Chhatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये चहाच्या बिलावरून दोन गटात वाद; पोलिसांकडून सौम्य लाठीमार
Chhatrapati Sambhaji Nagar : वैजापूर परिसरातील खान गल्ली येथे सोमवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास चहाच्या बिलावरून दोन गटात वाद झाला.

Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) वैजापूर शहरात सोमवारी रात्रीच्या सुमारास काही प्रमाणात गोंधळाचा वातावरण पाहायला मिळाले. वैजापूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील खान गल्ली येथे सोमवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास चहाच्या बिलावरून दोन गटात वाद झाला. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे पोलिसांनी सौम्य लाठीमार करून जमाव पांगवला, असल्याचं समोर आले आहे.
या प्रकरणी तौफिक शाह साबेर शाह (वय 24 वर्षे, वैजापूर) याच्या तक्रारीवरून एकूण 10 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यात, वैजापूर शहरातील खान गल्ली जवळील पथ्थरफोड वाडा येथे चहाच्या बीलाच्या कारणावरुन झालेल्या किरकोळ वादाच्या कारणावरुन तौफिक शाह यांच्या दोन चुलत भावांना वरील आरोपींकडून मारहाण करण्यात आली. तसेच त्यांच्या डोक्यात दगडाने मारुन गंभीर जखमी करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे, सोपान तुकाराम कोकाटे, कृष्णा रोहीदास मोरे, अमोल अनील सोनवणे, पवन दत्तु गांगुर्डे, मानव मच्छिंद्र अहिरे, शाम अशोक पवळ, शंकर सोनवणे, गोकुळ (पूर्ण नाव माहीत नाही) , अमोल (पूर्ण नाव माहीत नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैजापूर शहरात सध्या नौगजी बाबा उरूस सुरु आहे. त्यामुळे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदू, मुस्लीम धर्मियांची या कार्यक्रमास मोठी गर्दी होत आहे. शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील खान गल्लीत सोमवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास काही तरी कारणावरून दोन गटात वाद निर्माण झाला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जमाव येथे जमा झाला, मध्यस्थी करूनही जमाव हटत नसल्याने पोलिसांनी या ठिकाणी लाठीमार केला.
रात्री उशिरापर्यंत पोलिस घटनास्थळी ठाण मांडून
जमाव हटत नसल्याने पोलिसांनी या ठिकाणी सौम्य लाठीमार केला. त्यामुळे परिस्थिती आणखीनच चिघळली. तर टनेची माहिती मिळताच सहायक पोलिस अधीक्षक महक स्वामी फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर जमाव पांगला. रात्री उशिरापर्यंत पोलिस घटनास्थळी ठाण मांडून होते. कोणत्या कारणांमुळे ही घटना घडली, हे मात्र समजू शकले नाही. तर सद्या परिसरात शांतता असून, पोलीस लक्ष ठेवून आहेत.
वादाच्या घटना वाढल्या...
गेल्या काही दिवसांपासून वैजापूर परिसरात दोन गटात होणारे वाद, भांडण, जमाव जमणे अशा घटना सतत घडत आहे. शुल्लक कारणावरून वाद आणि हाणामारी सारख्या घटना घडत आहे. विशेष म्हणजे छोट्या-मोठ्या वादानंतर जमाव जमत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे पोलीस अशा घटना रोखण्यात अपयशी ठरत असल्याचं बोलले जात आहे. सोमवारी झालेल्या घटनेनंतर वरिष्ठ पोलिसांनी तत्काळ धाव घेतल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. त्यामुळे स्थानिक पोलिसांनी देखील अशा घटना रोखण्यासाठी उपाययोजना रोखण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे. .
उरूसात होतायत वाद...
वैजापूर शहरात नौगजी बाबा उरूस सुरु आहे. त्यामुळे वैजापूरसह परिसरातील ग्रामीण भागातील नागरिक देखील या उरूसाला हजेरी लावतात. त्यात संध्याकाळी येणाऱ्या भाविकांची संख्या अधिक असल्याने मोठी गर्दी होते. दरम्यान याचवेळी छोट्या-मोठ्या कारणावरून वाद होताना पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे पोलिसांकडून या उरूसाच्या निमित्ताने विशेष बंदोबस्त देखील लावण्यात आला आहे. पण तरीही शुल्लक कारणावरून वाद होण्याच्या घटना घडताना पाहायला मिळत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
