![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Facebook Account : तुमच्या बनावट फेसबुक खात्याचा असा घ्या शोध; सायबर पोलिसांनी दिली माहिती
Facebook : बनावट खात्याचा शोध कसा घ्यावा आणि तो बंद कसे करावा याबाबत सायबर पोलिसांकडून (Cyber Police) महत्वाची माहिती देण्यात आली आहे.
![Facebook Account : तुमच्या बनावट फेसबुक खात्याचा असा घ्या शोध; सायबर पोलिसांनी दिली माहिती maharashtra Aurangabad Chhatrapati Sambhajinagar News how to find your fake Facebook account Information given by cyber police Facebook Account : तुमच्या बनावट फेसबुक खात्याचा असा घ्या शोध; सायबर पोलिसांनी दिली माहिती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/28/748ed3b344b2845bc567cf199d719eac1677582950008443_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Facebook Fake Account : सध्या अनेक व्यक्तींच्या नावाने बनावट फेसबुक खाते (Facebook Account) उघडल्या जात असल्याच्या घटना समोर येत आहे. एवढंच नाही तर, फ्रेंडलिस्टमधील लोकांकडे पैश्यांची (Money) मागणी देखील केली जात असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे अशावेळी आपल्या नावाने तयार करण्यात आलेल्या बनावट खात्याचा शोध कसा घ्यावा आणि तो बंद कसे करावा याबाबत सायबर पोलिसांकडून (Cyber Police) महत्वाची माहिती देण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर शहर (Chhatrapati Sambhajinagar City) पोलिसांच्या सायबर ठाण्याच्या निरीक्षक प्रवीणा यादव, सहायक निरीक्षक अमोल सातोदकर यांनी याबाबत माहिती दिली आहे.
तुमच्या बनावट फेसबुक खात्याचा असा घ्या शोध
- प्रथमत ज्यांची फेसबुक प्रोफाईल फेक बनवली आहे त्यांनी आपल्या स्वतःच्या फेसबुक अकाउंटवरून बनवलेली फेक प्रोफाईल शोधा. स्वतःला शोधता येत नसेल तर ज्या मित्रांना त्या प्रोफाईलवरून रिक्वेस्ट गेली आहे, त्यांच्याकडून सदर फेक प्रोफाइलची फेसबूक लिंक मागवून घ्या.
- त्या प्रोफाइलवर गेल्यानंतर प्रोफाईल वर उजव्या बाजूला तीन डॉट दिसतील, त्या डॉट वर क्लिक करा.
- तुमच्यासमोर Find Support Or Report Profile हा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा.
- त्यानंतर Pretending To Be Someone हा पहिला ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा.
- पुढे तुम्हाला 3 ऑप्शन दिसतील. Me, A Friend आणि Celebrity.
- आपण आपलीच बनवलेली फेक प्रोफाईल रिपोर्ट् करत असल्याने त्यापैकी Me हा ऑप्शन सिलेक्ट करा. आणि नेक्स्ट करा. फेक प्रोफाईल अकाउंट काही वेळाने बंद होईल.
पैसे मागितल्यास खात्री करा!
सध्या अनेक व्यक्तींच्या नावाने बनावट फेसबुक खाते उघडल्या जात असल्याच्या घटना समोर येत आहे. तसेच बनावट खाते बनवल्यावर त्या व्यक्तीच्या फ्रेंडलिस्टमधील मित्रांना वेगवेगळे कारण देऊन पैसे मागितले जात आहे. विशेष म्हणजे मागण्यात येणारी रक्कम हजार-दोन हजार असल्याने अनेकदा फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर देखील अनेकजण पोलिसात तक्रार करत नाही. त्यामुळे अशी फसवणूक टाळण्यासाठी पैसे मागण्यात आलेली प्रोफाईल खरी आहे का? याची खात्री करा. तसेच पैसे मागणाऱ्या मित्राला फोन करून त्याने पैसे मागितले का? खात्री करून घ्यावी. जेणेकरून तुमची फसवणूक टाळता येईल.
इतर महत्वाच्या बातम्या:
नाद खुळा चोर! दुचाकी चोरायचा पण विकत नव्हता; का तर म्हणे 'शौकीन हूं चोर नहीं'
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)