Maratha Reservation, Chhatrapati Sambhajinagar : "मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचं आंदोलन भरकटलंय असं म्हणणार नाही. जरांगे पाटील यांना ठाम भूमिका घ्यावी लागणार आहे. ती श्रीमंत मराठा बरोबर आहेत की जे निवडून आले त्यांच्याबरोबर आहेत? सगे सोयरे ही भेसळ आहे. ओरिजनल मंडल कमिशनची यादी जोडल्या गेली होती. 1993 मध्ये कुणबी समाजाला आरक्षण दिले गेले, ते शाबूत आहे. मात्र इतर मार्गाने सध्या काही जण मिळवू पाहात आहेत. घाई घाईत आता काढलेली कुणबी सर्टिफिकेट रद्द करा, ज्यांनी अर्ज केलेले आहेत नोंदीप्रमाणे त्यांना मिळून जातील. आमच्या यात्रेत येण्याला आम्ही कोनाला नाही म्हणत नाहीत.  छगन भुजबळ, लक्ष्मण हाके, वाघमारे कोणीही येऊ शकते.", असे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले. छत्रपती संभाजीनगर येथे आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. 

ओबीसींचा लढा हाती घ्या, अशी अनेक ओबीसी संघटनांनी विनंती केली

प्रकाश आंबेडकर म्हणाले, ओबीसींचा लढा हाती घ्या, अशी अनेक ओबीसी संघटनांनी विनंती केली. काहीजण नामांतराची आठवण करून देत आहेत. पुरोगामी महाराष्ट्राच्या दृष्टीने ओबीसी  विरुद्ध मराठा हा श्रीमंत मराठ्यांनी लावलेला वाद आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. दुसऱ्या बाजूस मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षीय बैठक बोलावली होती. त्या सर्वपक्षीय बैठकीला सर्व मराठा नेते, काँग्रेस, एनसीपी शरद पवार आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटातलं कोणीच उपस्थित नव्हतं. या बैठकीमध्ये नेमकी राजकीय पक्षाची भूमिका काय हा प्रश्न वंचित बहुजन आघाडीतून विचारण्यात आला. श्रीमंत मराठ्यांचे पक्ष म्हणजे काँग्रेस, बीजेपी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना जोपर्यंत भूमिका मांडत नाही, तोपर्यंत तोडगा निघणार नाही, असंही आंबेडकर यांनी स्पष्ट केलं. 

प्रकाश आंबेडकरांच्या प्रमुख मागण्या 

1. ओबीसींच्या आरक्षण वाचलं पाहिजे. 

2. एससी एसटी विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप डबल झाली पाहिजे.

3. ओबीसीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा एससी एसटीची स्कॉलरशिप तशीच्या तशी लागू झाली पाहिजे.

4. घाई गर्दी मध्ये कास्ट फॉर्म इशू करण्यात आला आहे तो रद्द करण्यात यावा.

5. जे कुणबी आहेत त्यांना आरक्षण मिळणारच आहे. 

6. आरक्षणात एससी एसटी आणि ओबीसींना पदोन्नती मिळाली पाहिजे.

मुख्यमंत्र्यांनी सर्व राजकीय पक्षाचे प्रमुख यांना व्यक्तिगत पत्र लिहावं. मुख्यमंत्री म्हणून पण लिहावं, व्यक्तिगत पण लिहावं. मुख्यमंत्र्यांनी बैठकीत आश्वासन दिले की आम्ही पत्र लिहू, अजून पर्यंत वंचित बहुजन आघाडीला ते पत्र मिळालेले नाही, इतर पक्षाला मिळाले का याबाबत आमच्याकडे काहीही खुलासा नाही. मराठवाड्यातून ही मागणी पश्चिम महाराष्ट्र खानदेश या ठिकाणी पसरू लागलेली आहे.  वाशीम आणि बुलढाण्यातील काही भाग इफेक्ट होण्याची शक्यता आहे, असं मतही यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं. 

पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, पोलीस संघटनांची मागणी होती की आपण वंचित बहुजन आघाडीची भूमिका मांडतेय.  पक्षाच्या वतीने आम्ही ठरवलं या सामाजिक संघटनांना घेऊन 25 तारखेला दादर चैत्यभूमी येथून सुरुवात करायची. 26 जुलै रोजी शाहू महाराजांना नतमस्तक होऊन आरक्षण बचाव जन यात्रा, काढण्याचं आम्ही ठरवले आहे. कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, बीड लातूर, नांदेड, यवतमाळ, अमरावती, अकोला ,बुलढाणा, वाशिम आणइ जालना इथे ही यात्रा निघेल. सात किंवा आठ ऑगस्ट रोजी औरंगाबाद येथे या यात्रेची सांगता होईल. या रुट वरती कॉर्नर बैठका ठेवल्या जातील. त्यातील मुक्कामाच्या ठिकाणी जाहीर सभा घेतल्या जातील.

आंदोलने श्रीमंत मराठ्यांच्या विरोधात झाली पाहिजेत

श्रीमंत मराठ्यांनी गरीब मराठ्यांना फसवलं आहे, त्यामुळे ओबीसींच्या हातामध्ये सत्ता द्या अशी मागणी यात्रेमध्ये करणार आहोत. गरीब मराठ्यांना टिकाऊ आरक्षणाचे वेगळे ताट मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. ओबीसी संघटना आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या भूमिका स्पष्ट आहेत. भूमिका घेतल्या पाहिजेत जेणेकरून भूमिका स्फोटक परिस्थिती निवडण्यात मदत होईल आणि गावगाडा पुन्हा पूर्ववत होईल. राजकीय पक्ष जोपर्यंत भूमिका घेत नाही तोपर्यंत कुठलेही सरकार भूमिका घेईल असं मला वाटत नाही. मराठ्यांना आरक्षण न देणे श्रीमंत मराठ्यांचा डाव आहे. आंदोलने श्रीमंत मराठ्यांच्या विरोधात झाली पाहिजेत, असंही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा, मविआ नेत्यांना सवाल; कोल्हापुरातून आरक्षण बचाव यात्रा, 5 प्रमुख मागण्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Beed News : बीडमध्ये ग्रामसेवकाला लोखंडी रॉडने काळं-निळं, रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं, गेवराईतील गावगुंडांचा प्रताप
बीडमध्ये ग्रामसेवकाला लोखंडी रॉडने काळं-निळं, रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं, गेवराईतील गावगुंडांचा प्रताप
Video : विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? व्हिडिओ तुफान व्हायरल
विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? Video तुफान व्हायरल
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका

व्हिडीओ

Pune Bibtya : बिबट्या आला रे आला...पुणेकरांची तारांबळ Special Report
Hapus Mango Konkan vs Gujarat Valsad Mango: कोकणच्या हापूसला वलसाडच्या हापूसचं आव्हान Special Report
Mumbai Chunabhatti Riksha:चुनाभट्टीतील वादानंतर भीमसैनिकांनी रिक्षा सोडल्या,रिक्षानं जाण्यास परवानगी
Chunabhatti : चुनाभट्टीजवळ रिक्षा रोखल्याने आंबेडकर अनुयायी आक्रमक, पोलिसांसोबत बाचाबाची
Alaknanda Galaxy Vastav 250 : अलकनंदा : नव्या दिर्घिकेचा शोध; विश्वाचे रहस्य उलगडण्यास होणार मदत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed News : बीडमध्ये ग्रामसेवकाला लोखंडी रॉडने काळं-निळं, रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं, गेवराईतील गावगुंडांचा प्रताप
बीडमध्ये ग्रामसेवकाला लोखंडी रॉडने काळं-निळं, रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं, गेवराईतील गावगुंडांचा प्रताप
Video : विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? व्हिडिओ तुफान व्हायरल
विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? Video तुफान व्हायरल
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Elon Musk : युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
Embed widget