एक्स्प्लोर

मुंबईकडे कधी अन् कोठून निघणार, जरांगेंनी सांगितला आझाद मैदानावरील उपोषणाचा संपूर्ण 'प्लॅन'

Manoj Jarange : मुंबईत प्रत्यक्षात कधी उपोषण सुरु होणार, आंतरवाली सराटी ते मुंबई प्रवास कसा असणार याबाबतचा संपूर्ण प्लॅन मनोज जरांगे यांनी 'एबीपी माझा'शी बोलतांना सांगितला आहे. 

जालना : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण करण्याची भूमिका मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी जाहीर केली आहे. त्यासाठी 20 जानेवारीला आंतरवाली सराटी (Antarwali Sarathi) गावातून मुंबईकडे मराठे निघतील असेही जरांगे म्हणाले आहेत. त्यामुळे मुंबईत प्रत्यक्षात कधी उपोषण सुरु होणार आणि आंतरवाली सराटी ते मुंबई प्रवास कसा असणार, सोबतच किती दिवसांचा असणार याबाबतचा संपूर्ण प्लॅन मनोज जरांगे यांनी 'एबीपी माझा'शी बोलतांना सांगितला आहे. 

दरम्यान यावर बोलतांना जरांगे म्हणाले की, "आंतरवाली सराटी गावातून 20 जानेवारीला आम्ही निघणार आहोत. रस्त्यात लोकं आमच्या रॅलीत सहभागी होतील. 20 जानेवारीला सकाळी नऊ वाजता अंतरवाली सराटी गावातून आम्ही निघणार आणि पायी प्रवास करत मुंबईत धडकणार. आंदोलनाची तयारी करण्यासाठी तोपर्यंत समाजाला वेळ पाहिजे. कारण हा विषय लहान नाही. यासाठी मोठ्या प्रमाणात नियोजन करावे लागणार आहे. तिथे जाऊन फक्त परत यायचं नाही. अनेकांचे शेतीचे काम प्रलंबित आहेत, ते उरकण्यासाठी देखील वेळ द्यावा लागणार आहे. त्यामुळे पुढील दहा ते पंधरा दिवसात सगळी कामं आवरून घेता येणार आहे. सगळी कामे करून गेल्यास उपोषणात सहभागी होणारे निवांत राहतील. त्यांचा घरी जीव गुंतणार नाही, असे जरांगे म्हणाले 

अंदाजे 26 जानेवारीला प्रत्यक्षात उपोषणाला सुरवात...

20 जानेवारीला सकाळी नऊ वाजता आम्ही आंतरवाली सराटी गावातून मुंबईकडे निघणार आहोत. मुंबईला जाण्यासाठी पाच ते सहा दिवस आम्हाला लागतील. अंदाजे 26 जानेवारीला प्रत्यक्षात मुंबईत उपोषणाला सुरुवात होऊ शकते. या काळात 24 जानेवारीला सुप्रीम कोर्टात क्युरेटीव्ह याचिकेवर सुनावणी होणार आहे. या क्युरेटीव्ह याचिकेला आम्ही कधीच विरोध केला नव्हता. पण आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की, ते आरक्षण टिकेल का?, पुन्हा गेल्यावेळी प्रमाणे होऊ नयेत. न्यायालयात खुली सुनावणी झाली तर ते आरक्षण टिकण्याची शक्यता असल्याचे जरांगे म्हणाले आहेत. 

मुंबईला निघण्यापूर्वी निर्णय घ्यावा, आम्ही चर्चेसाठी तयार

20 जानेवारीपर्यंत सरकारसाठी चर्चेचे दारं उघडी आहेत. मराठा आरक्षणावर जर मार्ग निघणार असेल, तर 20 जानेवारी पर्यंत चर्चेला हरकत नाही. मुंबईला जाण्याची आम्हाला काही हौस नाही. आम्ही फक्त आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईला जाणार आहोत. त्यापूर्वी जर आरक्षण दिलं तर मराठे इथेच आनंद साजरा करतील आणि तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील, असेही जरांगे म्हणाले. 

राम मंदिर उद्घाटन सोहळा काळातच आंदोलन? 

एकीकडे 20 जानेवारीला उपोषणासाठी मराठा समाज मुंबईकडे निघणार आहे, तर दुसरीकडे 22 जानेवारीला राम मंदिर उद्घाटन सोहळा पार पडतोय. मात्र, राम मंदिर उद्घाटन सोहळा सरकारचा प्रश्न आहे. शांततेत आंदोलनासाठी जाणं आणि आरक्षण मिळवणे हा आमचा प्रश्न आहे. या काळात सरकार मंदिर उद्घाटन सोहळ्यात व्यस्त असेल की नाही हा त्यांचा प्रश्न असून आमचा नाही. राम मंदिर उद्घाटन सोहळा सर्वांसाठी आनंदाची बाब आहे, त्याला दुमत नाही. आमची मागणी काही आजची नाही किंवा अचानक केलेली नाही. किंवा राम मंदिर उद्घाटन सोहळा असल्यामुळे आम्ही काही निर्णय घेत आहोत असेही नाही. मागील पाच महिन्यांपासून आरक्षणाच्या भूमिकेवर आम्ही भूमिका मांडत आहोत असे जरांगे म्हणाले. 

मुस्लीम बांधवांनी खूप सहकार्य केले...

