CM Eknath Shinde : संजय राऊत म्हणाले पत्रकार परिषदेत मीही प्रश्न विचारणार, शिंदे म्हणाले, 'राऊत आले नाहीत का?'
Marathwada Cabinet Meeting : मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयाविषयी माहिती दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'राऊत आले नाहीत का?' असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना टोला लगावला.

Marathwada Cabinet Meeting : तब्बल सात वर्षांनी मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक (Marathwada Cabinet Meeting) पार पडली. छत्रपती संभाजीनगरमध्ये ही बैठक झाली. या बैठकीत मराठवाड्यात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. याविषयी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह पत्रकार परिषद घेतली. मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयाविषयी माहिती दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी 'राऊत आले नाहीत का?' असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना टोला लगावला. या पत्रकार परिषदेत पत्रकार म्हणून उपस्थित राहणार असल्याचं संजय राऊत म्हणाले होते. त्यावर 'राऊत आले नाहीत का, तुमचे ते विकास राऊत', असं एकनाथ शिंदे म्हणाले.
छत्रपती संभाजीनगरमध्ये आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीनिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेयांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळ शहरात दाखल झालं आहे. या बैठकीनंतर होणाऱ्या पत्रकार परिषदेत उपस्थित राहण्यासाठी संजय राऊत यांना पोलिसांनी पास दिला होता. त्यामुळे संजय राऊत पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार का असा प्रश्न होता. परंतु संजय राऊत मात्र या पत्रकार परिषदेत उपस्थित नव्हते.
संजय राऊत काय म्हणाले होते?
दरम्यान पोलिसांकडून देण्यात आलेल्या पासबद्दल विचारल्यावर संजय राऊत म्हणाले होते की, "मी संपादक आहे. या महाराष्ट्रातला ज्येष्ठ संपादक आहे. माझी इच्छा झाली तर मी जाईन. पण मी गेलो तर गोंधळ निर्माण होईल आणि मला तो नकोय."
'राऊत आले नाहीत का?'
परंतु संजय राऊत मात्र या पत्रकार परिषदेत उपस्थित नव्हते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी राऊत आले नाहीत का? तुमचे ते विकास राऊत असं म्हणत राऊतांना टोला लगावला.
मंत्रिमंडळ बैठकीत कोणते निर्णय?
नदीजोड प्रकल्पाचा 14 हजार कोटी रुपयांचा निधी वगळून 45 हजार कोटी रुपयांचे प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत मान्य केले आहेत. 14 हजार कोटी रुपये सिंचन विभागावर खर्च करणार असून 35 सिंचन प्रकल्प यांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तब्बल सात वर्षांनी मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक (Marathwada Cabinet Meeting) पार पडली. छत्रपती संभाजीनगरमध्ये ही बैठक झाली. या बैठकीत मराठवाड्यात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. याविषयी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह पत्रकार परिषद घेतली. मराठवाड्याला न्याय देण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी मराठवाड्यातील मंत्रिमंडळ बैठक होती. आजचे निर्णय मराठवाड्याच्या विकासासाठी आहेत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
संबंधित बातमी
मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पत्रकार परिषदेचा संजय राऊतांना पास मिळाला पण....
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
