एक्स्प्लोर

मराठवाड्यातील हिंगोली, संभाजीनगर, धाराशिव, परभणीतील ठाकरे गटाचे उमेदवार जाहीर; कोणत्या मतदारसंघातून कोणता उमेदवार?

Shiv Sena Marathwada Candidate List : मराठवाड्यातील एकूण 4 मतदारसंघातील देखील उमेदवारी जाहीर करण्यात आली असून, ज्यात हिंगोली, संभाजीनगर, धाराशिव, परभणी मतदारसंघाचा समावेश आहे. 

Shiv Sena UBT Lok Sabha Marathwada Candidate List : उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) पक्षाच्या लोकसभा उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर करण्यात आली आहे. यावेळी पहिल्या टप्प्यात एकूण 17 मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मराठवाड्यातील (Marathwada) एकूण 4 मतदारसंघातील देखील उमेदवारी जाहीर करण्यात आली असून, ज्यात हिंगोली (Hingoli), छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar), धाराशिव (Dharashiv), परभणी (Parbhani) मतदारसंघाचा समावेश आहे. 

कोणत्या मतदारसंघातून कोणता उमेदवार?

  • हिंगोली : नागेश पाटील आष्टीकर (Nagesh Patil Ashtikar)
  • छत्रपती संभाजीनगर : चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) 
  • धाराशिव : ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) 
  • परभणी : संजय जाधव (Sanjay Jadhav) 

हिंगोलीमधून नागेश पाटील आष्टीकरांना संधी...

हिंगोली लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे नांदेडचे जिल्हाप्रमुख नागेश पाटील आष्टीकरांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. हदगाव विधानसभा मतदारसंघातून त्यांनी 2014 मध्ये विजय मिळवला होता. सरपंच पदापासून त्यांनी राजकीय कारकीर्द सुरु केली होती आणि आज लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. 

चंद्रकांत खैरेंना पुन्हा उमेदवारी....

मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरमधून पुन्हा एकदा चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मागच्या निवडणुकीत खैरे यांचा एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी पराभव केला होता. आता पुन्हा खैरे मैदानात असणार असून, महायुतीचा उमेदवार जाहीर झाल्यावर संभाजीनगरमधील खरी लढत स्पष्ट होणार आहे. 

धाराशिवमधून ओमराजे निंबाळकर यांना पुन्हा संधी...

महाविकास आघाडीत धाराशिव लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांनाच ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची मोठी ताकद असून, मागील काही दिवसांत स्वतः उद्धव ठाकरे यांनी या मतदारसंघाचा दौरा देखील केला आहे. आता निंबाळकर यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळाली असून, महायुतीचा उमेदवार कोण असणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. 

परभणीतून संजय जाधवांना उमेदवारी....

परभणी जिल्ह्याचे विद्यमान खासदार संजय जाधव यांना पुन्हा एकदा ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. परभणी शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. विशेष म्हणजे शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर देखील परभणीमधील आमदार-खासदार उद्धव ठाकरेंच्या सोबत कायम राहिले. दरम्यान,  संजय जाधव यांची पक्षावरील निष्ठा पाहता त्यांना पुन्हा एकदा ठाकरेंनी उमेदवारी जाहीर केली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या : 