काल बीडच्या सभेला मोठा प्रतिसाद मिळाला. मुस्लिम बांधवांचे मोठ्या प्रमाणात आम्हाला सहकार्य मिळाले. कालच्या सभेत याचा उल्लेख करता आला नसल्याने याबद्दल खंत व्यक्त करतो. त्यामुळे आपल्या सोबतीला कोण येत आहे हे मराठ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. मुस्लिम समाज मोठ्या ताकदीने आमच्यासोबत उभा राहत आहे. दलित बांधवांची देखील मोठी साथ मिळाली. ओबीसी बांधवांनी देखील साथ दिली, असल्याचे जरांगे म्हणाले.

भुजबळांवर टीका...

दरम्यान याचवेळी मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांच्यावर देखील टीका केली आहे. “स्मरणशक्ती त्याची (छगन भुजबळ) ढळलीय. छाती मोजायला आता टेलरचा धंदा टाकलाय का, तुझी केवढी छाती मग कशाला कांदा खायला आतमध्ये गेला होता. स्मरणशक्ती तुझी ठेप्यावर आन, रामदेव बाबा सारखा योगा करत जा थोड्या उड्या मार, असेही जरांगे म्हणाले.  

इतर महत्वाच्या बातम्या: 

Chhagan Bhujbal on Manoj Jarange Patil : मनोज जरागेंच्या स्मरणशक्तीत गडबड, छगन भुजबळ असल्या कोल्हेकुईला दाद देत नाही; भुजबळांचा पलटवार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gopichand Padalkar: आर आर पाटलांचा मुलगा आमदार होतो, पण आपला मुलगा आमदार न झाल्याने जयंत पाटलांना टेन्शन: गोपीचंद पडळकर
आर आर पाटलांचा मुलगा आमदार होतो, पण आपला मुलगा आमदार न झाल्याने जयंत पाटलांना टेन्शन: गोपीचंद पडळकर
Saif Ali Khan Attack: चोरीसाठी सैफ अली खानचंच घर का निवडलं? पोलिसांकडून कसून चौकशी; समोर आलं खळबळजनक कारण
चोरीसाठी सैफ अली खानचंच घर का निवडलं? पोलिसांकडून कसून चौकशी; समोर आलं खळबळजनक कारण
Cidco  : सिडकोच्या 26000 घरांसाठी नोंदणीला 25 जानेवारीपर्यंत मुदतवाढ, प्राधान्यक्रम कधीपर्यंत नोंदवायचा? घरांच्या किमतीचं काय ? 
सिडकोच्या 26000 घरांसाठी नोंदणीला 25 जानेवारीपर्यंत मुदतवाढ, प्राधान्यक्रम कधीपर्यंत नोंदवायचा?
Dhananjay Munde Beed: धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीच्या शिबिरात दंड थोपटले, पण मंत्रिपदावरील गंडातर कायम, पक्षात धनुभाऊंविषयी खदखद
वाल्मिक कराड धनंजय मुंडेंच्या पाठबळामुळे मोठा झाला, मंत्रीपदाबाबत विचार करावा, राष्ट्रवादीत खदखद
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 20 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्सAshok Chavan on Election| स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर, अशोक चव्हाणांचे संकेतDhananjay Munde Speech Shirdi| अजितदादा हे षडयंत्र, शिर्डीत धनंजय मुंडेंचं आक्रमक भाषणABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 20 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gopichand Padalkar: आर आर पाटलांचा मुलगा आमदार होतो, पण आपला मुलगा आमदार न झाल्याने जयंत पाटलांना टेन्शन: गोपीचंद पडळकर
आर आर पाटलांचा मुलगा आमदार होतो, पण आपला मुलगा आमदार न झाल्याने जयंत पाटलांना टेन्शन: गोपीचंद पडळकर
Saif Ali Khan Attack: चोरीसाठी सैफ अली खानचंच घर का निवडलं? पोलिसांकडून कसून चौकशी; समोर आलं खळबळजनक कारण
चोरीसाठी सैफ अली खानचंच घर का निवडलं? पोलिसांकडून कसून चौकशी; समोर आलं खळबळजनक कारण
Cidco  : सिडकोच्या 26000 घरांसाठी नोंदणीला 25 जानेवारीपर्यंत मुदतवाढ, प्राधान्यक्रम कधीपर्यंत नोंदवायचा? घरांच्या किमतीचं काय ? 
सिडकोच्या 26000 घरांसाठी नोंदणीला 25 जानेवारीपर्यंत मुदतवाढ, प्राधान्यक्रम कधीपर्यंत नोंदवायचा?
Dhananjay Munde Beed: धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीच्या शिबिरात दंड थोपटले, पण मंत्रिपदावरील गंडातर कायम, पक्षात धनुभाऊंविषयी खदखद
वाल्मिक कराड धनंजय मुंडेंच्या पाठबळामुळे मोठा झाला, मंत्रीपदाबाबत विचार करावा, राष्ट्रवादीत खदखद
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
Bigg Boss 18 : करणवीर मेहरा बिग बॉस 18 चा विजेता, विवियन डिसेनला झटका देत ट्रॉफीवर कोरलं नाव; बक्षिसाची रक्कम किती?
करणवीर मेहरा बिग बॉस 18 चा विजेता, विवियन डिसेनला झटका देत ट्रॉफीवर कोरलं नाव; बक्षिसाची रक्कम किती?
Share Market : विदेशी गुंतवणूकदारांची सावध चाल, भारतीय शेअर बाजारातून जानेवारीत 44396 कोटी रुपये काढले
विदेशी गुंतवणूकदारांचं सावध पाऊल, जानेवारीत भारतीय शेअर बाजारातून 44396 कोटी रुपये काढून घेतले, कारण...
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Embed widget