'जय श्रीराम'च्या घोषणेनंतर जलील कार्यक्रमातून बाहेर निघाले, भाजप नेते म्हणतात पाकिस्तानात पाठवा
Aurangabad News : अमृत भारत रेल्वे योजनेअंतर्गत औरंगाबाद रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
Aurangabad News : अमृत भारत रेल्वे योजनेअंतर्गत औरंगाबाद रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे भाषण सुरू होण्याआधीच एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) कार्यक्रमातून निघून गेले. यावर खुलासा करताना खासदार जलील म्हणाले की, दौलताबादला एक उद्घाटन आहे. त्यामुळे मी जात आहे. मी भाषणात मोदींचे अभिनंदन केले आहे. आठ वर्षांनी का होईना, औरंगाबादच्या रेल्वे स्थानकाला नवीन बिल्डिंग मिळत आहे. परंतु, यासोबतच रेल्वे कनेक्टिव्हिटी देखील पाहिजे. नुसती इमारत बांधून काही होणार नाही. मला कशाला विरोध होऊ शकतो, मी जय श्री रामच्या घोषणेला विरोध का करु. तर माझ्याकडे एकच ड्रेस राहिला असल्याने, आज मी काळा ड्रेस घालून आल्याचं जलील म्हणाले.
नेमकं काय घडलं?
अमृत भारत रेल्वे योजनेअंतर्गत औरंगाबाद रेल्वे स्थानकावर कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. दरम्यान याच कार्यक्रमाला औरंगाबादचे खासदार म्हणून इम्तियाज जलील उपस्थित होते. कार्यक्रमाच्या ठिकाणी आलेल्या जलील काळे कपडे घालून आल्याने याची कुचबुच सुरु झाली. त्यानंतर जलील यांनी भाषण केले. यावेळी त्यांनी आपल्या भाषणातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन देखील केले. मात्र, काही वेळेने उपस्थित असलेल्या काही लोकांनी जय श्रीराम अशा घोषणाबाजी सुरु केली. त्यामुळे मोदी यांचे भाषण सूर होण्यापूर्वीच जलील कार्यक्रमातून बाहेर पडले. त्यामुळे या सर्व घटनेची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.
भाजप नेते म्हणतात जलील यांना पाकिस्तानात पाठवा!
दरम्यान या सर्व प्रकरणावर भाजप नेत्यांची प्रतिकिया देखील आली आहे. भाजपा प्रदेश सरचिटणीस संजयजी केनेकर यांनी यावर बोलतांना म्हटले आहे की, "विकासाच्या पर्वाहात चांगली दृष्टी ठेवणे गरजेचे असते. पण कोठेतरी निषेध व्यक्त करण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यामुळे, अशा व्यक्तींना खरतर या मंचावर बसवलेच पाहिजे नको, त्यामुळे आमची लोकांना विनंती आहे यांना पाकिस्तानमध्ये पाठवले पाहिजे. कारण, यांची जागा पाकिस्तानच्याच मंचावर आहे. तर, एमआयएमची जागा हिंदुस्थानच्या मंचावर नाहीच, असे केनेकर म्हणाले.
508 अमृत भारत स्थानकांचा पुनर्विकास होणार
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशभरातील 508 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची पायाभरणी केली. यावेळी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवही उपस्थित होते. ही 508 रेल्वे स्थानकं 27 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरलेली आहेत. तर, 450 हून अधिक रेल्वे स्थानके राज्यांमध्ये आणि सुमारे 20 केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरलेली आहेत. तर, 1300 रेल्वे स्थानकांपैकी 508 अमृत भारत स्थानकांचा पुनर्विकास केला जाईल. यावर 25 हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत असं पंतप्रधान म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या:
Amrit Bharat Station Scheme : 'विरोधक ना काही करणार, ना करू देणार' : पंतप्रधान नरेंद्र मोदी