Chhatrapati Sambhajinagar : पोलिसांना शिवीगाळ करुन धमकवणाऱ्या माजोरड्या कुणाल बाकलीवालला मोठा दणका
Chhatrapati Sambhajinagar : पोलिसांना शिवीगाळ करुन धमकवणाऱ्या कुणाल बाकलीवाल विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर शहरात सुसाट वेगात व्हीआयपी सायरन वाजवत जाणाऱ्या कारचालकाने वाहतूक पोलिसांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करुन धमकावल्या व्हिडीओ आज (दि.26) सकाळी व्हायरल झाला होता. कुणाल बाकलीवाल असं पोलिसांना धमकी देणाऱ्या या व्यक्तीचं नाव आहे. हिंदीतून 'तू मला ओळखले नाही का, बुढ्ढे तेरेको ड्युटी करनी आती क्या' असे म्हणत शिवीगाळ करुन सस्पेंड करण्याची धमकी देण्यापर्यंत कुणाल बाकलीवाल याने मजल मारली होती.
पोलिसांनी गाडीसह कुणाल बाकलीवालला ताब्यात घेतलं, गुन्हाही दाखल
दरम्यान, पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या आणि धमकवणाऱ्या कुणाल बाकलीवाल याच्या विरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आलाय.. शासकीय कामात अडथळा आणणे आणि मोटर वेहिकल कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलाय.. कुणालची गाडी पोलिस ठाण्यात आणली असून त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. कुणाल छत्रपती संभाजी नगर मधील प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिक आहे. राजकीय नेत्यांशीही त्याचे संबंध असल्याचे बोलले जात आहे.
View this post on Instagram
नेमकं घडलं काय होतं?
काळ्या आलिशान डिफेंडर गाडीतून जाणाऱ्या कुणाल बाकलिवालला वाहतूक पोलिसांनी गाडीतून उतरून नियमांचे पालन करण्यास सांगितले होते. यावर त्याने हिंदीतून "बुढ्ढे, तेरेको ड्युटी करनी आती क्या?" असं म्हणत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली होती. पोलिसांना गाडीतून खाली उतरायलाही नकार देत त्याने, "साहेबांना बोल, मला ओळखत नाही का? दोन तासांत तुम्हाला सस्पेंड करतो," अशी धमकी दिली. गाडीतूनच माजोरड्या बाकलीवालने पोलिसांना गप्प बसण्यास सांगितलं होतं. याच वेळी पोलिसांनी हा सर्व प्रकार रेकॉर्ड केला. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल होता. मात्र, हे लक्षात येऊनही त्याचा माज कमी झाला नाही. "जनतेच्या पैशातून पगार मिळतो, पण तुम्ही जनतेलाच वागवता का?" असे सांगत त्याने एका मोठ्या व्यक्तीचा फोन पोलिसांकडे दिला होता. दरम्यान, पोलिसांनी या बाकलीवाल ताब्यात घेतलंय.
View this post on Instagram
इतर महत्त्वाच्या बातम्या