एक्स्प्लोर

Maharashtra Cabinet: मराठवाड्यातील 42 हजार हेक्टर जमिनींबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय, जमिनी वर्ग एक करणार

Marathwada news: मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय. 60 वर्षांपासूनची मागणी पूर्ण, लाखो नागरिकांना दिलासा मिळणार

छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यातील खालसा  झालेल्या इनाम दोनच्या व देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या (Cabinet Meeting) मंगळवारी मुंबईत पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार या जमिनीचा भोगवटा करताना चालू बाजारभावाप्रमाणे शंभर टक्के नजराणा भरावा लागणार आहे. या शंभर टक्के नजराण्यापैकी 40% नजराणा रक्कम महसूल म्हणून राज्य सरकारला मिळेल. तर 40 टक्के रक्कम ही धार्मिक संस्थांच्या देखभालीसाठी जमा होणार आहे. उर्वरित 20 टक्के रक्कम अत्तहियात अनुदानधारकांना त्यांच्या उदरनिर्वासाठी दिली जाणार आहे. मराठवाड्यातील एकूण 8 जिल्ह्यांमध्ये एकूण 42 हजार 710 हेक्टर जमीन आहे.

मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या निर्णयाचा लाभ लाखो नागरिकांना होणार असून ६० वर्षांपासूनची मागणी निकाली निघणार आहे. 

या अनुषंगाने हैद्राबाद इनाम निर्मूलन व रोख अनुदान अधिनियम १९५४ आणि हैद्राबाद अतियात चौकशी अधिनियम १९५२ मध्ये सुधारणा करण्यात येतील. मराठवाडयातील मदतमाश जमीनीच्या (केलेल्या कामगिरीसाठी इनाम दिलेल्या जमिनी) अकृषिक प्रयोजनाकरिता वर्ग 1 मधील रुपांतरणासाठी नजराण्याची रक्कम चालू बाजारमूल्याच्या 50 टक्के ऐवजी 5 टक्के इतकी आकारण्याचा निर्णय घेतला आहे.  त्याचप्रमाणे  सदर समितीच्या शिफारशीनुसार हैद्राबाद अतियात अनुदान चौकशी अधिनियम, 1952  च्या कलम 6 मध्ये दुरुस्ती करुन काही प्रमाणात जमीनी हस्तांतरण योग्य करण्याचादेखील निर्णय घेण्यात आला.

मराठवाडा विभागाच्या आठही जिल्ह्यात ४२ हजार ७१०.३१ हेक्टर जमीन ही अतियात अनुदान किंवा खिदमतमाश इनाम जमिनी (देवस्थानाच्या देखभालीसाठी दिलेल्या जमिनी) आहेत. तसेच १३ हजार ८०३.१३ हेक्टर जमीन ही मदतमाश इनाम जमीन आहेत.  मराठवाडा विभागातील मदतमाश इनाम जमिनींना हैद्राबाद इनाम निर्मूलन व रोख अनुदान अधिनियम १९५४ मधील तरतूदी लागू होतात. मराठवाड्यातील आठ जिल्‍ह्यांमध्‍ये हैद्राबाद इनामे व रोख अनुदान रद्द करण्‍याबाबत अधिनियम, १९५४ चे कलम ६(१) च्‍या तरतूदीनुसार दि.०९.०७.१९६० चे शासन परिपत्रकानुसार तत्‍कालीन परिस्थितीमध्‍ये  दि.०१.०७.१९६० रोजी इनामदार यांच्‍याकडील जमीनी खालसा (Abolition) करुन शासनाकडे निहित करण्‍यात आल्‍या. त्यानंतर सक्षम अधिकारी यांच्‍या पूर्वपरवानगीशिवाय हस्‍तांतरण व विभाजन करण्‍यास प्रतिबंध ठेवून नवीन अविभाज्‍य भोगवटादार २ च्‍या शर्तीवर इनामदार, काबीज-ए-कदीम, कायम कुळ व साधे कुळ यांचेकडून जमीनीचे तत्‍कालीन परिस्थितीत नजराणा/भोगवटा मुल्‍य घेवून पुनःप्रदान (Regrant) करण्‍यात आले आहे. 

