Chhatrapati Sambhaji Nagar : विवाहितेच्या मृत्यू प्रकरणी कॅनडातील कुटुंबावर छत्रपती संभाजीनगरात गुन्हा दाखल
Chhatrapati Sambhaji Nagar : आरोपी पतीने तू स्टुपिड, यूजलेस आहेस म्हणून शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar Crime News : विदेशात स्थायीक कुटुंबाने विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ करत मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कॅनडा स्थित एका कुटुंबावर छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पियूष दीपक नार्लावार (रा. चंद्रपूर हमु टाऊन सेंटर कोर्ट, कार्गोरफ टोरंटो कॅनडा), सासरे दीपक रामभाऊ नार्लावार, सासू ज्योती दीपक नार्लावार तर नणंद पूजा किरण गदगी (रा. बिदर हम फ्यूलँड अमेरिका) अशी आरोपींची नावे आहेत. तर मयत रिचा नार्लावार हिचे वडील प्रमोद विलासराव श्रीनिवार (रा. साई लाभ इंक्लेव्ह इटखेडा पैठण रोड) यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीनिवार यांच्या फिर्यादीनुसार, त्यांची मुलगी रिचा हिचे पियूष दीपक निर्लावार याच्यासोबत 3 जानेवारी 2011 रोजी लग्न झाले. लग्नानंतर पती पियूष याच्यासह सासू व सासरे यांनी तिचा छळ सुरू केला. वारंवार दागिने पैशांची मागणी केली. तसेच तुला जॉब नाही असे टोमणे देत त्रास दिला. तर रिचा ही पतीसह अमेरिकेत गेली असता पाडवा सणानिमित्त पाठवलेल्या खोबऱ्याच्या हारावरून आरोपींनी अशा फालतू गोष्टी काय पाठवतात, पैसे पाठवायचे ना असे म्हणत शिवीगाळ केली. त्यानंतर 2022 मध्ये पतीला टोरेंटो कॅनडा येथे नोकरी लागल्याने रिचा पतीसह कॅनडाला गेली होती. तिथे गेल्यावरही आरोपी पतीने तू स्टुपिड, युजलेस आहेस म्हणून शारीरिक व मानसिक छळ केला.तसेच तिला मारहाण केली. त्यामुळे रिचाच्या मरणास कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरून पती सह सासरच्या मंडळीवर सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विनायक शेळके हे करीत आहेत.
सुशिक्षित कुटुंब पण तरीही दिला त्रास...
रिचा हिचे पियुष दीपक निर्लावार याच्यासोबत 3 जानेवारी 2011 रोजी लग्न झाले. निर्लावार कुटुंबातील सर्वच सदस्य सुशिक्षित असून, विदेशात स्थायिक झाले आहेत. पण सुशिक्षित असूनही निर्लावार कुटुंबातील सदस्यांनी रिचाला नेहमीच त्रास दिल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. पैसे आणि दागिन्यांसाठी रिचाला नेहमी त्रास देण्यात आला. तसेच रिचा जॉब करत नसल्याने तिला यावरून टोमणे दिले जात होते.
इतर महत्वाच्या बातम्या: