(Source: Poll of Polls)
जरांगेंचं मुंबई आंदोलन रोखण्यासाठी मीरा रोड प्रकरण घडवण्यात आले; जलील यांचा आरोप
Imtiyaz Jaleel : मराठा आंदोलकांनी मुंबईत (Mumbai) येऊ नयेत यासाठी मीरा रोडची घटना घडवण्यात आल्याचा आरोप जलील यांनी केला आहे.
Mumbai Meera Road: संपूर्ण देशात अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा निमित्ताने उत्सवाचं वातावरण असतानाच, मुंबईतील मीरा रोडच्या (Mira Road Tension) नया नगर (Naya Nagar) परिसरात दोन गटात हाणामारी झाल्याची घटना समोर आली होती. दरम्यान, या प्रकरणावरून आता राजकीय वातावरण देखील तापतांना पाहायला मिळत आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली असून, मीरा रोडवरील घडलेली घटना जाणीवपूर्वक घडवण्यात आली आहे. मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्याकडून करण्यात येत असलेल्या शांतेतील आंदोलन रोखण्यासाठी आणि मराठा आंदोलकांनी मुंबईत (Mumbai) येऊ नयेत यासाठी ही घटना घडवण्यात आल्याचा आरोप जलील यांनी केला आहे.
मीरा रोडच्या नया नगर परिसरात दोन गटाच्या रॅली निघाल्या होत्या. या दोन रॅली आमनेसामने आल्यानंतर बाचाबाची झाली त्यांनी परिसरात तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. या घटनेचे व्हिडिओ समोर आल्यावर भाजप आमदारांनी कारवाईची मागणी केली होती. तर, कारवाई होणारच असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. मात्र, यावरून जलील यांनी पोलिसांसह सत्ताधारी नेत्यांवर निशाणा साधला आहे. तर, मनोज जरांगे यांची आरक्षण यात्रा मुंबईत येऊ नयेत यासाठी अशा घटना घडवल्या जात असल्याचे जलील म्हणाले आहेत.
काय म्हणाले जलील...
इम्तियाज जलील यांनी याबाबत ट्वीट करत म्हटले आहे की,“ मीरा रोडची घटना म्हणजे मनोज जरांगे पाटील यांचे शांततापूर्ण सुरु असलेल्या आंदोलनाचा मुद्दा दुसरीकडे वळवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न सुरु असल्याचे दिसून येत आहे. लाखो मराठ्यांनी मुंबई गाठू नयेत अशी सरकारची इच्छा आहे. त्यामुळे जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर, अशावेळी मुस्लिमांना शस्त्र म्हणून वापरण्याची त्यांची जुनी रणनीती आता पुन्हा वापरली जात आहे. या घटनेत दंगलखोरांवर कोणतेही कारवाई न करता, पोलीस फक्त बघ्याची भूमिका घेत होते. मीरा रोड हा संवेदनशील परिसर असून, तेथे अपेक्षित व्यवस्था का करण्यात आली नाही. सी ग्रेडच्या नेत्यांना द्वेषपूर्ण वक्तव्ये करून वातावरण बिघडवण्याची परवानगी का दिली जात आहे?, हिंसाचाराच्या घटनांवर कारवाई झाली पाहिजे. पोलिसांनी राजकीय दबावाला बळी पडू नयेत आणि प्रामाणिकपणे आपले काम करावे. तर, महाराष्ट्र शांत राहावा अशी आमची इच्छा असल्याचे जलील म्हणाले.
मीरा रोड की घटना जारांगे पाटिल के शांतिपूर्ण मार्च को अस्थिर करने और मुद्दे को भटकाने का एक जानबूझकर किया गया प्रयास प्रतीत होता है। सरकार नहीं चाहती कि लाखों मराठा मुंबई पहुंचें। इसलिए वे सांप्रदायिक तनाव पैदा करने की कोशिश कर रहे हैं और इसके लिए वे मुसलमानों को एक उपकरण के रूप…
— Imtiaz Jaleel (@imtiaz_jaleel) January 23, 2024
इतर महत्वाच्या बातम्या:
मीरारोडमध्ये दोन गटात मिरवणुकीदरम्यान वाद, वाहनांची तोडफोड; सध्या परिस्थिती नियंत्रणात