Jayakwadi Dam Water Level : दिलासा! जायकवाडी धरणाची पाणीपातळी दोन टक्क्यांनी वाढली, आवक सुरूच; पाहा आजची आकडेवारी?
Jayakwadi Dam Water Level : मागील 24 तासांत जायकवाडी धरणात 15 हजार 427 क्युसेकने पाण्याची आवक सुरु असून, धरणात सध्या 38 टक्के पाणीसाठा आहे.
Jayakwadi Dam Water Level : गेल्या तीन-चार वर्षांपासून अतिवृष्टीचा सामना करणाऱ्या मराठवाड्यात (Marathwada) यंदा पावसाने दडी मारल्याने काही भागात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, मागील तीन-चार दिवसांपासून होणाऱ्या जोरदार पावसामुळे दिलासा मिळाला आहे. दरम्यान, नाशिक जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणाची (Jayakwadi Dam) पाणीपातळी देखील वाढतांना पाहायला मिळत आहे. मागील 24 तासांत जायकवाडी धरणात 15 हजार 427 क्युसेकने पाण्याची आवक सुरु असून, धरणात सध्या 38 टक्के पाणीसाठा आहे.
नाशिक जिल्ह्यात मागील तीन-चार दिवसांत जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे, नद्या नाल्यांना पुर आल्याची परिस्थिती काही ठिकाणी पाहायला मिळाली. सोबतच जिल्ह्यातील महत्वाचे धरणं भरल्याने ओव्हरफ्लो झाली असून, त्यातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. वरील धरणातून पाण्याचा विसर्ग होत असल्याने गोदावरी नदीला पुर आले असून, जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरु आहे. त्यामुळे मागील 24 तासांत धरणात 2 टक्क्यांनी पाण्याची वाढ झाली आहे. जायकवाडी धरणात 15 हजार 427 क्युसेकने पाण्याची आवक सुरु आहे. नाशिक जिल्ह्यात आणखी जोरदार पाऊस झाल्यास पाण्याची आवक देखील वाढण्याची शक्यता आहे.
जायकवाडी धरण आकडेवारी...
- जायकवाडी धरणाची पाणी पातळी फुटामध्ये : 1508.25 फूट
- जायकवाडी धरणाची पाणी पातळी मीटरमध्ये : 459.715 मीटर
- एकूण पाणीसाठा दलघमी : 1562.507 दलघमी
- जिवंत पाणीसाठा दलघमी : 824.401 दलघमी
- जायकवाडी धरणाची पाणीसाठा टक्केवारी : 38 टक्के
- जायकवाडी धरणात पाण्याची आवक : 15427
- जायकवाडी धरण बाष्पीभवन : 00
- उजवा कालवा विसर्ग : 00 क्युसेक
- डावा कालवा विसर्ग : 300 क्युसेक
मागील वर्षी आजच्या दिवशीचा पाणीसाठा
- मागील वर्षी आजच्या दिवशीचा उपयुक्त पाणीसाठा दलघमी : 2166.159 दलघमी
- मागील वर्षी आजच्या दिवशीची उपयुक्त टक्केवारी : 97.98 टक्के
- 1 जून 2023 पासुन एकूण पाण्याची आवक : 462.44 दलघमी (16.33 टीएमसी)
- 1 जून 2023 पासुन एकूण सोडलेला विसर्ग : 1.41 दलघमी
रोजचा पाणीपुरवठा...
जायकवाडी धरणातून पिण्यासाठी रोज 50 दलघमी पाणी छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण भागासाठी, 150 दलघमी छत्रपती संभाजीनगर शहरासाठी आणि 22 दलघमी जालना शहरासाठी लागते. जायकवाडीमुळे ओलिताखाली असलेल्या क्षेत्रात छत्रपती संभाजीनगरमधील 9053 हेक्टर, जालना जिल्ह्यातील 36580 हेक्टर, अहमदनगर2200 हेक्टर, परभणी 97440 हेक्टर आणि बीड जिल्ह्यातील 37979 हेक्टर शेती जायकवाडीमुळे ओलिताखाली आहे.
मराठवाड्यातील धरणांची स्थिती...
- जायकवाडी : 38 टक्के
- विष्णुपुरी : 91.35 टक्के
- निम्न दुधना :25.50 टक्के
- येलदरी : 61.48 टक्के
- सिद्धेश्वर : 64.42 टक्के
- माजलगाव : 12.18 टक्के
- मांजरा : 24.11 टक्के
- गंगा : 72.76 टक्के
- मानार :65.83 टक्के
- निम्न तेरणा : 24. 27 टक्के
- सीनाकोळेगाव शून्य : 00
इतर महत्वाच्या बातम्या: