पुण्यात बिर्याणी चोर! भूक भागवण्यासाठी मुळशीतलं प्रसिद्ध बिर्याणी हॉटेल फोडलं, बिर्याणी तर मिळाली नाही, मग..
पुणे जिल्ह्यातील मुळशी भागात एका प्रसिद्ध बिर्याणी हॉटेलमध्ये 14 जानेवारी रोजी पहाटे 3.51 वाजता घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडवली आहे. या घटनेची सध्या परिसरात एकच चर्चा आहे.
Pune Crime: पुण्यातल्या मुळशी भागात एका प्रसिद्ध बिर्याणी हॉटेलमध्ये चोरट्यांचं अजब कृत्य चर्चेचा विषय ठरला आहे. भूक भागवण्यासाठी मुळशीतलं प्रसिद्ध बिर्याणी हॉटेल फोडत हॉटेलच्या किचनमध्ये तिघे जण तोंडाला मास्क लावून घुसले. संपूर्ण किचन शब्दशः उचकले पण त्यांना एका ही भांड्यात बिर्याणीचा एक घास सुद्धा मिळाला नाही. शेवटी बिर्याणी न मिळाल्याने चोरट्यांनी हॉटेलमधलं चिकन लॉलीपॉप आणि 30 रुपयांची चिल्लर चोरली व कोल्ड्रींक पिऊन पळ काढला आहे. ही संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद झाली आहे. (Biryani Thief )
पुणे जिल्ह्यातील मुळशी भागात एका प्रसिद्ध बिर्याणी हॉटेलमध्ये 14 जानेवारी रोजी पहाटे 3.51 वाजता घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडवली आहे. या घटनेची सध्या परिसरात एकच चर्चा आहे.
CCTVत कैद झाला बिर्याणी चोरांचा उच्छाद!
सीसीटीव्ही फुटेजनुसार, दोन ते तीन चोरट्यांनी हॉटेलचे शटर तोडून आत प्रवेश केला. हॉटेलमध्ये बिर्याणी प्रसिद्ध असल्याने चोरटे थेट किचनमध्ये घुसले. त्यांच्या तोंडाला मास्क लावले होते, त्यामुळे चेहऱ्याची ओळख पटवणे कठीण आहे. चोरट्यांनी किचनमधील प्रत्येक भांडे उचकले, पण त्यांना बिर्याणीचा एक घासही सापडला नाही.
बिर्याणी न मिळाल्याने संतापलेल्या चोरट्यांनी हॉटेलमधील चिकन लॉलीपॉप चोरले आणि 30 रुपयांची चिल्लर लुटली. तिथल्या कोल्ड्रिंक्स पिऊन त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे किचनमध्ये गोंधळ घालताना आणि भांडे तपासत असताना स्पष्टपणे दिसत आहेत.
पोलिसांचा तपास सुरु
हॉटेल मालकांनी या प्रकाराबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी फुटेज ताब्यात घेतले असून चोरट्यांचा शोध सुरू आहे. या घटनेने हॉटेल मालकांना आर्थिक नुकसान तर झालेच आहे, पण बिर्याणीच्या शोधात आलेल्या चोरट्यांच्या विचित्र कृत्यामुळे ही घटना चर्चेचा विषय बनली आहे. मुळशी भागातील हे हॉटेल बिर्याणीसाठी प्रसिद्ध असून अनेक ग्राहक येथे येतात. या घटनेनंतर हॉटेलमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पोलीस तपास सुरू आहे.
हेही वाचा: