Nitin Deshmukh : पोलीस नितेश राणेंना बायकोसमोर गाXXवर फटके मारुन उचलतील : नितीन देशमुख
Nitesh Rane Statement On Police : भाजप आमदार नितेश राणे यांनी पोलिसांबद्दल केलेल्या वक्तव्यावर त्याच भाषेत उत्तर देताना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
अकोला : पोलिसांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या नितेश राणेंना (Nitesh Rane) काय माहिती आहे, पोलिसांनी त्याच्या बापाला जेवता जेवता उचलून आणलं होतं, आता त्यांच्या बायकोसमोरच फटके मारून उचलतील असं वक्तव्य ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांनी (Nitin Deshmukh) केलं आहे. अकोल्यातील सभेत पोलिसांबद्दल वक्तव्य करताना भाजप आमदार नितेश राणे यांनी अपशब्द वापरले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना नितीन देशमुखांनी नितेश राणे यांच्यावर जोरदार टीका केली.
पोलीस आपल्या संरक्षणासाठी असतात, ते त्यांची ड्युटी प्रामाणिकपणे करतात. त्यांच्याबद्दल नितेश राणे यांनी अपशब्द वापरले असं आमदार नितीन देशमुख म्हणाले. ते म्हणाले की, पोलीस आपलं काय करणार, फार तर व्हिडीओ काढणार आणि त्यांच्या बायकोला दाखवणार, यापलिकडे ते काहीही करणार नाहीत असं वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे यांनी केलं होतं. त्यावर आज ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांनी टीका केली.
नितेश राणेंना पोलीस उचलून आणतील
आमदार नितीन देशमुख म्हणाले की, "नितेश राणे बोलले की पोलीस काय करतील? माझा व्हिडिओ काढतील आणि बायकोला दाखवतील. त्यांचं हे वक्तव्य चुकीचं आहे. नितेशला माहिती नाही काय? पोलिसांनी त्याच्या बापाला जेवता-जेवता उचलून आणलं होतं. एक दिवस असा येईल पोलीस याच्या बायकोसमोर गाXXवर फटके मारतील आणि उचलून आणतील. भाजप आमदारांना सत्तेची मस्ती आलीय. ती लवकरच उतरेल."
नितेश राणेंचे वादग्रस्त वक्तव्य
अकोल्यातील एका सभेत भाषण करताना भाजप आमदार नितेश राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यामध्ये त्यांनी वक्फ बोर्डाच्या जमिनीच्या विषयावर बोलताना पोलिसांबद्दल अपशब्द वापरले होते. पोलीस फक्त आपल्या सभेचे व्हिडीओ काढतील आणि घरी बायकोला दाखवतील, त्यापेक्षा पोलीस जास्त काही करू शकत नाहीत, आपण पोलिसांना घाबरत नाही असं वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे यांनी केलं होतं.
आमदार नितेश राणे यांनी पोलिसांबद्दल केलेल्या वक्तव्यावर आता राज्यभरातून टीका केली जात आहे. विरोधी पक्षातील अनेक आमदारांनी त्यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी नितेश राणे यांच्यावर त्यांच्याच भाषेत टीका केल्याचं दिसतंय.
ही बातमी वाचा: