Chhatrapati Sambhaji Nagar : श्वसनविकारांनी पालकांची चिंता वाढवली; छ. संभाजीनगरमध्ये 21 बालके व्हेंटिलेटरवर
Chhatrapati Sambhaji Nagar News: शहरातील एकट्या घाटी रुग्णालयातील बालरोग विभागात सध्या 21 बालके व्हेंटिलेटरवर (Ventilator) आहेत.
Chhatrapati Sambhaji Nagar News: छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhaji Nagar) पालकांची चिंता वाढवणारी बातमी. बालकांमध्ये श्वसनविकारांचे आजार वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. बालकांमध्ये सर्दी, खोकला, तापासह न्यूमोनिया, बालदम्यासह विषाणूजन्य आजार वाढल्याचे समोर आले आहे. यातून अनेक बालकांची प्रकृती गंभीरही होत असल्याने पालकांची चिंता वाढली आहे. शहरातील एकट्या घाटी रुग्णालयातील बालरोग विभागात सध्या 21 बालके व्हेंटिलेटरवर (Ventilator) आहेत. तसेच शहरातील अनेक खासगी रुग्णालयांमध्येही अशीच काहीशी परिस्थिती असल्याचे सांगितले जातेय. त्यामुळे आरोग्य विभाग देखील अलर्ट झाले आहे.
बदलत्या वातावरणामुळे आजारांचे प्रमाण वाढले आहे. रुग्णालयात सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढत आहे. तर सध्या घराघरांमध्ये सर्दी, खोकल्याने आबालवृद्ध हैराण होत आहेत.त्यातच अवकाळी पावसाने निर्माण झालेल्या वातावरणामुळे आजारवाढीला हातभार लागत आहे. अशात घाटी रुग्णालयासह खासगी रुग्णालयांत श्वसनविकारांच्या बालकांची संख्या वाढत आहे. खासगी रुग्णालयातील ओपीडीत 60 ते 70 टक्के बालके हे श्वसनविकारांचे आहेत. तर एकट्या घाटी रुग्णालयातील बालरोग विभागात सध्या 21 बालके व्हेंटिलेटरवर आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत पालकांनी काळजी घेतली पाहिजे. स्वतः आणि मुलांना गर्दीची ठिकाणे जाने टाळले पाहिजे. तसेच मास्कचा देखील वापर केला पाहिजे.
पालकांनी काळजी घ्यावी...
गेल्या काही दिवसांपासून सतत वातावरण बदलत आहे. त्यातच मागील आठवड्यापासून मराठवाड्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी गारपीट देखील होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे याचे परिणाम आरोग्यावर होत आहे. घरा-घरात सर्दीचे रुग्ण आढळून येत आहे. विशेष म्हणजे अशात लहान बालकांची अधिक चिंता वाढली आहे. कारण लहान बालकांमध्ये देखील सर्दी, खोकला आणि तापाने फणफणत असल्याचे दिसत आहे. शहरातील जवळपास सर्वच बालरुग्णालयात गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे पालकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. सद्या थंडीच्या वातावरणात बालकांना घराबाहेर आणताना काळजी घ्यावी, गर्दीची ठिकाणी जाणे टाळावे, मास्कचा वापर करावा, तसेच मुलांना थंड पदार्थ देणे टाळावे.
कोरोना रुग्ण देखील वाढले...
एकीकडे लहान बालकांमध्ये आजाराचे प्रमाण वाढले असतानाच, दुसरीकडे शहरात कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याचे चित्र आहे. शनिवारी शहरात एकाच दिवसात 17 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभाग अलर्ट झाले आहे. तर सध्या जिल्ह्यात एकूण 38 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा कोरोनाने छत्रपती संभाजीनगर शहरवासीयांची चिंता वाढवली आहे.
महत्वाच्या इतर बातम्या :