मोठी बातमी : संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरेंना उमेदवारी जाहीर; अंबादास दानवेंचा पत्ता कट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MP Prajwal Revanna : शेकडो महिलांवर अत्याचार अन् हजारो व्हिडिओ व्हायरल; माजी पीएम देवेगौडांच्या नातवाच्या सेक्स स्कॅंडलने खळबळ
शेकडो महिलांवर अत्याचार अन् हजारो व्हिडिओ व्हायरल; माजी पीएम देवेगौडांच्या नातवाच्या सेक्स स्कॅंडलने खळबळ
Yavatmal News : लग्नाचा स्वागत समारंभ आटोपून परतताना बस-ट्रकचा भीषण अपघात; चार ठार, सहा जखमी
लग्नाचा स्वागत समारंभ आटोपून परतताना बस-ट्रकचा भीषण अपघात; चार ठार, सहा जखमी
M K Madhavi in Police Custody :  ठाकरे गटाला धक्के सुरुच, एम के मढवी अडचणीत वाढ, न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली
ठाकरे गटाला धक्के सुरुच, एम के मढवी अडचणीत वाढ, न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली
PSL गाजवणारा हिरो IPL मध्ये झिरो, मुंबई इंडियन्सच्या ल्यूक वूडच्या नावावर नकोसा विक्रम, दिल्लीकडून जोरदार धुलाई
PSL गाजवणारा हिरो IPL मध्ये झिरो, ल्यूक वूडच्या नावावर नकोसा विक्रम, मुंबई इंडियन्सच्या महागडच्या बॉलर्सच्या यादीत टॉपवर 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Jayant Patil on Shashikant Shinde : शशिकांत शिंदे चारपट मतांनी विजयी होतील- जयंत पाटीलLok Sabha Election 2024 : लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधींच्या सभाAaditya Thackeray : मिंधे सरकारच्या काळात एकही उद्योग राज्यात आला नाही - आदित्य ठाकरेABP Majha Headlines : 5 PM  : 28 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MP Prajwal Revanna : शेकडो महिलांवर अत्याचार अन् हजारो व्हिडिओ व्हायरल; माजी पीएम देवेगौडांच्या नातवाच्या सेक्स स्कॅंडलने खळबळ
शेकडो महिलांवर अत्याचार अन् हजारो व्हिडिओ व्हायरल; माजी पीएम देवेगौडांच्या नातवाच्या सेक्स स्कॅंडलने खळबळ
Yavatmal News : लग्नाचा स्वागत समारंभ आटोपून परतताना बस-ट्रकचा भीषण अपघात; चार ठार, सहा जखमी
लग्नाचा स्वागत समारंभ आटोपून परतताना बस-ट्रकचा भीषण अपघात; चार ठार, सहा जखमी
M K Madhavi in Police Custody :  ठाकरे गटाला धक्के सुरुच, एम के मढवी अडचणीत वाढ, न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली
ठाकरे गटाला धक्के सुरुच, एम के मढवी अडचणीत वाढ, न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली
PSL गाजवणारा हिरो IPL मध्ये झिरो, मुंबई इंडियन्सच्या ल्यूक वूडच्या नावावर नकोसा विक्रम, दिल्लीकडून जोरदार धुलाई
PSL गाजवणारा हिरो IPL मध्ये झिरो, ल्यूक वूडच्या नावावर नकोसा विक्रम, मुंबई इंडियन्सच्या महागडच्या बॉलर्सच्या यादीत टॉपवर 
Mumbai Crime : बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांकडून पर्दाफाश; तब्बल 14 बालकांची विक्री, एका डाॅक्टरसह 7 जण गजाआड
बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांकडून पर्दाफाश; तब्बल 14 बालकांची विक्री
प्रत्येक वेळी माझा बाप मारला, बाप मारला, अरे काय लावलंय? तानाजी सावंतांचा ओमराजे निंबाळकरांवर पुन्हा घणाघात
प्रत्येक वेळी माझा बाप मारला, बाप मारला, अरे काय लावलंय? तानाजी सावंतांचा ओमराजे निंबाळकरांवर पुन्हा घणाघात
'सहानुभूतीसाठीच काहींकडून कट कारस्थान', प्रकाश शेंडगेंच्या आरोपावर मनोज जरांगेंचे चोख प्रत्युत्तर
'सहानुभूतीसाठीच काहींकडून कट कारस्थान', प्रकाश शेंडगेंच्या आरोपावर मनोज जरांगेंचे चोख प्रत्युत्तर
Supriya Sule on Ajit Pawar : मलिदा गँग गेल्यापासून गर्दी वाढली; खासदार सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना खोचक टोला
मलिदा गँग गेल्यापासून गर्दी वाढली; खासदार सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना खोचक टोला
Embed widget