एक्स्प्लोर

Chhatrapati Sambhaji Nagar Crime : पतीच्या निधनानंतर तेराव्याच्या दिवशीच महिलेवर चुलत दिराचा अत्याचार

Chhatrapati Sambhaji Nagar Crime : पतीच्या निधनानंतर तेराव्याच्या दिवशीच महिलेवर चुलत दिराने अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार छत्रपती संभाजीनगरमधील पैठण तालुक्यातील एका गावात समोर आला आहे.

Chhatrapati Sambhaji Nagar Crime : छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) एक धक्कादायक घटना समोर आली असून, पतीच्या निधनानंतर तेराव्याच्या दिवशीच महिलेवर चुलत दिराने अत्याचार (Sexual Assault) केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. पैठण तालुक्यातील एका गावात शनिवारी दुपारी साडेबारा वाजता हा प्रकार समोर आला असून, याप्रकरणी नराधम चुलत दिरावर पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर गुन्हा (FIR) दाखल होताच आरोपी दीर हा फरार झाला आहे. तर पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जात आहे.

पाचोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेच्या पतीचे तेरा दिवसांपूर्वी निधन झाले होते. शनिवारी तेराव्याचा कार्यक्रम असल्याने सकाळचा विधी पार पाडण्यात आला. मात्र दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास पीडित महिला ही शेजारीच असलेल्या चुलत सासूच्या घरी गेली. यावेळी चुलत दीर हा एकटाच घरी होता. त्याने घरात कोणी नसल्याचे पाहून पीडितेवर अत्याचार केला आणि कोणाला काही सांगितले तर, जीवे मारण्याची धमकी दिली. पतीच्या निधनानंतर कोसळलेल्या या आघाताने महिला भेदरुन गेली होती. तसेच प्रचंड घाबरुन गेल्याने तिने याबाबत कुणालाही काहीही सांगितलं नाही. पण त्यानंतर पीडित महिलेने रविवारी पाचोड पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. त्यावरुन आरोपी दिराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना घडल्यापासून आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

पतीच्या निधनानंतर तेराव्याच्या दिवशीच अत्याचार 

पीडित महिला थोडी भोळसर आहे. तर तेरा दिवसांपूर्वी तिच्या पतीचं निधन झालं होतं. त्यामुळे घरात दुःखाचं वातावरण होते. शनिवारी तेराव्याचा कार्यक्रम असल्याने सकाळचा विधी पार पाडण्यात आला. पण आपल्या घरी आलेल्या पीडित महिलेला एकट पाहून चुलत दिराने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. महिलेकडून विरोध होत असताना तिला जीवे मरण्याची धमकी दिली. धक्कादायक म्हणजे पीडित महिलेच्या पतीचं निधन झाल्याने, तेराव्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले असताना त्याच दिवशी तिच्यावर अत्याचार करण्यात आला आहे. त्यामुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. 

आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरु

पतीच्या निधनानंतर तेराव्याच्या दिवशीच महिलेवर चुलत दिराने अत्याचार केल्याची घटना समोर आल्याने संताप व्यक्त होत आहे. दरम्यान या प्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यात नराधम दिराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर गुन्हा दाखल होताच आरोपी दीर फरार झाला आहे. मात्र पोलिसांकडून त्याचा शोध सुरु असून, एक पथक यासाठी कार्यरत करण्यात आल्याची माहिती पाचोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी दिली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde on Uddhav Thackeray  | जे गेटमधून बाहेर निघत नव्हते ते शेताच्या बांधावर पोहोचले, शिंदेंची टीकाManoj Jarange Parbhani : लोकसभेत धडा मिळाला, आता अंत पाहू नका, मराठा महिलांचा सरकारला इशाराSambhajiraje chhatrapatil on Vishalgad : विशाळगड अतिक्रमण मुक्त करा, संभाजीराजेंची मागणीManoj Jarange Parbhani :

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
Embed widget