(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chhatrapati Sambhaji Nagar : ऑडी क्यू 3 कारचं उत्पादन आता संभाजीनगरात; शहराची आणखी एक वेगळी ओळख
Chhatrapati Sambhaji Nagar : ही बाब छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक वसाहतीसाठी भूषणावह असल्याचे मानले जात आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar News : उद्योग क्षेत्रात ऑटो हब (Auto Hub) म्हणून छत्रपती संभाजीनगर शहराची (Chhatrapati Sambhaji Nagar City) एक वेगळी ओळख निर्माण झालेली आहे. दरम्यान, यात आणखी एक पडणार असून, बहुराष्ट्रीय ऑडी कंपनीच्या (Audi Company) क्यू 3 (Audi Q3) आणि क्यू 3 स्पोर्ट्सबॅक या दोन मॉडेलचे उत्पादन आता थेट छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार आहे. शहरातील शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील स्कोडा ऑटो फोक्स वॅगन प्लॅटमध्ये या मॉडेलच्या कारच्या उत्पादनाला सुरुवात झाली. त्यामुळे ही बाब छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक वसाहतीसाठी भूषणावह असल्याचे मानले जात आहे.
लक्झरी कार उत्पादनामधील मोठे नाव असलेल्या ऑडीने आपल्या ऑडी क्यू 3 आणि क्यू 3 स्पोर्टबॅक या दोन नवीन मॉडेलचे उत्पादन छत्रपती संभाजीनगर येथून सुरू केले आहे. या दोन्ही लग्झरी कार भारतीय बाजारपेठेत लॉन्च झाल्यानंतर कंपनीने या मॉडेल्सचे स्थानिक उत्पादन छत्रपती संभाजीनगर येथून सुरू केले आहे. त्यामुळे या दोन मॉडेलचे उत्पादन आता मेड इन इंडियाच नव्हे तर मेड इन छत्रपती संभाजीनगर असे असणार आहे. तर छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक वसाहतीसाठी ही बाब भूषणावह असणार आहे.
ऑगस्ट 2022 मध्ये ऑडी क्यू 3 आणि फेब्रुवारी 2023 मध्ये ऑडी क्यू 3 स्पोर्टबॅक लॉन्च करण्यात आली होती. त्यानंतर लगेच कंपनीने या मॉडेल्सचे स्थानिक उत्पादन छत्रपती संभाजीनगर येथे असलेल्या स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एसएव्हीडब्ल्यूपीएल) येथून नवीन दोन मॉडेलचे उत्पादन सुरू करण्यात आले आहे. तर नव्याने लॉन्च करण्यात आलेले ऑडी क्यू 3 स्पोर्टबॅक हे ऑडी क्यू 3 वर आधारित असून गाडीला कुप-इश रुफलाइन मिळते. ज्यामुळे गाडी बोल्ड दिसते, स्टायलिंगसाठी गाडीच्या बाहेरील भागामध्ये बदल करण्यात आले आहेत. ज्यामध्ये अलॉय व्हील, एलईडी हेडलॅम्प, नवीन स्टाईलने डिझाईन केलेले टेललाइट आदींचा समावेश आहे.
ऑडी कंपनीकडून द्विटरवरून माहिती...
याबाबत ऑडी कंपनीने द्विटरवरून दिलेल्या माहितीनुसार, ऑडी कंपनीने त्यांच्या कंपनीने भारतीय ग्राहकांच्या पसंतीला महत्त्व दिले आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार स्कोडा कंपनीच्या प्रकल्पात याची सुरुवात केली. येथील स्कोडा कंपनीत फोक्सवॅगनच्या कार असेम्बल केल्या जातात. यासोबतच येथे ऑडीच्या काही मॉडेलची निर्मिती होणार आहे. भारतीय ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवून या कारची डिझाइन करण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑडी कंपनीने क्यू 3 आणि क्यू 3 स्पोर्ट्सबॅक या दोन मॉडेलचे उत्पादन सुरु केल्याची माहिती देखील कंपनीने द्विटरवरून दिली आहे.
When style meets versatility. The Q3 family. Audi India begins local production of the popular Audi Q3 and Q3 Sportback at the SAVWIPL plant in Aurangabad. #AudiIndia #AudiQ3 #AudiQ3Sportback #FutureIsAnAttitude pic.twitter.com/9GDI4SJATR
— Audi India (@AudiIN) May 3, 2023
इतर महत्वाच्या बातम्या :