एक्स्प्लोर

Samarjeetsinh Ghatge: समरजित घाटगेंकडून सीएम फडणवीस, एकनाथ शिंदेंच्या मुंबईत भेटीगाठी? घरवापसीची चर्चा रंगताच म्हणाले..

Samarjeetsinh Ghatge: समरजीतसिंह घाटगे यांनी गेल्या काही दिवसांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे तसेच एकनाथ शिंदे यांची सुद्धा भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Samarjeetsinh Ghatge: वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना आव्हान देण्यासाठी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कागल विधानसभा मतदारसंघातून भाजप नेते समरजितसिंह घाटगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तुतारी फुंकली होती. मात्र, विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना निसटत्या मतांनी पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर अज्ञातवासात असलेल्या समरजित यांनी पुन्हा एकदा घरवापसीची तयारी केली आहे का? अशी चर्चा रंगली आहे. समरजीतसिंह घाटगे यांनी गेल्या काही दिवसांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुद्धा भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ही भेट घरवापसीसाठी आहे की अन्य वैयक्तिक कामांसाठी होती याबाबत स्पष्टता आलेली नाही.  

मी अजूनही राष्ट्रवादीमध्येच 

दरम्यान, एबीपी माझाने फोनवरून संपर्क साधला असता समरजित यांनी आपण अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्येच असल्याचे म्हटले आहे. कागलच्या राजकारणामध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ महायुतीचा भाग आहेत. माजी आमदार संजूबाबा घाटगे यांनी सुद्धा काही दिवसांपूर्वी समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे घाटगे यांची  राजकीय कोंडी कागल तालुक्यामध्ये झाली आहे.  

कागलच्या राजकारणात ट्विस्ट 

समरजित घाटगे यांच्याकडून राजकीय चाचपणीची चर्चा होत असली, महायुतीचा भाग झाल्यास त्यांना मुश्रीफ आणि संजू बाबा घाटगे गटासोबत स्थानिक पातळीवर तडजोड करावी लागणार आहे. मात्र कार्यकर्त्यांचं मनोमिलन होणार का? असाही प्रश्न आहे. कागलच्या राजकारणात गटातटाच्या राजकारण पाहता हे सुद्धा आव्हान असेल. कागलच्या राजकारणातील तिरंगी लढत नेहमीच मुश्रीफांच्या पथ्यावर पडली आहे. संजू बाबा घाटगे गटाची 40 ते 50 हजार मते मुश्रीफांच्या विजयात नेहमीच निर्णायक राहिली आहेत. अजित पवार गट भाजपसोबत असल्याने घाटगे आणि मुश्रीफ महायुतीचा भाग आहेत. त्यामुळे समरजित यांना नव्या राजकीय वाटचालीचा विचार करताना या समीकरणांचा सुद्धा विचार करावा लागणार आहे. दुसरीकडे, समरजित घाटगे यांचे पक्षांतर करूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत घनिष्ठ संबंध आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी सुद्धा समरजित यांचे जवळचे संबंध आहेत.  

इतर महत्वाच्या बातम्या

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Pune : नव्या लोकप्रतिनिधींकडून पुणेकरांना कोणत्या अपेक्षा
Mahapalikecha Mahasangram Nashik : नाशिक महानगरपालिका निवडणुकीत कुणाची बाजी?
Ganesh Naik On Leopard : बिबट्यांवर नसबंदीच्या प्रयोगाला केंद्राने परवानगी दिली - गणेश नाईक
Shrikant Shinde Lok Sabha : निवडणुका, उद्धव ठाकरे ते काँग्रेस; श्रीकांत शिंदे लोकसभेत कडाडले
Baba Adhav Funeral : समाजसेवक बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
आधी देवदर्शनाला गेले, किरकोळ वादानंतर संपवलं जीवन; कला केंद्रातील नर्तिकेसाठी युवकाचं टोकाचं पाऊल
आधी देवदर्शनाला गेले, किरकोळ वादानंतर संपवलं जीवन; कला केंद्रातील नर्तिकेसाठी युवकाचं टोकाचं पाऊल
Embed widget