एक्स्प्लोर

धक्कादायक! छत्रपती संभाजीनगरमध्ये कपड्याच्या दुकानाला भीषण आग, एकाच घरातील 7 जणांचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) छावणी परिसरात कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली. यामध्ये दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या 7 जणांचा गुदमरून मृत्यू झाला आहे.

Chhatrapati Sambhajinagar Fire : छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) छावणी परिसरात कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली. यामध्ये दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या 7 जणांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन महिला आणि दोन मुलांचाही समावेश आहे. पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. हे कपड्याचे दुकान छावणी दाना बाजार  गल्लीतील महावीर जैन मंदिरच्या बाजूला होते. 

एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर शहरात आगीच्या घटनेत एकाच वेळी सात जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. शहरातील छावणी परिसरातील जैन मंदिराजवळ असलेल्या एका तीन मजली इमारतीला मध्यरात्री अचानक आग लागली. या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. मृतदेह शासकीय घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले असून पोलिसांकडून पंचनामा केला जात आहे.

आगीत दुसऱ्या मजल्यावर असलेल्या 7 जणांचा मृत्यू

या आग लागलेल्या इमारतीत एकूण 16 लोक होते. पहिल्या मजल्यावर 7 लोक होते. तर दुसऱ्या मजल्यावर 7 लोक होते आणि तिसऱ्या मजल्यावर 2 लोक होते. यामध्ये दुसऱ्या मजल्यावरील सर्व सात लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, आग लागल्याची माहिती मिळताच तातडीने अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. मात्र, तोपर्यंत सर्व दुकान जळून खाक झालं होतं. तसेच यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेत अग्निशमाक दलाचा एक जवानही जखमी झाला आहे. किंग स्टाईल टेलर्स असं या कापड दुकानाचं नाव होतं.  

मृतांची नावे

आसिम वसीम शेख, 3 वर्ष मुलगा

परी वसीम शेख 2 वर्ष मुलगी

वसीम शेख, 30 वर्ष

तन्वीर वसीम,महिला  23 वर्ष

हमीदा बेगम, 50 वर्ष

शेख सोहेल 35 वर्ष

रेश्मा शेख 22 वर्ष

महत्वाच्या बातम्या:

Delhi Fire : दिल्लीत आगीचा रौद्रावतार; अग्निशमन दलाच्या 34 गाड्या घटनास्थळी दाखल, आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सावधान! उद्या मुंबईसह राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा, कुठं यलो तर कुठं ऑरेंज अलर्ट
सावधान! उद्या मुंबईसह राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा, कुठं यलो तर कुठं ऑरेंज अलर्ट
सावधान! उजनीतून 60 हजार क्युसेक्स तर वीर धरणातून 50 हजार क्युसेक्सने भीमा नदीत विसर्ग सुरु, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा  
सावधान! उजनीतून 60 हजार क्युसेक्स तर वीर धरणातून 50 हजार क्युसेक्सने भीमा नदीत विसर्ग सुरु, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा  
Chhatrapati Sambhaji nagar: डिअर अहो, बाय! यू आर फ्री बर्ड नाऊ... काळजाचं पाणी करणारी 7 पानी चिठ्ठी, पतीच्या छळाला कंटाळून डॉक्टर पत्नीने आयुष्य संपवलं
काळजाचं पाणी करणारी 7 पानी चिठ्ठी, पतीच्या छळाला कंटाळून डॉक्टर पत्नीने आयुष्य संपवलं
Rayat Kranti Sanghatana : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी ते सोयाबीन, कापूस दर, रयत क्रांती संघटनेच्या बैठकीत महत्वाचे ठराव 
Rayat Kranti Sanghatana : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी ते सोयाबीन, कापूस दर, रयत क्रांती संघटनेच्या बैठकीत महत्वाचे ठराव 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 6 AM :25 ऑगस्ट 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM : 25ऑगस्ट 2024: ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 26 August 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सVikroli Dahihandi Shibir : विक्रोळीत दहीहंडी शिबीर, अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची हजेरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सावधान! उद्या मुंबईसह राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा, कुठं यलो तर कुठं ऑरेंज अलर्ट
सावधान! उद्या मुंबईसह राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा, कुठं यलो तर कुठं ऑरेंज अलर्ट
सावधान! उजनीतून 60 हजार क्युसेक्स तर वीर धरणातून 50 हजार क्युसेक्सने भीमा नदीत विसर्ग सुरु, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा  
सावधान! उजनीतून 60 हजार क्युसेक्स तर वीर धरणातून 50 हजार क्युसेक्सने भीमा नदीत विसर्ग सुरु, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा  
Chhatrapati Sambhaji nagar: डिअर अहो, बाय! यू आर फ्री बर्ड नाऊ... काळजाचं पाणी करणारी 7 पानी चिठ्ठी, पतीच्या छळाला कंटाळून डॉक्टर पत्नीने आयुष्य संपवलं
काळजाचं पाणी करणारी 7 पानी चिठ्ठी, पतीच्या छळाला कंटाळून डॉक्टर पत्नीने आयुष्य संपवलं
Rayat Kranti Sanghatana : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी ते सोयाबीन, कापूस दर, रयत क्रांती संघटनेच्या बैठकीत महत्वाचे ठराव 
Rayat Kranti Sanghatana : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी ते सोयाबीन, कापूस दर, रयत क्रांती संघटनेच्या बैठकीत महत्वाचे ठराव 
Sharad Pawar : मी पांडुरंगाच्या दर्शनाला जातो, पण कधीही गाजावाजा नाटक करत नाही : शरद पवार
Sharad Pawar : मी पांडुरंगाच्या दर्शनाला जातो, पण कधीही गाजावाजा नाटक करत नाही : शरद पवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 ऑगस्ट 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 ऑगस्ट 2024 | रविवार
Congress on New Pension :'यूपीएसमध्ये यू म्हणजे मोदी सरकारचा यू टर्न', पंतप्रधानांच्या सत्तेचा मग्रूर जनतेच्या सत्तेने मोडीत काढला; नव्या पेन्शन योजनेवर काँग्रेसचा हल्लाबोल
'यूपीएसमध्ये यू म्हणजे मोदी सरकारचा यू टर्न', पंतप्रधानांच्या सत्तेचा मग्रूर जनतेच्या सत्तेने मोडीत काढला; नव्या पेन्शन योजनेवर काँग्रेसचा हल्लाबोल
Anil Bonde : राफावर दुःख व्यक्त करणाऱ्यांना हिंदूंवरील अत्याचार दिसत नाहीत का? खासदार अनिल बोंडेंचा विरोधकांना सवाल
राफावर दुःख व्यक्त करणाऱ्यांना हिंदूंवरील अत्याचार दिसत नाहीत का? खासदार अनिल बोंडेंचा विरोधकांना सवाल
Embed widget