Ajit Pawar : मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सवी वर्ष साजरा करण्यावरून अजित पवार संतापले, म्हणाले...
Ajit Pawar : अर्थसंकल्प अधिवेशनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी सभागृहात बोलताना अजित पवारांनी हा आरोप केला आहे.
Ajit Pawar : मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा संपूर्ण महाराष्ट्रासाठी अस्मितेचा विषय आहे. यावर्षी सप्टेबर महिन्यात मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा अमृत महोत्सवी वर्ष सुरु झाले आहे. हे अमृत महोत्सवी वर्ष संपायला अवघे पाच महिने राहिले तरी सरकार या अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्यासंदर्भात गंभीर नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केला आहे. अर्थसंकल्प अधिवेशनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी सभागृहात बोलताना अजित पवारांनी हा आरोप केला आहे.
मराठवाडा आणि मराठवाड्याच्या अमृत महोत्सवी वर्षाविषयी सरकारची अनास्था आहे, त्यांना यावषयी काही देणे-घेणे दिसत नाही. हे अमृत महोत्सवी वर्षे साजरे करण्याविषयी सरकारकडून कोणत्याही हालचाली दिसत नाहीत, तरी सरकारने या विषयी आपली भूमीका तातडीने स्पष्ट करावी अशी मागणी देखील अजित पवार यांनी केली.
सभागृहात बोलताना अजित पवार म्हणाले की, मराठवाडा मुक्तीसंग्राम लढा हा सर्वांच्या अस्मितेचा विषय आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामाचे हे अमृतमहोत्सवी वर्ष आहे. सप्टेंबर महिन्यात या अमृत महोत्सवी वर्षाची सुरुवात झाली. आता हे वर्ष संपायला अवघे पाच महिने राहिले आहेत. मराठवाडा मुक्ती संग्रामाचे महोत्सवी वर्ष मोठ्या उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात साजरा करण्याची मागणी आम्ही सर्वांनी केली होती. या विषयी विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत सुध्दा हा विषय मी मांडला होता.
सरकारच्यावतीने कोणत्याही हालचाली नाही...
विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत मराठवाडा मुक्ती संग्रामाचे महोत्सवी वर्ष साजरा करण्याची मागणी करूनही सरकारकडून या विषयी कोणत्याही हालचाली सुरु नाहीत. मराठवाडा मुक्ती संग्राम साजरा करण्या विषयी साधा प्रस्ताव सुध्दा सरकारच्यावतीने सभागृहात आणला नाही. सरकार यानिमित्त काय कार्यक्रम साजरे करणार आहे? त्यांच नियोजन काय? हे सरकारच्यावतीने स्पष्ट करण्यात आले नाही. मराठवाडा आणि मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृतमहोत्सवाविषयी सरकारची अनास्था आहे. तरी सरकारने या विषयीची आपली भूमीका तातडीने स्पष्ट करुन उर्वरीत पाच महिन्यात तरी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचे आयोजन करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.
तोंडावर काळ्या पट्टया बांधून मूक आंदोलन
राहुल गांधींवरील कारवाईवर महाविकास आघाडीच्या आमदारांचे तोंडावर काळ्या पट्टया बांधून मूक आंदोलन केले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर झालेल्या कारवाई विरोधात आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर ठाण मांडत तोंडावर काळ्या पट्टया बांधून मूक आंदोलन केले. हातात 'लोकशाहीची हत्या' असे फलक घेऊन हे मूक आंदोलन करण्यात आले
इतर महत्वाच्या बातम्या :