एक्स्प्लोर
Savarkar Gaurav Yatra: मोठी बातमी! अखेर 'या' अटी-शर्तीनुसार छत्रपती संभाजीनगरमध्ये 'सावरकर गौरव यात्रे'ला परवानगी
Chhatrapati Sambhaji Nagar: सावरकर गौरव यात्रा काढताना भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेला पोलिसांकडून देण्यात आलेल्या अटी आणि शर्ती पाळावे लागणार आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजीनगर शहरात (Chhatrapati Sambhaji Nagar City) महाविकास आघाडीची एकत्र सभा होत असतानाच दुसरीकडे भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेकडून सावरकर गौरव यात्रा (Savarkar Gaurav Yatra) काढण्यात येत आहे. मात्र कालपर्यंत पोलिसांकडून या यात्रेला परवानगी देण्यात आली नव्हती. मात्र आज सकाळी अखेर पोलिसांनी या यात्रेला परवानगी दिली आहे. मात्र परवानगी देताना पोलिसांकडून काही अटी आणि शर्ती घालून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सावरकर गौरव यात्रा काढताना भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेला पोलिसांकडून देण्यात आलेल्या अटी आणि शर्ती पाळावे लागणार आहे.
अटी आणि शर्ती
- गौरव यात्रा ही नमुद वेळेतच सुरु करुन संपवावी, दिलेल्या मार्गात कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार नाही.
- गौरव यात्रा ही रोडच्या डाव्या बाजुने 1-3 भागातच काढावी जेणे करुन वाहतुकीस अडथळा किंवा वाहतुक कोंडी निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी.
- गौरव यात्रेमध्ये इतर धर्मियांच्या धार्मिक भावना दुःखावणारे अथवा अक्षेपाहार्य गीत, प्रक्षोभक घोषणा, भाषणे अथवा वक्तव्ये होणार नाही तसेच कोणत्याही प्रकारचे अक्षेपाहार्य देखावे, फलक राहाणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
- सध्या शहरात कलम 37 (1) (3) महाराष्ट्र पोलीस कायदाप्रमाणे जमावबंदी आदेश लागु असल्याने सदर आदेशाचे उल्लघंन होणार नाही याची दक्षता घ्यावी.
- गौरव यात्रेमध्ये वापरण्यात येणाऱ्या ध्वनिक्षेपका बाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन व्हावे.
- गौरव यात्रे दरम्यान कोणतेही शस्त्र, तलवारी, स्फोटक पदार्थ बाळगु नये अगर प्रदर्शन करु नये व शस्त्र वापरू नयेत.
- गौरव यात्रेदरम्यान कुठल्याही अत्यावश्यक सुविधा उदा. शहर बससेवा, रुग्णवाहिका, दवाखाना, शाळा, मेडीकल यांना बाधा येणार नाही याची काळजी घ्यावी.
- गौरव यात्रेमध्ये आपणातर्फे आवश्यक ते स्वयंसेवक नेमावे.
- गौरव यात्रेमध्ये संयोजकांनी मोटारवाहन कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी.
- गौरव यात्रे दरम्यान किरकोळ कारण अथवा मान पानावरुन भांडण तंटे होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न अथवा शांतता भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी. शांतता भंग होऊन शासकीय अथवा सार्वजनीक मालमत्तेचे नुकसान झाल्यास संयोजकास जबाबदार धरून त्याची भरपाई संयोजक यांचे कडुन वसुल करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
- परवानगी रद्द करण्याचा अधिकार पोलीसांना राहील.
- बंदोबस्तावर नेमलेले पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या सुचनांचे पालन करावे.
- परवानगी फक्त गौरव यात्रे करिता देण्यात आलेली असुन ध्वनिक्षेपक परवानगी घेणे बंधनकारक
- पोलीसांनी दिलेल्या अटी व शर्तींचे संयोजक व आयोजकांनी काटेकोरपणे पालन करावे.
इतर महत्वाच्या बातम्या :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement