एक्स्प्लोर

‘राज्य आमचे आहे, तुमची गुर्मी उतरवू’; भाजप नेत्याची पोलिसांना 'धमकी', व्हिडिओ व्हायरल

Chhatrapati Sambhaji Nagar : या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. विशेष म्हणजे पोलिसांकडून या प्रकरणात फक्त एनसी दाखल करण्यात आली आहे. 

छत्रपती संभाजीनगर : गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाजपच्या (BJP) नेत्यांना पोलिसांबद्दल मुक्ताफळे उधळण्याची जणू परवानगीच दिली नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याचं कारण म्हणजे पोलीस माझं काही वाकडं करू शकत नाही असे वक्तव्य करणाऱ्या नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यानंतर आता आणखी एका भाजप नेत्याचा असाच व्हिडिओ (Video) समोर आला आहे.  शिवजयंतीनिमित्त काढलेली दुचाकी रॅली अडवल्याचा राग अनावर झाल्याने छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhaji Nagar) भाजपच्या माजी नगरसेवक अनिल मकरिये यांनी पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना ‘राज्य आमचे आहे, तुमची गुर्मी उतरवू,’ असे म्हणत धमकावल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. विशेष म्हणजे पोलिसांकडून या प्रकरणात फक्त एनसी दाखल करण्यात आली आहे. 

छत्रपती संभाजीनगर शहरात शिवजयंती निमित्त दुचाकी रॅली काढण्यात आली होती. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नयेत यासाठी पोलिसांकडून काही ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले होते. दरम्यान, याचवेळी या मार्गावरून दुचाकी रॅली निघाली होती. यातील काहीजण चुकीच्या दिशेने जात असल्याने पोलिसांना त्यांना अडवून परत जाण्याच्या सूचना दिल्या. यावेळी तिथे भाजपचे माजी नगरसेवक अनिल मकरीये पोहचले. त्यांनी थेट पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना दम भरला. तसेच ‘राज्य आमचे आहे, तुमची गुर्मी उतरवू’ अशी थेट धमकीच दिली. शेवटी वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी प्रकरण मिटवले. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला असून, ज्यात माजी नगरसेवक मकरीये पोलिसांना दम देतांना पाहायला मिळत आहे. 

फक्त एनसी दाखल...

एखाद्या पोलीस अधिकारी यांना कर्तव्यावर असतांना धमकी दिल्यावर थेट शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येतो. त्यामुळे या प्रकरणात देखील कठोर कारवाई होईल अशी अपेक्षा होती. मात्र, पोलिसांनी फक्त एनसी दाखल केली आहे. भाजप नेत्याच्या जागी जर सर्वसामान्य व्यक्ती असता तर पोलिसांची अशीच भूमिका राहिली असती का? असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे मकरीये हे एका मंत्र्याच्या जवळचे नेते असल्याने पोलिसांकडून कठोर कारवाई झाली नसल्याची चर्चा पाहायला मिळत आहे. मात्र, पोलीस दलात दबक्या आवाजात या किरकोळ कारवाईमुळे नाराजी व्यक्त केली जात आहे. 

भाजप नेत्यांना झालं तरी काय? 

मागील काही दिवसांपासून भाजप नेत्यांकडून सतत पोलिसांबद्दल अशी अपमानास्पद वक्तव्य केली जात आहे. 'पोलीस माझं काही वाकडं करू शकत नाही, आमचा बॉस सागर बंगल्यावर बसला असल्याचे' वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे यांनी केले होते. त्यानंतर 'माझ्या कुठल्याही वक्तव्यावर पोलीस माझं काही बिघडवू शकत नाही. ते व्हिडिओ काढतायेत, पण घरी जाऊन फक्त बायकोला दाखवतील, असे वक्तव्य राणे यांनी केले होते. आता भाजपचा माजी नगरसेवक पोलिसांना ‘राज्य आमचे आहे, तुमची गुर्मी उतरवू,’ असे म्हणत दम देत आहे. त्यामुळे गृहमंत्री असलेल्या फडणवीस यांच्या भाजप पक्षातील नेत्यांना झालं तरी काय? असा प्रश्न विचारला जात आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या :

Nitin Deshmukh : पोलीस नितेश राणेंना बायकोसमोर गाXXवर फटके मारुन उचलतील : नितीन देशमुख

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एका दिवसात नाही, तासाभरातच 3 रेकॉर्ड; भारताची तुफानी फलंदाजी, सर्वात जलद 50, 100, 150
एका दिवसात नाही, तासाभरातच 3 रेकॉर्ड; भारताची तुफानी फलंदाजी, सर्वात जलद 50, 100, 150
अविमुक्तेश्वर महाराजांकडून स्तुतीसुमने, हाती शिवधनुष्य; सांगितला CM चा वेगळाच लाँग फॉर्म
अविमुक्तेश्वर महाराजांकडून स्तुतीसुमने, हाती शिवधनुष्य; सांगितला CM चा वेगळाच लाँग फॉर्म
Devendra Fadnavis : 48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले, काही लोकांचा आत्मविश्वास वाढला : देवेंद्र फडणवीस
48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले, काही लोकांचा आत्मविश्वास वाढला : देवेंद्र फडणवीस
पुण्यात CBI ची धाड, 10 जणांना अटक; कॉल सेंटरवर छापे, लाखो रुपयांसह 3 लक्झरी कार जप्त
पुण्यात CBI ची धाड, 10 जणांना अटक; कॉल सेंटरवर छापे, लाखो रुपयांसह 3 लक्झरी कार जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Swami Avimukteshwaranand : गोमातेसाठी शासनाचा मोठा निर्णय; अविमुक्तेश्वरानंद स्वामी म्हणतातMaharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 30 Sep 2024 : 09 PM : ABP MajhaTop 25 : टॉप 25 न्यूज : 07 PM : राज्यातील महत्त्वाच्या बातम्या : 30 सप्टेंबर 2024 : ABP MajhaAjit Pawar VS Sharad Pawar : पुतण्याचे नेते काकांच्या भेटीला, 'डर का माहोल' कुणाकडे? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एका दिवसात नाही, तासाभरातच 3 रेकॉर्ड; भारताची तुफानी फलंदाजी, सर्वात जलद 50, 100, 150
एका दिवसात नाही, तासाभरातच 3 रेकॉर्ड; भारताची तुफानी फलंदाजी, सर्वात जलद 50, 100, 150
अविमुक्तेश्वर महाराजांकडून स्तुतीसुमने, हाती शिवधनुष्य; सांगितला CM चा वेगळाच लाँग फॉर्म
अविमुक्तेश्वर महाराजांकडून स्तुतीसुमने, हाती शिवधनुष्य; सांगितला CM चा वेगळाच लाँग फॉर्म
Devendra Fadnavis : 48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले, काही लोकांचा आत्मविश्वास वाढला : देवेंद्र फडणवीस
48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले, काही लोकांचा आत्मविश्वास वाढला : देवेंद्र फडणवीस
पुण्यात CBI ची धाड, 10 जणांना अटक; कॉल सेंटरवर छापे, लाखो रुपयांसह 3 लक्झरी कार जप्त
पुण्यात CBI ची धाड, 10 जणांना अटक; कॉल सेंटरवर छापे, लाखो रुपयांसह 3 लक्झरी कार जप्त
Supreme Court : ऑल द बेस्ट! टॅलेंट वाया जाऊ देऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टाचे दलित विद्यार्थ्याला IITमध्ये प्रवेश देण्याचे निर्देश
ऑल द बेस्ट! टॅलेंट वाया जाऊ देऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टाचे दलित विद्यार्थ्याला IITमध्ये प्रवेश देण्याचे निर्देश
पाहुण्याला उमेदवारी नको, विपुल कदमांना रामदासभाईंचा विरोध; थेट एकनाथ शिंदेंनाच दिला इशारा
पाहुण्याला उमेदवारी नको, विपुल कदमांना रामदासभाईंचा विरोध; थेट एकनाथ शिंदेंनाच दिला इशारा
India vs Bangladesh, 2nd Test : टीम इंडियाच्या धुरंदरांनी अनिर्णित होणारी कसोटी विजयाकडे खेचली; चौथ्या दिवशी विक्रमांचा पाऊस पाडला!
टीम इंडियाच्या धुरंदरांनी अनिर्णित होणारी कसोटी विजयाकडे खेचली; चौथ्या दिवशी विक्रमांचा पाऊस पाडला!
नाशिकमध्ये बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालयावरून वाद पेटला, मनसेचा थेट मनपा अधिकाऱ्यांना घेराव, नेमकं काय आहे प्रकरण?
नाशिकमध्ये बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालयावरून वाद पेटला, मनसेचा थेट मनपा अधिकाऱ्यांना घेराव, नेमकं काय आहे प्रकरण?
Embed widget