(Source: Poll of Polls)
मोठी बातमी : मी चंद्रकांत खैरेंचं काम करणार नाही तर...., अंबादास दानवेंचं खळबळजनक वक्तव्य!
Lok Sabha Election 2024 : छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी अंबादास दानवे देखील इच्छुक होते.
Lok Sabha Election 2024 : उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) पक्षाकडून एकूण 17 उमेदवारांची लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर घोषणा करण्यात आली आहे. तर, चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांना छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून (Chhatrapati Sambhaji Nagar Lok Sabha Constituency) सहाव्यांदा उमेदवारी घोषित झाल्यानंतर अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "मी खैरे यांचं नाही तर पक्षाचं काम करणार आहे” असे दानवे म्हणाले आहेत. यावरून खैरे आणि दानवे यांचा वाद अजूनही संपला नसल्याचे स्पष्ट होते.
छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून ठाकरे गटातील चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यात रस्सीखेच पाहायला मिळत आहे. दरम्यान, आज खैरे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. यावर बोलतांना दानवे म्हणाले की, "सर्वांची मते जाणून घेऊन ही यादी जाहीर करण्यात आली आहे. ही प्रभावी यादी आहे. पक्षप्रमुख जी काही बाबदारी देतील ती सर्व जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार आहे. मी खैरे यांचं नाही तर पक्षाचं काम करणार असल्याचे देखील दानवे म्हणाले.
आत्ताच पक्ष प्रमुखांना फोन करून बोललो : दानवे
पुढे बोलतांना दानवे म्हणाले की, "मी इच्छुक होतो, 2014,2 019 आणि आताही इच्छा होती. इच्छा असणे वावग नाहीं. मात्र, मला विरोधी पक्षनेते पद महत्वाची जबाबदारी दिली आहे. आम्हाला हट्ट करण्याचा अधिकार आहे. निर्णय घेण्याचा अधिकार पक्ष प्रमुखाचा आहे. व्यक्तिगत हितापेक्षा संघटनेचे हीत महत्वाचं आहे. मी पक्ष प्रमुखांना आता फोन करून बोललो, तुम्ही घेतलेला निर्णय योग्य आहे. चिंता नसावी जोमाने पक्षाचं काम करू असे त्यांना सांगितले आहे. इच्छा असतांना उमेदवारी मिळाली नसल्याने थोडफार वाईट वाटत असते. पण, जी जबाबदारी पक्षप्रमुख देतील ती पूर्ण करेल, "असे दानवे म्हणाले.
खैरे- दानवे वाद काय?
- चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे जुनाच वाद आहे.
- स्थानिक राजकारणात एकमेकांवर नेहमीच दोघेही कुरघोडीचे राजकारण करतात.
- 2014, 2019 पासून दानवे लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक आहे.
- खैरे नेहमी डावलत असल्याचा दानवेंचा आरोप आहे.
- पक्षाच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला खैरेंनी बोलवले नसल्याने दानवे नाराज आहेत.
- मध्यंतरी खैरे- दानवे वादावर थेट मातोश्रीवर चर्चा झाली.
- उद्धव ठाकरेंनी दोन्ही नेत्यांची समज काढली होती.
- खैरे यांना उमेदवारी मिळाल्यावर देखील वाद कायम असल्याचे पाहायला मिळत आहे.
- पक्षाचा काम करणार असून खैरेंचा काम करणार नसल्याचं दानवेंची भूमिका आहे.
- खैरे यांना तिकीट मिळताच अंबादास दानवेंना सूचक व्हाट्सअप स्टेटस ठेवलं आहे..
- 'ये साजिशों का दौर है....और हम कोशिशों में उलझे हुए है....' दानवेंचं व्हाट्सअप स्टेटस
इतर महत्वाच्या बातम्या :