एक्स्प्लोर

मनोज जरांगे रुग्णालयात दाखल, छातीत त्रास होत असल्याने उपचार सुरु; डॉक्टरांनी दिला विश्रांतीचा सल्ला

Manoj Jarange : बीडची सभा झाल्यावर आज मनोज जरांगे थेट छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये पोहचले आहेत.

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी सुरु केलेला महाराष्ट्राचा (Maharashtra) दौरा नुकताच संपला आहे. त्यानंतर बीडमध्ये (Beed) भव्य सभा घेत मुंबईतील (Mumbai) आझाद मैदानावर उपोषण करण्याची घोषणा जरांगे यांनी केली.  मात्र, मागील काही दिवसांपासून सतत सभांसाठी करत असलेल्या दौऱ्यामुळे जरांगे आजारी पडले आहे. त्यामुळे, बीडची सभा झाल्यावर आज मनोज जरांगे थेट छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये पोहचले आहेत. यावेळी डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आला आहे. 

बीड येथील सभा झाल्यानंतर आता मनोज जरांगे आज छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले आहेत. अंगदुखी आणि खोकल्यामुळे छातीत त्रास होत असल्याने उपचारासाठी ते रुग्णालयात दाखल झाले आहेत. डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांना विश्रांतीचा सल्ला दिलाय. तसेच, त्यांच्यावर याच रुग्णालयात उपचार सुरु आहे. विशेष, म्हणजे जरांगे छत्रपती संभाजीनगरला पोहचताच त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयात मराठा समाजबांधवांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. 

पोलिसांकडून ट्रॅक्टर मालकांची माहिती घेतली जात आहे...

मनोज जरांगे यांनी मुंबईतील आंदोलनाची घोषणा करत 20 जानेवारीला मुंबईकडे निघणार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, 20 जानेवारीला राज्यभरातील मराठा आंदोलक मुंबईच्या दिशीने या आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघण्याची शक्यता आहे. ज्यात अनेकजण ट्रॅक्टर घेऊन मुंबईला जाणार असल्याची देखील चर्चा आहे. त्यामुळे आता पोलीस देखील अलर्ट झाले आहेत. यासाठी अनेक जिल्ह्यात पोलिसांनी गोपनीय माहिती जमा करण्यास सुरुवात केली आहे. तशा प्रकारची विचारणा आपापल्या पोलिस स्टेशन हद्दीतील ट्रॅक्टर मालकांना पोलिसांकडून केली जात आहे. तसेच, मराठा आंदोलनात ट्रॅक्टर घेऊन सहभागी होण्याची शक्यता असललेल्या लोकांची यादी देखील तयार केली जात आहे. 

असा असणार जरांगेंचा मुंबई दौरा...

20 जानेवारीला सकाळी नऊ वाजता मनोज जरांगे हे आंतरवाली सराटी गावातून मुंबईकडे निघणार आहेत. मुंबईला जाण्यासाठी पाच ते सहा दिवस लागतील. अंदाजे 26 जानेवारीला प्रत्यक्षात मुंबईत उपोषणाला सुरुवात होऊ शकते. दरम्यान, आंतरवाली सराटी येथून निघाल्यावर रस्त्यात लागणाऱ्या गावातून, तालुक्यातील आणि जिल्ह्यातील मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यासोबत मुंबईच्या दिशेने निघतील. त्यामुळे मुंबईला पोहचेपर्यंत जरांगे यांच्यासोबत लाखो लोकं जोडली जातील असा अंदाज वर्तवला जात आहे. याच मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आता मुंबई येथील मराठा आंदोलक यांच्याकडून देखील त्या दृष्टीने तयारी करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

मुंबईकडे कधी अन् कोठून निघणार, जरांगेंनी सांगितला आझाद मैदानावरील उपोषणाचा संपूर्ण 'प्लॅन'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ratan Tata: राज ठाकरेंकडून रतन टाटांचे चरण स्पर्श; विमानतळावरील 'या' प्रेमळ फोटोमागची गोष्ट
राज ठाकरेंकडून रतन टाटांचे चरण स्पर्श; विमानतळावरील 'या' प्रेमळ फोटोमागची गोष्ट
Ratan Tata : रतन टाटांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी 'टाॅवर ऑफ सायलेन्स' सोडून विद्युत दाहिनीचाच पर्याय का निवडण्यात आला?
रतन टाटांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी 'टाॅवर ऑफ सायलेन्स' सोडून विद्युत दाहिनीचाच पर्याय का निवडण्यात आला?
Omar Abdullah : ओमर अब्दुल्ला होणार जम्मू-काश्मीरचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री, विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड; 13 किंवा 14 ऑक्टोबरला शपथ घेणार
ओमर अब्दुल्ला होणार जम्मू-काश्मीरचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री, विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड; 13 किंवा 14 ऑक्टोबरला शपथ घेणार
गुंतवणूकदारांना श्रीमंत बनवणाऱ्या रतन टाटांच्या 26 कंपन्या कोणत्या? सविस्तर यादी एका क्लिकवर
गुंतवणूकदारांना श्रीमंत बनवणाऱ्या रतन टाटांच्या 26 कंपन्या कोणत्या? सविस्तर यादी एका क्लिकवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 6 PM : 10 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRatan Tata Last Rites : रतन टाटांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कारRatan Tata Last Rites : रतन टाटांच्या अंत्यदर्शनासाठी , सुशीलकुमार शिंदेंची हजेरीRatan Tata Last Rites : रतन टाटांना अखेरचा निरोप, मुंबई पोलिसांकडून सलामी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ratan Tata: राज ठाकरेंकडून रतन टाटांचे चरण स्पर्श; विमानतळावरील 'या' प्रेमळ फोटोमागची गोष्ट
राज ठाकरेंकडून रतन टाटांचे चरण स्पर्श; विमानतळावरील 'या' प्रेमळ फोटोमागची गोष्ट
Ratan Tata : रतन टाटांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी 'टाॅवर ऑफ सायलेन्स' सोडून विद्युत दाहिनीचाच पर्याय का निवडण्यात आला?
रतन टाटांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी 'टाॅवर ऑफ सायलेन्स' सोडून विद्युत दाहिनीचाच पर्याय का निवडण्यात आला?
Omar Abdullah : ओमर अब्दुल्ला होणार जम्मू-काश्मीरचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री, विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड; 13 किंवा 14 ऑक्टोबरला शपथ घेणार
ओमर अब्दुल्ला होणार जम्मू-काश्मीरचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री, विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड; 13 किंवा 14 ऑक्टोबरला शपथ घेणार
गुंतवणूकदारांना श्रीमंत बनवणाऱ्या रतन टाटांच्या 26 कंपन्या कोणत्या? सविस्तर यादी एका क्लिकवर
गुंतवणूकदारांना श्रीमंत बनवणाऱ्या रतन टाटांच्या 26 कंपन्या कोणत्या? सविस्तर यादी एका क्लिकवर
निवडणुकांपूर्वी कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मार्ग मोकळा; याचिकेवर सुनावणी तहकूब, राज्य सरकारला दिलासा
निवडणुकांपूर्वी कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मार्ग मोकळा; याचिकेवर सुनावणी तहकूब, राज्य सरकारला दिलासा
एक नंबर... थेअटरमध्ये चित्रपट सुरू होण्यापूर्वी रतन टाटांना श्रद्धांजली; मनसैनिकांकडून 'अमर रहे'च्या घोषणा
एक नंबर... थेअटरमध्ये चित्रपट सुरू होण्यापूर्वी रतन टाटांना श्रद्धांजली; मनसैनिकांकडून 'अमर रहे'च्या घोषणा
भाजप आमदार तानाजी मुटकुळेंची तब्येत खालावली; उपचारासाठी एअर ॲम्बुलन्सने मुंबईला हलवले
भाजप आमदार तानाजी मुटकुळेंची तब्येत खालावली; उपचारासाठी एअर ॲम्बुलन्सने मुंबईला हलवले
Rafael Nadal Retirement : स्पॅनिश 'नदाल एक्स्प्रेस' निवृत्तीच्या वळणावर विसावली; टेनिस कारकिर्दीतून निवृत्तीची घोषणा
स्पॅनिश 'नदाल एक्स्प्रेस' निवृत्तीच्या वळणावर विसावली; टेनिस कारकिर्दीतून निवृत्तीची घोषणा
Embed widget