एक्स्प्लोर

Nishikant Dubey on Maharashtra: महाराष्ट्र जो टॅक्स भरतो, त्यामध्ये आमचंही योगदान, ठाकरे कुटुंब अन् मराठी लोकांशी देणंघेणं नाही; निशिकांत दुबे पुन्हा बरळले

Nishikant Dubey on Maharashtra: निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो. महाराष्ट्रात उद्योगधंदे नाहीत, सगळे कारखाने आणि खाणी आमच्याकडे आहेत, असे म्हटले होते.

Nishikant Dubey on Marathi: महाराष्ट्राबाहेर बिहार आणि उत्तर प्रदेशात मराठीवरुन दादागिरी करणाऱ्या लोकांना 'पटक पटक के मारेंगे', असे वादग्रस्त आणि मुजोर वक्तव्य करणारे भाजप (BJP) खासदार निशिकांत दुबे (Nishikant Dubey) यांचा तोरा अद्याप कमी झालेला नाही. आपण या वक्तव्यावर अजूनही ठाम असल्याचे निशिकांत दुबे यांनी गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. (Marathi language Row)

महाराष्ट्राचं या देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठं योगदान आहे, ही गोष्ट कोणीही नाकारु शकत नाही. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. पण महाराष्ट्र जो टॅक्स भरतो, त्यामध्ये आमचंही योगदान आहे. याचं ठाकरे कुटुंबाशी, मराठी लोकांशी देणंघेणं नाही. तामिळनाडू, केरळ किंवा कर्नाटक कुठेही जा. तेदेखील 'पटक पटक के मारेंगे' म्हणतील. त्यामुळे माझ्या वक्तव्यावर ठाम आहे, असे निशिकांत दुबे यांनी म्हटले.

Mumbai Nishikant Dubey: निशिकांत दुबेंचा मुंबईतील खारमध्ये अलिशान फ्लॅट

मुंबई आणि महाराष्ट्र विरोधात गरळ ओकणारे भाजप खासदार निशिकांत दुबे यांचे मुंबई कनेक्शन समोर आले आहे. मुंबई आणि महाराष्ट्राकडे स्वत:चं काय आहे?  इतरांच्या  पैशांवर महाराष्ट्र जगतो असं म्हणणाऱ्या निशीकांत दुबे यांचा मुंबईतल्या खार पश्चिमला कोट्यावधींचा फ्लॅट आहे. महाराष्ट्राकडे कोणतेही उद्योग नाही, म्हणणारे खासदार दुबे स्वत:च मुंबईतील बड्या कॉर्पोरेट कंपनीत संचालक पदावर होते. राजकारणात जाण्यापूर्वी दुबे मुंबईस्थित असणाऱ्या बड्या कॉर्पोरेट कंपनीत ते डायरेक्टर पदावर होते. 

1993 ते 2009 पर्यंत मुंबईत मुख्यालय असणाऱ्या स्टील, दूरसंचार, उर्जा या क्षेत्राशी संबंधीत काम करणाऱ्या कंपनीत दुबे यांनी व्यवस्थापनातील सर्वोच्च पद भूषवले होते. तसेच खार पश्चिमेला निशीकांत दुबे यांच्या नावावर उच्चभ्रु परिसरात 1680 स्के.फुटांचा कोट्यावधींचा फ्लॅट आहे.

Nishikant Dubey: महाराष्ट्रात एकही उद्योग नाही, सगळं आमच्याकडे, आमच्या पैशांवर जगता अन् दादागिरी करता: निशिकांत दुबे

महाराष्ट्र कोणाच्या पैशांची भाकरी खातो. तिकडे टाटा, बिर्ला आणि रिलायन्स असेल. पण त्यांचा कोणताही कारखाना महाराष्ट्रात नाही. बिहार, झारखंड नसतं तर टाटा आणि बिर्ला यांनी काय केलं असतं? टाटा , बिर्ला आणि रिलायन्स मुंबईत टॅक्स भरतात पण टाटांनी पहिला कारखाना बिहारमध्ये उघडला. महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो. तुम्ही कोणता टॅक्स आणता. तुमच्याकडे कारखाना नाही, उद्योग नाहीत किंवा खनिजाच्या खाणी नाहीत. सगळ्या खाणी झारखंड, छत्तीसगढ, मध्य प्रदेश आणि ओडिसात आहेत. रिलायन्सची रिफायनरी आणि सेमीकंडक्टरचा प्रकल्प गुजरातमध्ये आहे. महाराष्ट्रात काय आहे? मग वरुन आमचं शोषण करुन दादागिरी करता, अशी गरळ निशिकांत दुबे यांनी ओकली होती.

आणखी वाचा

बाळासाहेबांचे खरे वारसदार असाल तर माहीमच्या दर्ग्यावर...; ठाकरे बंधूंना खासदार निशिकांत दुबेंचं ओपन चॅलेंज

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
पुलाखालून अजून बरच पाणी जायचंय, साताऱ्यात भाजपचा अध्यक्ष होण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करणार, मंत्री गोरेंची क्रीडा महोत्सवात जोरदार फटकेबाजी 
पुलाखालून अजून बरच पाणी जायचंय, साताऱ्यात भाजपचा अध्यक्ष होण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करणार, मंत्री गोरेंची क्रीडा महोत्सवात जोरदार फटकेबाजी 
मोदीजी, आपण शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अण्णा हजारेंचं पंतप्रधानांना पत्र; युद्ध परिस्थितीवर भाष्य, परखड भूमिका
मोदीजी, आपण शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अण्णा हजारेंचं पंतप्रधानांना पत्र; युद्ध परिस्थितीवर भाष्य, परखड भूमिका
मेडिकलच्या विद्यार्थीनीने जीवन संपवलं; राष्ट्रवादीच्या नेत्याविरुद्ध गुन्हा, अ‍ॅटॉसिटीचेही कलम लावले
मेडिकलच्या विद्यार्थीनीने जीवन संपवलं; राष्ट्रवादीच्या नेत्याविरुद्ध गुन्हा, अ‍ॅटॉसिटीचेही कलम लावले

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Mahadik on Gokul: 'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
शेतमजुराचा लेक UPSC उत्तीर्ण, आई-वडिलांच्या चेहऱ्यावर अत्यानंद; अभिनंदनासाठी पत्र्याच्या शेडमध्ये माणसांचा राबता
शेतमजुराचा लेक UPSC उत्तीर्ण, आई-वडिलांच्या चेहऱ्यावर अत्यानंद; अभिनंदनासाठी पत्र्याच्या शेडमध्ये माणसांचा राबता
'स्वप्न थडग्यात घेऊन जाल' ट्रम्प यांच्या बिनशर्त शरणागतीच्या प्रस्तावाला निकराने प्रतिकार करणाऱ्या इराणकडून केराची टोपली; राष्ट्राध्यक्ष, परराष्ट्र मंत्री काय म्हणाले?
'स्वप्न थडग्यात घेऊन जाल' ट्रम्प यांच्या बिनशर्त शरणागतीच्या प्रस्तावाला निकराने प्रतिकार करणाऱ्या इराणकडून केराची टोपली; राष्ट्राध्यक्ष, परराष्ट्र मंत्री काय म्हणाले?
Embed widget