मराठवाडा विभागातील मदतमाश इनाम जमिनींच्या हस्तांतरणावर हैद्राबाद इनाम निर्मूलन व रोख अनुदान अधिनियम १९५४ चे कलम ६ (३) अन्वये निर्बंध होते. मराठवाडा विभागात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी धारण केलेल्या इनाम जमिनींचे बेकायदेशीररित्या हस्तांतरणे झालेली आहेत. या जमिनीवरील निर्बंध कमी करण्यासाठी हैद्राबाद इनाम निर्मूलन व रोख अनुदान अधिनियम, १९५४ मध्ये सन 2015 मध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्यानुसार 50 टक्के नजराण्याची रक्कम घेवुन या जमीनी वर्ग-1 करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे.  तथापि, त्यानंतरही या इनाम मिळकतीच्या हस्तांतरणासंदर्भात आणखी काही निर्बंध कमी करणे आवश्यक होते.  याबाबत विविध लोकप्रतिनिधी यांचेकडून करण्यात आलेल्या मागणीनुसार श्री.अविनाश पाठक, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बीड यांचे अध्यतेखाली समिती गठित करण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल शासनास सादर केला होता. 

तसेच बीड जिल्ह्यातील देवस्थान इनाम जमिनीच्या अनधिकृत हस्तांतरणाबाबत प्राप्त तक्रारींबाबत शासनाने दिलेल्या निर्देशानुसार विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांनी गठीत केलेल्या समितीच्या  अहवालात केलेल्या ‍शिफारशीस अनुसरुन हैद्राबाद इनाम निर्मूलन व रोख अनुदान अधिनियम १९५४ च्या कलम 2 (ए) (3) मध्ये नमूद 1 वर्षाचा कालावधी संपल्यानंतर अपवादात्मक प्रकरणी उप कलम (1) अन्वये घेण्यात आलेल्या प्रकरणांची कायदेशीर वैधता, नियमितता तपासण्यासाठी एक वर्षाच्या कालावधीची मर्यादा वाढविणे आवश्यक होते. त्याचा विचार करुन या अधिनियमाच्या कलम 2 (ए) मधील तरतुदीनुसार जमीनीचा प्रकार ठरविलेल्या प्रकरणांचा अपवादात्मक प्रकरणी फेरविचार करण्यासाठी शासनाच्या मान्यतेने विभागीय आयुक्त यांना पुर्ननिरक्षणाचे अधिकार प्रदान करण्याकरिता हैदराबाद इनामे आणि रोख अनुदाने  नष्ट करणे अधिनियम, 1954 च्या कलम 2 ए (3) मध्ये सुधारणा करण्याचा मं‍त्रिमंडळाने निर्णय घेतला आहे.

कोणत्या जिल्ह्यात किती हेक्टर जमीन आहे 

छत्रपती संभाजीनगर-  7588 हेक्टर
जालना - 4411 हेक्टर
परभणी - 4351 हेक्टर 
नांदेड - ४८६६ हेक्टर 
हिंगोली - 1552 हेक्टर 
बीड -9318 हेक्टर 
लातूर- 2734 हेक्टर 
धाराशिव- 7886 एकर 

एकूण-  42 हजार 710 हेक्टर

कोणत्या जमीन भोगवटादार वर्ग एक म्हणून धारण करण्यास परवानगी देण्यात येणार आहे?

* खाजगी व्यक्तीने व मंडळाकडे कायम समर्पित मालमत्ता म्हणून थेट दान केलेल्या आहेत अशा जमिनी
* वक्फ व मंडळांनी खरेदी केलेल्या जमिनी
* खाजगी व्यक्तीने हिंदू देवस्थानकरिता दान करण्यात आलेल्या जमिनी
* धार्मिक संस्थेची मालमत्ता म्हणून खरेदी केलेल्या जमिनी
* ज्या जागेवर धार्मिक संस्थांचे मंदिर किंवा दर्गा किंवा मज्जित किंवा ईदगाह किंवा इमामबीरा किंवा मकबरा यांचे बांधकाम झाले आहे त्या व सभोवतालच्या जमिनी उपयोगात असलेल्या जमिनी

आणखी वाचा

राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपली; शिंदे सरकारचे 8 मोठे निर्णय, दूध उत्पादकांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एवढ्या मिरच्या का लागल्या, प्रचंड चिडचिड होते का? प्रशांत कोरटकरला फोडायला हात का शिवशिवला नाही? सुषमा अंधारेंचा कुणाल कामराची काॅपी करत शिंदे गटावर प्रहार
Video : एवढ्या मिरच्या का लागल्या, प्रचंड चिडचिड होते का? प्रशांत कोरटकरला फोडायला हात का शिवशिवला नाही? सुषमा अंधारेंचा कुणाल कामराची काॅपी करत शिंदे गटावर प्रहार
Siddharth Jadhav Wife Trupti Akkalwar: सिद्धार्थ जाधव रागात बायकोला म्हणाला, सगळे लोक तुला माझ्यामुळे ओळखतात; पत्नीने घेतला मोठा निर्णय अन् माहेरचं आडनाव...
सिद्धार्थ जाधव रागात बायकोला म्हणाला, सगळे लोक तुला माझ्यामुळे ओळखतात; पत्नीने घेतला मोठा निर्णय अन् माहेरचं आडनाव...
Satara Crime: थायलंडच्या बीचवर फुल मून पार्टी, समुद्रातील खडकावर 24 वर्षांच्या तरुणीवर अत्याचार, साताऱ्यातील 'ते' दोन नराधम कोण?
थायलंडच्या बीचवर जर्मन तरुणीच्या शरीराचे लचके तोडणारे साताऱ्यातील 'ते' दोन नराधम कोण? महत्त्वाची अपडेट
पोटाची खळगी भरण्यासाठी पोटचा गोळा दगडाला बांधून वेठबिगारी करतेय माय; काळीज हेलावणारा व्हिडिओ
पोटाची खळगी भरण्यासाठी पोटचा गोळा दगडाला बांधून वेठबिगारी करतेय माय; काळीज हेलावणारा व्हिडिओ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 01 PM TOP Headlines 01 PM 24 March 2025 दुपारी 01 च्या हेडलाईन्सWho is Kunal Kamra : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टिप्पणी करणारा कुणाल कामरा कोण आहे?ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12PM 24 March 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्सABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11AM 24 March 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एवढ्या मिरच्या का लागल्या, प्रचंड चिडचिड होते का? प्रशांत कोरटकरला फोडायला हात का शिवशिवला नाही? सुषमा अंधारेंचा कुणाल कामराची काॅपी करत शिंदे गटावर प्रहार
Video : एवढ्या मिरच्या का लागल्या, प्रचंड चिडचिड होते का? प्रशांत कोरटकरला फोडायला हात का शिवशिवला नाही? सुषमा अंधारेंचा कुणाल कामराची काॅपी करत शिंदे गटावर प्रहार
Siddharth Jadhav Wife Trupti Akkalwar: सिद्धार्थ जाधव रागात बायकोला म्हणाला, सगळे लोक तुला माझ्यामुळे ओळखतात; पत्नीने घेतला मोठा निर्णय अन् माहेरचं आडनाव...
सिद्धार्थ जाधव रागात बायकोला म्हणाला, सगळे लोक तुला माझ्यामुळे ओळखतात; पत्नीने घेतला मोठा निर्णय अन् माहेरचं आडनाव...
Satara Crime: थायलंडच्या बीचवर फुल मून पार्टी, समुद्रातील खडकावर 24 वर्षांच्या तरुणीवर अत्याचार, साताऱ्यातील 'ते' दोन नराधम कोण?
थायलंडच्या बीचवर जर्मन तरुणीच्या शरीराचे लचके तोडणारे साताऱ्यातील 'ते' दोन नराधम कोण? महत्त्वाची अपडेट
पोटाची खळगी भरण्यासाठी पोटचा गोळा दगडाला बांधून वेठबिगारी करतेय माय; काळीज हेलावणारा व्हिडिओ
पोटाची खळगी भरण्यासाठी पोटचा गोळा दगडाला बांधून वेठबिगारी करतेय माय; काळीज हेलावणारा व्हिडिओ
Kunal Sarmalkar on Aaditya Thackeray : अरे शेंबड्या, तू कोण सांगणार, तुमची लायकी तेव्हाच कळाली, कुणाल सरमळकरांचा आदित्य ठाकरेंवर एकेरी वार!
अरे शेंबड्या, तू कोण सांगणार, तुमची लायकी तेव्हाच कळाली, कुणाल सरमळकरांचा आदित्य ठाकरेंवर एकेरी वार!
Bhai Jagtap on Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसजी तुम्ही संविधानावर जास्त बोलू नका, संविधानाप्रमाणे वागता का? भाई जगतापांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
देवेंद्र फडणवीसजी तुम्ही संविधानावर जास्त बोलू नका, संविधानाप्रमाणे वागता का? भाई जगतापांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
Nashik News : कुंभमेळा नाशिकचा की त्र्यंबकेश्वरचा? मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर साधू-महंतांमधील वाद शिगेला; नेमकं काय घडलं?
कुंभमेळा नाशिकचा की त्र्यंबकेश्वरचा? मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर साधू-महंतांमधील वाद शिगेला; नेमकं काय घडलं?
Prashant Koratkar : शिवद्रोही प्रशांत कोरटकर व राहुल सोलापुरकर यांच्याही बेकायदेशीर बाबींची चौकशी करुन बुलडोजर चालवा; कोणी केली मागणी?
'शिवद्रोही प्रशांत कोरटकर व राहुल सोलापुरकर यांच्याही बेकायदेशीर बाबींची चौकशी करुन बुलडोजर चालवा'
Embed widget