(Source: ECI/ABP News/ABP Majha)
फीस परत न दिल्याने बीडच्या तरुणाची आत्महत्या, मराठा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी क्लासेसमध्ये घुसत केली तोडफोड, नक्की प्रकार काय?
सुसाईडनोट लिहून केली आत्महत्या, फीस परत न दिल्याचे कारण दिल्याने आकाश इन्स्टीट्यूटमध्ये घुसत मराठा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली.
Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एका क्लासेसची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. या क्लास चालकाने घेतलेले पैसे परत मिळत नसल्याने बीड जिल्ह्यातील तरुणाने सुसाईड नोट लिहून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केल्याचं समजतंय.
नक्की काय झाले होते?
बीडच्या माजलगाव येथील सुदर्शन तौर्य तरुणांना छत्रपती संभाजीनगर शहरातील आकाश इन्स्टिट्यूटमध्ये काही दिवसांपूर्वी ऍडमिशन घेतले होते. त्यावेळी त्याने 58,000 भरले होते. मात्र, आठ दिवसात या तरुणाने क्लासेस सोडले आणि पैसे परत मागितले. पण का क्लास चालक पैसे परत देत नसल्याने या तरुणांना माजलगाव येथे राहत्या घरात सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर मराठा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी क्लासेसमध्ये जाऊन तोडफोड केली आहे.
भरलेली फिस परत न दिल्याने तरुणाची आत्महत्या
बीड मधील एका तरुणाने क्लासेस सोडल्यानंतर भरलेली फी परत न दिल्याने सुसाईड नोट लिहित आत्महत्या केली होती. मानसिक स्वास्थ्य चांगलं नसल्याने सुदर्शन तोर या तरुणांनं छत्रपती संभाजीनगरच्या आकाश क्लासेसमधून ऍडमिशन रद्द केले होते. व भरलेली फीस परत मिळावी यासाठी वारंवार अर्जही केले होते. या घटनेला पाच महिने होत आले तरी त्यावर काही कारवाई केली नसून फीस वापस न दिल्यास पॉयझन घेऊन आपल्या आयुष्य संपवायचे प्रयत्न करेन. बरे वाईट झाले तर त्याला आकाश क्लासेसचे शिक्षक जबाबदार राहतील अशी सुसाईड नोट लिहित त्यांनी आत्महत्या केली होती.
मराठा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी क्लासेसची केली तोडफोड
बीडच्या तरुणाच्या आत्महत्येनंतर छत्रपती संभाजी नगर मध्ये मराठा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या क्लासची जबर तोडफोड केली आहे. इथं कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीसह तोडफोडही केली. उद्यापासून हा क्लास सुरू राहणार नाही असे म्हणत कार्यकर्त्यांनी आकाश इन्स्टिट्यूटला जात गोंधळ घातल्याचे दिसून आले.