सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या बाजूला बसणाऱ्यांना जनता उत्तर देईल; मविआच्या सभेवर मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी देखील आता या सभेवर हल्लाबोल करत निशाणा साधला आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar News: छत्रपती संभाजीनगर शहरात (Chhatrapati Sambhaji Nagar City) आज महाविकास आघाडीची सभा होत असून, यासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, महाविकास आघाडीमधील तीनही पक्षाची एकत्र सभा पहिल्यांदाच होत आहे. त्यामुळे या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, याच सभेवरून सत्तधारी पक्षाच्या नेत्यांकडून टीका देखील केली जात आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी देखील आता या सभेवर हल्लाबोल करत निशाणा साधला आहे. सावरकरांचा अपमान करणाऱ्या लोकांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्यांना राज्याची जनता उत्तर देईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीच्या सभेवर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महाविकास आघाडीची सभा ज्या शहरात सभा होत आहे. त्याचं नाव छत्रपती संभाजीनगर करण्याची घोषणा बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती. त्याच संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीकडून सभा घेण्याचं काम सुरु आहे. तर ज्या राहुल गांधी यांनी स्वंतत्रवीरांचा अपमान केला त्यांच्या मांडीला मंदी लावून बसण्याचा पाप जे कोणी करत आहेत, त्यांना महाराष्ट्रातील जनता सडेतोड उत्तर देईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
भागवत कराड यांचीही टीका...
छत्रपती संभाजीनगर शहरात होणाऱ्या महाविकास आघाडीच्या सभेवर केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी देखील टीका केली आहे. महाविकास आघाडीच्या सभेत होणाऱ्या टीकेला आम्ही डगमगणारे नाहीत. आम्ही त्याला लवकरच उत्तर देऊ. तर शरद पवार सावरकरांचे कौतुक करतात आणि काँग्रेसचे नेते सावरकर यांच्यावर टीका करतात हा विरोधाभास आहे. ही विचारांची वज्रमुठ नसून, केवळ भाजपला विरोध करण्यासाठी वज्रमूठ असल्याचं भागवत कराड म्हणाले आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :