Chhatrapati Sambhajinagar : मोदी सरकार हाय..हाय! गॅस दरवाढीच्या विरोधात काँग्रेस रस्त्यावर
Congress Protest : काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह महिला कार्यकर्त्यांनी दरवाढीच्या विरोधात आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली.
Congress Protest In Chhatrapati Sambhajinagar: वाढत्या महागाईविरोधात काँग्रेस आक्रमक झाले आहे. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहरात रस्त्यावर उतरून काँग्रेस (Congress) पदाधिकाऱ्यांनी अक्षरशः आंदोलन (Protest) केले. शहरातील क्रांती चौकात आज संध्याकाळी चार वाजता काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह महिला कार्यकर्त्यांनी दरवाढीच्या विरोधात आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. तसेच यावेळी रस्त्यावर चुली मांडत सरकारचा निषेध केला.
महागाईच्या विरोधात आज शहरातील क्रांतीचौक येथे काँग्रेसने आंदोलन केले. घरगुती गॅस सिलेंडर 50 रुपयांनी महाग झाले व व्यवसायीक सिलेंडर 350 रुपयांनी महाग झाले आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसने आंदोलन केले. तर महागाईमुळे त्रस्त लोकांच्या त्रासात आणखी भर पडली असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. तसेच कधीकाळी रस्त्यावर बांगड्या घेऊन आंदोलन करणाऱ्या स्मृती इराणी आता कुठे आहेत? असा सवाल यावेळी आंदोलन करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांनी उपस्थित केला.
जोरदार घोषणाबाजी
यावेळी आंदोलकांनी रिकामे गॅस सिलेंडर वाजवले. तसेच महिलांनी चुलीवर स्वयंपाक करुन मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच यावेळी अच्छे दिन कहां गए, क्या हुआ तेरा वादा, मोदी सरकार हाय..हाय, भाजप सरकार हाय..हाय, भाजप सरकारचं करायचं काय खाली मुंडके वरती पाय, वारे मोदी तेरा खेल सस्ती दारू और महेंगा तेल, अशा घोषणा देण्यात आल्या. तर महिला कार्यकर्त्यांनी रिकामे गॅस सिलेंडर डोक्यावर घेवुन मिरवणुक काढली. सोबतच यावेळी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यामार्फत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना पोस्टाव्दारे महिलांनी बांगडया पाठविण्यात आल्या.
महिलांचा चुलीवर स्वयंपाक!
शहरातील क्रांती चौकात करण्यात आलेल्या आंदोलनास्थळी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली. यावेळी महिलांनी रिकाम्या गॅस सिलेंडर या ठिकाणी आणून, वाजवले. सोबतच रस्त्यावर चुली मांडत स्वयंपाक केला. यासाठी चूल, भांडे, लाकडे देखील याठिकाणी आणले गेले होते. ज्यातून निघणारा धूर महिलांसाठी कसा त्रासदायक ठरत आहे, हे यातून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. सोबतच महिला कार्यकर्त्यांनी हातातील बांगड्या दाखवत जोरदार घोषणाबाजी केली. तसेच काही महिलांनी डोक्यावर गॅस सिलेंडर घेत सरकारच्याविरोधात घोषणाबाजी केली. तर यावेळी पोलिसांचा देखील बंदोबस्त पाहायला मिळाला.
इतर महत्वाच्या बातम्या:
SSC Exam : छ. संभाजीनगर जिल्ह्यातील दहावीच्या परीक्षेत कॉपीचे प्रकार, व्हिडिओ व्हायरल