66 प्रवासी घेऊन निघालेली बस घाटात पलटली, भीषण अपघातानंतर स्थानिकांची धाव, 8 जखमी
बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस पलटी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या बसमधून 66 प्रवासी प्रवास करत होते. तब्बल 66 प्रवासी घेऊन जाणाऱ्या या बसला अपघात झाला
छत्रपती संभाजीनगर : राज्यातील महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या बसची (Bus) दूरवस्था झाल्यावरुन नेहमीच टीका करण्यात येत असते. बसमधून प्रवास करणाऱ्या सर्वसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो, कधी बसचं सीटच हलत असतं, तर खिडकीच्या काचा थडथड वाजत असतात, तर कधी पावसाळ्यात पत्र्यातून पाणीच बसमध्ये शिरते. मात्र, कधी कधी याच बसच्या दयनीस अवस्थेमुळे वाहक-चालकही खासगीत संताप व्यक्त करतात. त्यामुळे, काहीवेळा ह्या बस अपघाताचे कारणही ठरतात. तर, गेल्या काही दिवसांत अपघातांच्या घटनातही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. नुकतेच छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यातील अजिंठा घाटात एसटी बसचा भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना घडली आहे.
बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस पलटी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या बसमधून 66 प्रवासी प्रवास करत होते. तब्बल 66 प्रवासी घेऊन जाणाऱ्या या बसला अपघात झाला असून अपघातात 7 ते 8 जण जखमी झाले आहेत. पुणे ते रावेर प्रवास या मार्गावरुन ही बस धावत होती. मात्र, अजिंठा घाटात येताच, चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात 7 ते 8 प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच, स्थानिकांनी व पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेऊन मतदकार्य सुरू केले. अपघातामधील जखमी प्रवाशांना उपचारासाठी अजिंठा येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तर, काही जणांना खासगी रुग्णालयाही उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, बस रस्त्यावरुन खाली घसरल्याने पलटी होवून बसचेही मोठे नुकसान झाले आहे. बसच्या पुढील व पाठीमागील बाजूच्या काचा फुटल्या असून टायरही निखळल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणी आगार प्रमुखांना माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर, आगारीतल संबंधित अधिकाऱ्यांनाही घटनास्थळी जाऊन पाहणी करण्याचे निर्देश देण्यात आले होते, त्यानुसार अधिकाही अपघातस्थळी पोहोचल्याचं दिसून आलं.
हेही वाचा
सोयाबीन, गहू, तांदूळ, कापूस, शरद पवारांनी शेतातलं सगळंच काढलं; मोदींच्या 10 वर्षातलं दरपत्रकच मांडलं