MP List of Marathwada : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू! मराठवाड्यातील 2019 मधील खासदारांची यादी
MP List of Marathwada : 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात सर्वाधिक जागा भाजप-शिवसेनेच्या ताब्यात गेल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपला 4 , शिवसेना 3 ,एमआयएम पक्षाने 1 जागा जिंकल्या होत्या.
MP List of Marathwada : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष (Political Party) कामाला लागले असून, लोकसभा निवडणुकीच्या तारखा (Lok Sabha Election 2024 dates) देखील जाहीर करण्यात आल्या आहे. दरम्यान, याच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यात (Marathwada) आपली सत्ता मिळवण्यासाठी देखील सत्ताधारी आणि विरोधी पक्षाकडून प्रयत्न सुरु झाले आहेत. मराठवाड्यात एकूण 8 लोकसभा मतदारसंघ आहेत. 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात (Marathwada Lok Sabha Election result 2019) सर्वाधिक जागा भाजप-शिवसेनेच्या ताब्यात गेल्याचे पाहायला मिळाले. भाजपला 4 , शिवसेना 3 ,एमआयएम पक्षाने 1 जागा जिंकल्या होत्या. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी शिवसेनेत आणि राष्ट्रवादीत झालेल्या बंडखोरीमुळे बऱ्याच राजकीय उलथापालथ झाली असून, लोकसभा निवडणुकीत चित्र कसे असणार हे पाहणं महत्वाचे असणार आहे.
मराठवाड्यातील खासदारांची यादी | मराठवाड्यातील 8 खासदार (Marathwada MP LIST)
मतदारसंघ | विजयी उमेदवार | पक्ष | सध्या कोणाच्या बाजूने? |
हिंगोली | हेमंत पाटील | शिवसेना | शिंदे गट |
नांदेड | प्रताप पाटील चिखलीकर | भाजप | --- |
परभणी | संजय जाधव | शिवसेना | ठाकरे गट |
जालना | रावसाहेब दानवे | भाजप | --- |
औरंगाबाद | इम्तियाज जलिल | एमआयएम | --- |
उस्मानाबाद | ओमराजे निंबाळकर | शिवसेना | ठाकरे गट |
लातूर | सुधाकर श्रंगारे | भाजप | --- |
बीड | प्रीतम मुंडे | भाजप | --- |
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019 (Maharashtra Lok Sabha Election result 2019)
मराठवाड्यात 2019 मध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या?
पक्ष | किती जागा |
भाजप | 04 |
शिवसेना | 03 |
राष्ट्रवादी | 00 |
काँग्रेस | 00 |
एमआयएम | 01 |
महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा सुटला
आगामी लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीमधील जागावाटपाचा तिढा अजूनही सुटला नसला, तरीही मराठवाड्यातील जागावाटपाचा निर्णय जवळपास झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जालन्याततील काँग्रेसची जागा ठाकरे गटाला आणि हिंगोलीची जागा काँग्रेसला देण्याचा अंतिम निर्णय फक्त बाकी असल्याने अधिकृतरीत्या माहिती जाहीर केली जात नसल्याचे देखील बोलेले जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत सुरु असलेल्या चर्चेनुसार ठाकरे गटाला 4 जागा, काँग्रेसला (Congress) 3 जागा आणि शरद पवार (Sharad Pawar) गटाला 1 जागा देण्याचा निर्णय अंतीम टप्यात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
महायुतीच्या निर्णयाकडे लक्ष...
दुसरीकडे महायुतीमध्ये देखील लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जागावाटपाची चर्चा सुरु असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, याबाबत कोणतेही माहिती बाहेर येणार नाही याची काळजी घेतली जात आहे. मराठवाड्यात आपले अधिकाधिक उमेदवार लोकसभा निवडणुकीत उतरवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यापाठोपाठ शिंदे गटाचे उमेदवार मैदानात असणार आहे. मात्र, अजित पवार मराठवाड्यात किती जागांवर निवडणूक लढवणार की, एकही उमेदवार नसणार हे पाहणं सुद्धा तेवढंच महत्वाचे असणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
MP list of Maharashtra : महाराष्ट्रातील सर्व 48 खासदारांची यादी, कोणत्या पक्षाचे किती खासदार?